Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Parenting > हिमोग्लाेबिन कमी असल्याने मुलं नेहमीच आजारी पडतात - अशक्त असतात? ५ टिप्स- लोह वाढेल भराभर

हिमोग्लाेबिन कमी असल्याने मुलं नेहमीच आजारी पडतात - अशक्त असतात? ५ टिप्स- लोह वाढेल भराभर

Iron Deficiency in Kids: बहुतांश लहान मुलांचं हिमोग्लोबिन खूप कमी असतं ते वाढविण्यासाठी नेमकं काय करायला हवं ते पाहुया..(5 tips to improve hemoglobin level in kids)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2026 09:40 IST2026-04-02T09:36:18+5:302026-04-02T09:40:01+5:30

Iron Deficiency in Kids: बहुतांश लहान मुलांचं हिमोग्लोबिन खूप कमी असतं ते वाढविण्यासाठी नेमकं काय करायला हवं ते पाहुया..(5 tips to improve hemoglobin level in kids)

5 tips to improve hemoglobin level in kids, how to get rid of iron deficiency in kids | हिमोग्लाेबिन कमी असल्याने मुलं नेहमीच आजारी पडतात - अशक्त असतात? ५ टिप्स- लोह वाढेल भराभर

हिमोग्लाेबिन कमी असल्याने मुलं नेहमीच आजारी पडतात - अशक्त असतात? ५ टिप्स- लोह वाढेल भराभर

काही अपवाद सोडले तर बहुतांश लहान मुलांच्या पालकांची हीच तक्रार असते की मुलं खाण्यास खूप किरकिर करतात. त्यांना दिलेला भाजी- पोळीचा डबाही धड संपवत नाहीत. त्यामुळे मग मुलांमध्ये वेगवेगळ्या घटकांची कमतरता दिसून येते. त्यापैकी एक म्हणजे हिमोग्लोबिन. बऱ्याच मुलांचं हिमोग्लोबिन कमी असतं. वाढत्या वयाच्या मुलांमध्ये लोह कमी असेल तर त्यांना नेहमीच थकवा, अशक्तपणा जाणवतो. अंगात एनर्जीच नसते. त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावरही होतो. कारण अभ्यासात लक्ष लागत नाही. मन एकाग्र होत नाही. हे सगळं टाळायचं असेल तर मुलांच्या शरीरातील लोह वाढविणे खूप गरजेचे आहे (5 tips to improve hemoglobin level in kids). त्यासाठी नेमकं काय करायला हवं ते पाहा...(how to get rid of iron deficiency in kids?)

मुलांच्या शरीरातील लोह वाढविण्यासाठी उपाय

 

मुलांचं हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी पालकांना आणि विशेषत: आईला थोडा जास्त प्रयत्न करणं गरजेचं आहे. यासाठी मुलांना कोणत्याही एका पदार्थाचा आग्रह करू नका. लोह वाढविण्याचे बरेच वेगवेगळे पर्याय आहेत. त्यापैकी पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा, असं डॉ. अमित गव्हाडे यांनी इंडिया टीव्हीला सांगितलं. 

उन्हाळ्यात पालेभाज्या आधीच महाग आणि सुकतातही लवकर? २ टिप्स, ८ दिवस फ्रेश राहतील भाज्या

त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे मुलांना आवडत असतील तर स्ट्रॉबेरी, संत्री, द्राक्ष, किवी अशी व्हिटॅमिन सी असणारी फळं भरपूर खाऊ द्या. कारण त्यातून मिळणाऱ्या व्हिटॅमिन सी मुळे शरीरात लोह शोषून घेण्यास मदत होते.

मुलं लोहयुक्त भाज्या पोळीसोबत खायला नाही म्हणत असतील तर सूपच्या माध्यमातून त्या द्या. पालक, ब्रोकोली यांचे सूप मुलांना जास्तीतजास्त प्रमाणात पिऊ घाला.

 

हल्ली बाजारात लोह भरपूर असणारे फोर्टीफाईड सिरिल्स, ओट्स मिळतात. नाश्त्यासाठी हे पदार्थही मुलांना देऊ शकता.

भुमी पेडणेकर सांगतेय वेटलॉस सिक्रेट, म्हणते चित्रपटांसाठी वजन वाढवणं- कमी करणं आता पुरे, कारण...

मुलांना लोहयुक्त पदार्थ देताना त्यामध्ये कॅल्शियम जास्त असणारे पदार्थ मिसळू नका. कारण लोहयुक्त पदार्थांसोबत दूध, दही, पनीर असे कॅल्शियम भरपूर असणारे पदार्थ घातले तर शरीरात लोह शोषून घेण्यास अडथळा येतो.  

वरील उपाय करूनही मुलांच्या शरीरातलं लोह वाढतच नसेल तर अशावेळी डाॅक्टरांचा सल्ला घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांना टॉनिक आणि आहार देणं जास्त चांगलं. 
 

Web Title : क्या कम हीमोग्लोबिन आपके बच्चे को बीमार कर रहा है? 5 आयरन बढ़ाने के उपाय

Web Summary : बच्चों में आयरन की कमी थकान का कारण बनती है और पढ़ाई को प्रभावित करती है। विटामिन सी वाले फल, सूप (पालक, ब्रोकोली) और फोर्टिफाइड अनाज से आयरन बढ़ाएं। आयरन के साथ कैल्शियम युक्त खाद्य पदार्थों से बचें। स्तर में सुधार न होने पर डॉक्टर से सलाह लें।

Web Title : Is Low Hemoglobin Making Your Child Sick? 5 Iron-Boosting Tips

Web Summary : Low iron in kids causes fatigue and affects studies. Boost iron with Vitamin C fruits, soups (spinach, broccoli), and fortified cereals. Avoid calcium-rich foods with iron. Consult a doctor if levels don't improve.