Lokmat Sakhi >Parenting > कलिंगड बियांसह खाणं लहान मुलांसाठी फार फायद्याचं! आहारतज्ज्ञ सांगतात, बिया फेकून देणं चूक कारण..

कलिंगड बियांसह खाणं लहान मुलांसाठी फार फायद्याचं! आहारतज्ज्ञ सांगतात, बिया फेकून देणं चूक कारण..

Healthy Fruits: लहान मुलांना कलिंगड देताना सुद्धा यातील बिया काढून फेकल्या जातात. पण ही एक मोठी चूक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 14:03 IST2025-05-16T13:23:14+5:302025-05-16T14:03:32+5:30

Healthy Fruits: लहान मुलांना कलिंगड देताना सुद्धा यातील बिया काढून फेकल्या जातात. पण ही एक मोठी चूक आहे.

Dietitian tells why children should eat watermelon with seeds | कलिंगड बियांसह खाणं लहान मुलांसाठी फार फायद्याचं! आहारतज्ज्ञ सांगतात, बिया फेकून देणं चूक कारण..

कलिंगड बियांसह खाणं लहान मुलांसाठी फार फायद्याचं! आहारतज्ज्ञ सांगतात, बिया फेकून देणं चूक कारण..

Healthy Fruits: उन्हाळ्यात भलेही फळांचा राजा आंबा असला तरी या दिवसांमध्ये आंब्यानंतर सगळ्यात जास्त खाल्लं जाणारं फळ म्हणजे कलिंगड असतं. गारेगार, गुलाबी कलिंगड शरीराला आतून ठेवण्यासाठी खूप फायदेशीर ठरतं आणि शरीराला अनेक पोषक तत्वही देतं. यातील भरपूर पाण्यामुळे शरीरात पाणी कमी होत नाही. कलिंगड खाताना तुम्ही सुद्धा अनेकदा अनुभवलं असेल की, बिया वैताग देतात. त्यामुळे जास्तीत जास्त लोक या बिया काढून फेकतात. लहान मुलांना कलिंगड देताना सुद्धा यातील बिया काढून फेकल्या जातात. पण ही एक मोठी चूक आहे. या बियांद्वारे शरीराला एक नाही तर अनेक फायदे मिळतात. डायटिशिअननं व्हिडिओद्वारे लहान मुलांना कलिंगडातील या बिया खाऊ देण्याच्या फायद्याबाबत माहिती दिली आहे. 

कलिंगड बियांसोबत खाण्याचे फायदे

डायटिशिअन सांगतात की, कलिंगडाच्या बियांमध्ये मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणा असतं, जे मुलांच्या हाडांना मजबूत करण्यास मदत करतं. तसेच या हेल्दी फॅंटही असतं, जे त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतं. यात प्लांट बेस्ड प्रोटीनही भरपूर असतं आणि सोबतच पचन व मेटाबॉलिज्म बूस्ट होण्यास फायदेशीर ठरतं.

मुलांची उंची वाढण्यासाठी फायदेशीर

जर तुमच्या लहान मुलाची उंची वाढत नसेल किंवा त्यांचा विकास योग्य पद्धतीनं होत नसेल तर त्यांना कलिंगडाच्या बिया खायला द्यायला हव्यात. डायटिशिअन सांगतात की, कलिंगडामध्ये आढळणाऱ्या हेल्दी फॅटनं मेंदुचा विकास अधिक चांगला होतो. कलिंगडात सेलेनियम नावाचं तत्व असतं, जे मोठ्या लोकांमधील ब्लड प्रेशर कमी करतं आणि थायरॉइडमध्ये आराम देतं.

कलिंगड खाण्याचे फायदे

कलिंगड खाल्ल्यानं पचन तंत्र मजबूत राहतं. तसेच यातील फायबरमुळे पोटासंबंधी आणि बद्धकोष्ठतेसंबंधी समस्या सुद्धा दूर होतात.

वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर कलिंगड खूप फायदेशीर ठरतं. जर वजन कंट्रोल ठेवायचं असेल तर नियमितपणे कलिंगड खाल्लं पाहिजे.

जर लहान मुलं योगा करत असतील तर कलिंगड आवर्जून द्यायला हवं. यानं पोट साफ राहतं आणि आसान करताना अस्वस्थता जाणवत नाही.

शरीरात वाढलेली सूज कमी करण्यासाठी सुद्धा कलिंगड फायदेशीर ठरतं. यातील व्हिटामिन सी, अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि लायकोपीन तत्वामुळे सूज आणि वेदना कमी होतात.

नियमितपणे कलिंगड खाणं त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर ठरतं. यातील पोषक तत्वांनी त्वचा तरूण दिसते आणि केसांची चांगली वाढ होते.
उन्हाळ्यात उष्माघातापासून बचाव करण्यासाठी कलिंगड खूप फायदेशीर ठरतं. कारण यात पाणी भरपूर असतं. 

Web Title: Dietitian tells why children should eat watermelon with seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.