Lokmat Sakhi >Parenting > भारतीय पालक करतात या चुका; मुलं यशस्वी होण्यासाठी बी.के शिवानी सांगतात ४ टिप्स

भारतीय पालक करतात या चुका; मुलं यशस्वी होण्यासाठी बी.के शिवानी सांगतात ४ टिप्स

Four Parenting Mistakes Parents Should Avoid : काही पॅरेंटीग टिप्स तुमचं काम एकदम सोपं करतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 08:09 PM2024-03-24T20:09:17+5:302024-03-25T14:10:30+5:30

Four Parenting Mistakes Parents Should Avoid : काही पॅरेंटीग टिप्स तुमचं काम एकदम सोपं करतील.

Four Parenting Mistakes Parents Should Avoid : Motivational Speaker BK Shivani Share One Rule For Parents | भारतीय पालक करतात या चुका; मुलं यशस्वी होण्यासाठी बी.के शिवानी सांगतात ४ टिप्स

भारतीय पालक करतात या चुका; मुलं यशस्वी होण्यासाठी बी.के शिवानी सांगतात ४ टिप्स

मोटिव्हेशनल स्पिकर बीके शिवानी (Motivational Speaker BK Shivani ) यांना तुम्ही सगळेजण ओळखत असाल योग्य जीवन जगण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी त्या नेहमची टिप्स देत असतात. (Parenting Tips) तुम्ही पहिल्यांदा पालक होत असाल  आणि तुमच्या मुलांच्या पालन पोषणात अडचणी येत असतील तर त्यात बीके शिवानी यांच्या टिप्स तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. बीके शिवाना मुलांना योग्य संगोपन देण्यासाठी पालकांना टिप्स देत असतात. काही पॅरेंटीग टिप्स तुमचं काम एकदम सोपं करतील. (Motivational Speaker BK Shivani Share One Rule For Parents)

मुलांची काळजी कशी घ्यावी?

बीके शिवानी सांगतात की, आई वडीलांनी कधीच आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करू नये.  प्रत्येक मुलगा आपलं स्वत:चं भाग्य घेऊन येत असतो. त्याला आपले कर्मांनुसार  वेगळी ओळख बनवावी लागते. आई वडीलांनी याकडे दुर्लक्ष करू नये. तुम्ही मुलांना आपल्या मुलांची कधीच इतरांशी तुलना करू नका.

मुलांची क्षमता वाढवा

प्रत्येक मुलांची वेगवेगळी पातळी आणि स्किल्स असतता. मुलाची क्षमता वाढवण्याकडे लक्ष द्यायला हवं. म्हणजेच त्यांच्याकडे  जे स्किल, टॅलेंट आहे त्यावर फोकस करा आणि त्यांना प्रोत्सानह द्या. मुलांना दिवसेंदिवस  एक उत्तम व्यक्ती बनवण्यासाठी प्रोत्साहन द्या. संस्कार मुलांना श्रेष्ठ बनवतील.

या गोष्टी बोलू नये

अनेक आई वडील दुसऱ्यांसमोर मुलांची तक्रार करतात की मुलं व्यवस्थित खात नाहीत. व्यवस्थित अभ्यास करत नाहीत. अभ्यासात मुलांचे मन नाही लागत पण मुलांसमोर अशा गोष्टी बोलणं टाळायला हवं. बीके शिवानी सांगतात की मुलांसमोर कधीच निगेटिव्ह स्टेटमेंट देऊ नये. 

मुलांची पर्सनॅलिटी चांगली राहील

मोटिव्हेशल स्पीकर शिवानी सांगतात की मुलांना असं वाटतं की आई वडील नेहमी योग्य असतात पण पालकांच्या गोष्टी मुलांच्या आचरणात आणण्यासाठी प्रत्येकाचा मेंदू तसा असेलच असं नाही. काही मुलांचा मेंदू कमी वेगाने काम करतो म्हणून त्यांना समजून घेऊन काम करा. तुम्ही मुलांना जे काही सांगता ते सर्व खरं असलं तरी मुलं काही गोष्टी पटकन कॅप्चर करत नाही त्यांना गोष्टी समजून घ्यायला वेळ लागतो. म्हणून मुलांना त्यांच्या क्षमतेनुसार समजावून सांगा.

Web Title: Four Parenting Mistakes Parents Should Avoid : Motivational Speaker BK Shivani Share One Rule For Parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.