Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुलांना सतत खोकला-एकदा झालेला खोकला बराच होत नाही? ‘या’ गंभीर आजाराचा धोका-दवाखाना गाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 15:13 IST

Children Health :डॉक्टर सांगतात की, लहान मुलांमध्ये जास्त दिवस राहणारा खोकला कधी कधी गंभीर निमोनियाचा प्राथमिक संकेत असू शकतो.

Children Health : लहान मुलांना सतत खोकला होणं, सर्दी होणं सामान्य आहे. पण प्रत्येकवेळी लहान मुलांच्या खोकल्याला सामान्य समजणं चुकीचं ठरेल. जास्तीत जास्त घरांमध्ये आई-वडील लहान मुलांना खोकला झाला की, लगेच काहीना काही घरगुती उपाय करतात. काहीतरी चाटण बनवून त्यांना देतात किंवा मग घरात ठेवलेलं एखादं औषध देतात. पण कधी कधी जास्त दिवस टिकून राहणारा खोकला हा एखाद्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकतो. डॉक्टर सांगतात की, लहान मुलांमध्ये जास्त दिवस राहणारा खोकला कधी कधी गंभीर निमोनियाचा प्राथमिक संकेत असू शकतो. त्यामुळे खोकल्याकडे दुर्लक्ष करणं लहान मुलांसाठी घातक ठरू शकतं.

निमोनिया हा एक असा आजार आहे जो फुप्फुसांचं नुकसान करतो. पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना हा आजार होतो. खासकरून नवजात बाळांसाठी हा आजार अधिक घातक ठरू शकतो. एका रिपोर्टमधून समोर आलंय की, दरवर्षी लाखो मुलांचा जीव या आजारामुळे जातो. खासकरून अशा भागांमध्ये जिथे उपचार आणि जागरूकतेची कमी आहे.

कधी करावी काळजी?

काही एक्सपर्ट सांगतात की, जर मुलांना सतत खोकला येत असेल आणि सोबतच ताप आला असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल, छाती वर-खाली होत असेल, सुस्त वाटत असेल तर या गोष्टी सामान्य समजून कानाडोळा करू नका. कारण ही सगळी लक्षणं निमोनियाकडे इशारा करतात. अनेकदा असंही बघण्यात येतं की, लहान मुलांमध्ये आजार वेगाने पसरतो, त्यामुळे त्याची ओळख पटवणं गरजेचं असतं. बरेच पालक याला सामान्य व्हायरल इन्फेक्शन समजून कानाडोळा करतात.

कसा होतो निमोनिया? 

निमोनिया सामान्यपणे बॅक्टेरिया, व्हायरस किंवा फंगसमुळे होते. लहान मुलांची इम्युनिटी कमजोर असल्याने त्यांना इन्फेक्शन लवकर होतं. त्यामुळे ते लवकर आजारी पडतात किंवा त्यांना एखाद्या आजाराची लागण लगेच होते.

बचावाचे उपाय?

 मुलांचं लसीकरण वेळोवेळी करा.  

थंडी आणि प्रदूषणापासून दूर ठेवा.  

हिरव्या भाज्या, फळं, ड्रायफ्रूट्स असा हेल्दी आहार द्या. 

खोकला किंवा ताप जास्त दिवस राहिला तर डॉक्टरांना दाखवा.

English
हिंदी सारांश
Web Title : Persistent cough in children could signal serious pneumonia: Don't ignore!

Web Summary : Prolonged coughs in children, often dismissed, can indicate pneumonia, especially in young children. Symptoms like fever, breathing issues, and lethargy require immediate attention. Prevention includes timely vaccination, avoiding cold and pollution, and a healthy diet. Consult a doctor for persistent coughs.
टॅग्स :पालकत्वहेल्थ टिप्सआरोग्य