Join us

आलिया भटने लेकीचे सोशल मीडियातले सगळे फोटो डिलिट केले! पण तुमच्या मुलांच्या फोटोचं काय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2025 15:33 IST

Alia Bhatt Removes All Pictures Of Daughter Raha Kapoor From Social Media: आलिया भटने तिच्या लेकीचे म्हणजेच राहा कपूरचे सगळे फोटो सोशल मिडियावरून काढून टाकले आहेत. सैफ अली खानवर नुकताच झालेल्या हल्ल्यामुळे तर तिने हे पाऊल उचलले नसेल ना असंही बोललं जात आहे. 

ठळक मुद्देआपल्या मुलांच्या सुरक्षिततेला त्यानं धोका निर्माण होतो. हे सगळं महत्वाचं आहे ते आलिया भटसारखंच आपणही पालकांनी लक्षात ठेवायला हवं.

आलिया भटने तिच्या मुलीचे राहाचे सर्व फोटो व्हिडिओ सोशल मीडियातून काढून टाकण्याचा निर्णय घेतल्या असल्याची बातमी आहे. खरंतर सेलिब्रिटी पालकांनीच नाही तर कुणाही पालकांनी मीडियात मुलांचे फोटो टाकणं अत्यंत धोक्याचं असतं. आपल्या लहान मुलांचे फोटो, व्हिडिओ त्यांचे किस्से फोटोसह लिहिणे म्हणजे त्यांच्या डिजिटल फूटप्रिण्ट तयार करणं धोक्याचं आहे. त्या माहितीचा, फोटोंचा कोण कसा वापर करेल याची काही खात्री नाही. लहान मुलांचे पॉर्नसाठी उपयोग करणारे अतिशय भयंकर उद्योगपण सर्रास सुरु असतात. आणि मुख्य म्हणजे आपल्या मुलांच्या सुरक्षिततेला त्यानं धोका निर्माण होतो. हे सगळं महत्वाचं आहे ते आलिया भटसारखंच आपणही पालकांनी लक्षात ठेवायला हवं.(Alia Bhatt Removes All Pictures Of Daughter Raha Kapoor From Social Media)

 

राहाचा जन्म झाल्यानंतर आलिया आणि रणबीर या दोघांनीही ठरवून तिचा चेहरा मीडियासमोर येऊ दिला नव्हता. राहा १ वर्षाची झाल्यानंतर त्यांनी तिला पहिल्यांदा मीडियासमोर आणलं आणि तेव्हापासून राहा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आहे.

रोज नियमितपणे ताक प्या! वजन कमी होण्यासाेबतच मिळतील ८ जबरदस्त फायदे- सौंदर्यही खुलेल

राहाची ही लोकप्रियता तिच्यासाठी धोकादायक ठरू शकते का, हा विचार आई म्हणून आलियाच्या मनात येणं अगदी साहजिक आहे. त्यात मध्यंतरी सैफ अली खानवर झालेला हल्ला आणि हल्लेखोराने सैफच्या मुलांच्या खोलीत घुसण्याचा केलेला प्रयत्न अशा गोष्टीही झाल्याच.. या सगळ्याचा परिणाम म्हणूनही आलियाने हा निर्णय घेतला असावा का असंही बोललं जात आहे.

 

सैफचा किस्सा झाल्यानंतर एकदा आलियाने, एकदा नितू कपूर यांनी तर एकदा करिना कपूरनेही वेगवेगळ्या वेळी पापाराझींना मुलांचे फोटो घेऊ नका म्हणून विनंती केली होती. पण त्यांच्या विनंतीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. खरंतर सोशल मीडियावर स्वत:ची शेअर केलेली कोणतीच माहिती सुरक्षित नसते.

फ्रिजमध्ये 'हे' पदार्थ २४ तासांपेक्षा जास्त वेळ ठेवू नका, आरोग्यासाठी ठरतात अतिशय घातक

मग मुलांच्या फोटोची काय बात.. आलियासारख्या सेलिब्रिटींनाही याची धास्ती वाटते तर सामान्य लोकांचं काय.. आलियाच्या या कृतीवरून आपणही आपले सोशल मीडिया अकाउंट, त्यावर शेअर केलेली मुलांची, स्वत:ची माहिती, फोटो हे सगळं एकदा तपासून घेतले आणि सोशल मीडियावर काहीही पोस्ट करताना ते खरंच योग्य आहे ना, याची एकदा स्वत:शीच खात्री करण्याची सवय लावून घेतली तर? आता आलियाच्या पाठोपाठ राहाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करणारा रणबीर आणि त्यांच्या कुटूंबातले इतर लोकही असंच पाऊल उचलतील का याकडे अनेकांचं लक्ष आहे. 

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलंआलिया भटरणबीर कपूरसोशल मीडियाइन्स्टाग्राम