Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Parenting > लहान मुलांच्या तळपायांना मसाज करण्याचे ५ फायदे- शांत झोपतील, अभ्यासातही हुशार होतील

लहान मुलांच्या तळपायांना मसाज करण्याचे ५ फायदे- शांत झोपतील, अभ्यासातही हुशार होतील

Parenting Tips: रात्री झोपण्यापुर्वी मुलांच्या तळपायांना तेल लावून मसाज करण्याचे कित्येक फायदे आहेत...(benefits of giving feet massage to kids)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2026 12:52 IST2026-03-20T12:51:27+5:302026-03-20T12:52:27+5:30

Parenting Tips: रात्री झोपण्यापुर्वी मुलांच्या तळपायांना तेल लावून मसाज करण्याचे कित्येक फायदे आहेत...(benefits of giving feet massage to kids)

benefits of giving feet massage to kids, 5 amazing benefits of giving feet massage to kids  | लहान मुलांच्या तळपायांना मसाज करण्याचे ५ फायदे- शांत झोपतील, अभ्यासातही हुशार होतील

लहान मुलांच्या तळपायांना मसाज करण्याचे ५ फायदे- शांत झोपतील, अभ्यासातही हुशार होतील

Highlightsमुलांच्या पायांना नियमितपणे मसाज केल्यास त्यांची एकाग्रता, स्मरणशक्ती वाढते. याचा खूप चांगला परिणाम अभ्यासावर दिसून येतो. 

घरात लहान मुलं असली की आईला त्यांच्या मागे दिवसभर पळावं लागतं. मुलांचं सतत काही ना काही सुरू असतं आणि आईला त्यांचे सगळे हट्ट पुरे करत दिवसभर त्यांच्यामागे उभंच राहावं लागतं. या सगळ्या धावपळीत मग रात्री आईला बिचारीला कधी एकदा झोपते असं होऊन जातं, पण मुलांचा उत्साह मात्र कमी झालेलाच नसतो. हल्ली बरीच मुलं रात्री उशिरापर्यंत जागत बसतात. मुलांचं हे जागरण कमी करण्यासाठी आणि त्यांच्या तब्येतीला इतरही अनेक फायदे मिळवून देण्यासाठी कितीही थकला असलात तरी ५ मिनिटं काढा आणि मुलांच्या तळपायांना मसाज करा. यामुळे काय फायदे होतात आणि मसाज नेमकी काेणत्या पद्धतीने करायची ते पाहुया...(benefits of giving feet massage to kids)

 

मुलांच्या तळपायांना कशा पद्धतीने मालिश करावी?

मुलांच्या तळपायांना मसाज करण्यासाठी तुम्ही घरात नेहमीच असणारं साधं खोबरेल तेलही वापरू शकता. यासाठी खोबरेल तेल एका वाटीमध्ये घ्या आणि गरम करा. या गरम तेलानेच मुलांच्या तळपायांना मसाज करा.

उन्हाळ्यात टॅनिंगचं टेन्शनच सोडा- 'हा' घरगुती लेप लावून चेहरा धुवा, त्वचा काळवंडणारच नाही

यामध्ये मसाज करत करत पायाच्या सगळ्या प्रेशर पॉईंट्सवर दाब द्या. मुलांच्या तळपायांना मालिश करण्यासाठी बदामाचं तेल, तिळाचं तेल, मोहरीचं तेल किंवा साजुक तूपही वापरू शकता.

Image credit: Google

रात्री झोपण्यापुर्वी मुलांच्या तळपायांना मसाज करण्याचे फायदे 

रात्री झोपण्यापुर्वी मुलांच्या तळपायांना मसाज केल्याने कोणकोणते फायदे होऊ शकतात, याविषयीची माहिती एक्सपर्टने yogjourney या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. 

यामध्ये त्यांनी सांगितलं की मुलांच्या तळपायांना जर नियमितपणे मसाज केली तर त्यामुळे त्यांचं बॉडी पोश्चर सुधारण्यास मदत होते. शिवाय त्यांना स्वत:चं बॅलेन्सिंग खूप चांगल्या पद्धतीने आणि लवकर जमतं.

चैत्र नवरात्री: उपवास करताना ५ नियम पाळा, अशक्तपणा येऊन डिहायड्रेशन होणार नाही

दिवसभर मुलांना आलेला थकवा कमी होण्यास मदत होते. त्यामुळे त्यांना रात्री लवकर आणि शांत झोप येते.

मुलांच्या पायांना नियमितपणे मसाज केल्यास त्यांची एकाग्रता, स्मरणशक्ती वाढते. याचा खूप चांगला परिणाम अभ्यासावर दिसून येतो. 


Web Title : बच्चों के तलवों की मालिश के 5 फायदे: बेहतर नींद, तेज दिमाग!

Web Summary : बच्चों के पैरों की गर्म तेल से मालिश करने से मुद्रा और संतुलन में सुधार होता है, थकान कम होती है, आरामदायक नींद आती है और एकाग्रता और याददाश्त बढ़ती है, जिससे पढ़ाई में फायदा होता है। नारियल, बादाम, तिल, सरसों का तेल या घी का प्रयोग करें।

Web Title : 5 Benefits of Foot Massage for Kids: Better Sleep, Smarter!

Web Summary : Massaging children's feet with warm oil improves posture, balance, reduces tiredness, promotes restful sleep, and enhances concentration and memory, benefiting their studies. Use coconut, almond, sesame, mustard oil, or ghee.