Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Parenting > लहान मुलांना ४-४ दिवस शी होत नाही? ‘या’ गोष्टी करा, आयुष्यभरासाठी कॉन्स्टिपेशनचा त्रास टाळा

लहान मुलांना ४-४ दिवस शी होत नाही? ‘या’ गोष्टी करा, आयुष्यभरासाठी कॉन्स्टिपेशनचा त्रास टाळा

Constipation in Kids: लहान मुलांचं पोट रोज साफ होत नसेल तर या गोष्टीकडे थोडं गांभिर्याने बघणं गरजेचं आहे. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2026 15:27 IST2026-04-09T15:26:10+5:302026-04-09T15:27:58+5:30

Constipation in Kids: लहान मुलांचं पोट रोज साफ होत नसेल तर या गोष्टीकडे थोडं गांभिर्याने बघणं गरजेचं आहे. 

Children can't poop for 4 days? constipation in kids, how to get rid of constipation in kids  | लहान मुलांना ४-४ दिवस शी होत नाही? ‘या’ गोष्टी करा, आयुष्यभरासाठी कॉन्स्टिपेशनचा त्रास टाळा

लहान मुलांना ४-४ दिवस शी होत नाही? ‘या’ गोष्टी करा, आयुष्यभरासाठी कॉन्स्टिपेशनचा त्रास टाळा

बहुतांश लहान मुलांच्या बाबतीत एक गोष्ट कटाक्षाने जाणवते आणि ती म्हणजे त्यांच्या पोटाच्या तक्रारी. कित्येक मुलं अशी असतात ज्यांचं पोट २- ३ दिवस साफ होतच नाही. त्यामुळे मग पोटदुखीचा त्रास वाढतो. पोट दुखायला लागलं की व्यवस्थित जेवण होत नाही. पुरेसं जेवण नसलं की मग पुन्हा तब्येतीच्या वेगवेगळ्या तक्रारी डोकं वर काढू लागतात. खरंतर मुलांचं पोट रोज साफ व्हायला हवं आणि ते ही सकाळीच. पण प्रयत्न करूनही कित्येक मुलांच्या बाबतीत ते होताना दिसत नाही. यासाठी पालकांनी काय करायला हवं ते पाहुया..(Constipation in Kids)

 

मुलांचं पोट रोज साफ होण्यासाठी काय करायला हवं?

१. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मुलांचं दूध. काही घरांमध्ये मुलांवर अक्षरश: दुधाचा मारा केला जातो. सकाळ, दुपार, रात्र अशा तिन्ही वेळी मुलांना मोठमोठाले कप भरून दूध दिलं जातं.

लग्नाच्या पंगतीत असतो तसा बुंदी रायता करा घरीच, हलवाईने सांगितल्या ४ टिप्स, रायता होईल चटपटीत 

दूध पौष्टिक असलं तरी त्याचा अतिरेक नको. ते पचायला जड असतं. त्यामुळे तुमच्याही मुलांना जर पोट साफ  न होण्याचा त्रास नेहमीच होत असेल तर सगळ्यात आधी त्यांचं दूध कमी करून पाहा. दिवसाला १ कप दूध पुरेसं आहे.

 

२. दुसरी गोष्ट म्हणजे मैदा, साखर, वनस्पती तूप किंवा डालडा तूप ज्या पदार्थांमध्ये असतात असे पदार्थ मुलांना देणं टाळायला हवं. आरोग्याच्या दृष्टीने हे पदार्थ अजिबात चांगले नसून डॉक्टरी भाषेत त्यांना पांढरं विष म्हणून ओळखलं जातं.

प्रार्थना बेहेरेचं ब्यूटी सिक्रेट- तजेलदार त्वचा आणि सुंदर केसांसाठी ती करते फक्त ‘ही’ एक खास गोष्ट

त्यामुळेच या पदार्थांपासून तयार होणारे बिस्किट, ब्रेड, पाव, केक, पेस्ट्री असे पदार्थ मुलांपासून दूर ठेवा. कित्येक मुलं दूध तर पितातच पण त्यासोबत बिस्किटंही खातात. हे दोन्ही पदार्थ त्यांचा कॉन्स्टिपेशनचा त्रास वाढविणारे आहेत.

 

३. मुलांना खेळण्याच्या नादात पाणी पिणं लक्षात राहात नाही. त्यामुळे त्यांना अधूनमधून आठवण करून पाणी प्यायला लावा. ते किती पाणी पितात याकडे लक्ष द्या. तसेच जेवणात कोरड्या पदार्थांचं प्रमाण कमी करून पातळ पदार्थ वाढवा. वरणपोळी, पातळ भाजी आणि पोळी असं मुलं कुस्करून जेवली तरी त्यांचा कॉन्स्टपेशनचा त्रास बराच कमी होऊ शकतो.

 

Web Title : बच्चों में कब्ज: जीवन भर पाचन संबंधी समस्याओं से बचने के उपाय।

Web Summary : कई बच्चे कब्ज से पीड़ित हैं। दूध का सेवन कम करें, बिस्कुट और केक जैसे प्रोसेस्ड खाद्य पदार्थों से बचें, और पर्याप्त पानी का सेवन सुनिश्चित करें। उनके आहार में पानी वाले खाद्य पदार्थों की मात्रा बढ़ाएँ। ये बदलाव कब्ज को रोकने में मदद कर सकते हैं।

Web Title : Constipation in children: Tips to prevent lifelong digestive issues.

Web Summary : Many children face constipation. Reduce milk intake, avoid processed foods like biscuits and cakes, and ensure adequate water intake. Increase watery foods in their diet. These changes can help prevent constipation.