मुलं जेव्हा वाढत्या वयात असतात तेव्हा त्यांच्या तब्येतीकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. कारण या वयात जर त्यांना योग्य आहार योग्य प्रमाणात दिला गेला तर त्याचे खूप चांगले परिणाम कायमस्वरुपी त्यांच्या आरोग्यावर होत असतात. त्यामुळेच सकस अन्नासोबतच त्यांच्या पोटात नियमितपणे हंगामी फळं आणि दूधही गेलं पाहिजे. आता मुलांनी दूध नाही प्यायलं तर त्यामुळे त्यांचं काही नुकसान होत नाही, असंही काही तज्ज्ञांचं मत आहे. पण आपल्याकडे खूप पुर्वीपासूनच नियमितपणे दूध पितात. त्यामुळे तुमची मुलंही ते पित असतील तर त्यात त्यांचं नुकसान काहीच नाही. उलट झालाच तर फायदाच आहे. दूध हे गुणकारी आहेच, पण त्यासोबतच तुम्ही त्यात काही पदार्थ मिसळून मुलांना प्यायला दिलं तर त्याचा मुलांच्या शारिरीक आणि मानसिक विकासावर खूप चांगला परिणाम होतो.
मुलांना दुधात कोणते पदार्थ घालून द्यावे?
१. मुलांना रात्री दूध पिऊन झोपण्याची सवय असेल तर त्यांना गरम दुधामध्ये हळद घालून देऊ शकता. यामुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत होते. शिवाय मुलं वारंवार आजारी पडत नाहीत. नेहमीच होणाऱ्या सर्दी, खोकला, कफ अशा त्रासांपासून त्यांचं संरक्षण होतं.
महाशिवरात्री : साबुदाणा वडे मऊ पडतात, खूप तेल पितात? घ्या खमंग खुसखुशीत वड्यांची सोपी रेसिपी
२. गरम दुधामध्ये १ चमचा साजूक तूप घालून ते मुलांना प्यायला द्या. अशा पद्धतीने दूध आणि तूप एकत्र करून प्यायल्यास ते हाडांसाठीही उत्तम ठरतं आणि शिवाय पचनाचे त्रासही त्यामुळे कमी होतात.
३. मुलांसाठी तुम्ही बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता, मखाना अशी सुकामेव्याची पावडर करून ठेवू शकता. हे सगळे पदार्थ हलके भाजून घ्यायचे आणि मिक्सरमधून त्यांची बारीक पावडर करायची. त्याला जर चॉकलेटचा फ्लेवर हवा असेल तर त्यात थोडी कोको पावडर घाला. मुलांसाठी सगळ्यात उत्तम शक्तीवर्धक पेय तयार..
फक्त १० रुपयांत घरीच करा ६ महिने पुरेल एवढी कसूरी मेथी, चव- सुगंध अप्रतिम, पैशांचीही बचत
४. रामदेव बाबाही सांगतात की शतावरी आणि अश्वगंधा प्रत्येकी एकेक ग्रॅम गरम दुधात घालून मुलांना द्या. यामुळे त्यांचं आरोग्य नेहमीच उत्तम राहातं आणि शिवाय मुलांची उंची वाढण्यासही मदत होते.
