अलिकडेच कफ सिरपमधील (Cough Syrup) एका विषारी घटकामुळे लहान मुलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ज्यामुळे पालकांच्या मनात धडकी भरली आहे. कारण एरवी मुलांना सर्दी खोकला झाल्यानंतर सहज वापरले जाणारे कफ सिरप आता धोक्याची घंटा बनले आहे (Simple Precautions For Parents While Giving Cough Syrup). पालकांनी घाबरून न जाता अधिक जागरूक आणि जबाबदार राहण्याची गरज आहे. मुलांच्या औषधोपचाराबाबत काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. (5 Thing Parents Must Check Before Giving Medicine To Kid)
1) सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वत:च्या मनानं मुलांना औषधं देणं पूर्णपणे टाळा. ताप, सर्दी किंवा खोकला असल्यास घरात उपलब्ध असलेल्या जुन्या बाटलीतील सिरप देऊ नका. नेहमी बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि प्रस्क्रिप्शननुसार औषधं घ्या.
2) सिरप घेण्यापूर्वी औषधाची एक्सपायरी डेट तपासून घ्या. जुनी किंवा डेट संपलेली औषधं चुकूनही वापरू नका. शक्य असल्यास सिरपमधील मुख्य घटक डॉक्टरांकडून समजून घ्या. अलिकडील घटनांमध्ये उल्लेख झालेले डायथिलीन ग्लायकॉल किंवा इथिलीन ग्लायकॉल सारखे विषारी घटक यात नसतील याची खात्री करा.
3) डॉक्टरांनी सांगितलेला तितकाच अचून डोस मेजरिंग कपच्या साहाय्यानं द्या. चमच्यानं औषध देऊ नका. अनेक कप सिरप २ वर्षांखालील मुलांसाठी सुरक्षित मानले जात नाही. कारण त्यांच्या श्वसन प्रणालीवर परीणाम होऊ शकतो. लहान बाळांना सिरप देण्यापूर्वी डॉक्टांना स्पष्टपणे त्यांच्या वयाबद्दल सांगा आणि या वयोगटासाठी सुरक्षित आहे की नाही ते विचारून घ्या.
4) लहान मुलांमध्ये खोकला किंवा सर्दीची सौम्य लक्षणं आढळल्यास लगेच औषधांकडे वळण्याऐवजी नैसर्गिक उपायांचा विचार करा. वाफ घेणे, ओव्याचा शेक असे घरगुती उपाय करा ज्यामुले मुलांना आराम मिळतो आणि शरीरावर औषधांचा ताण येत नाही.
5) कोणतंही औषध मुलांना देण्याआधी दोनदा तपासणी करा.औषध दिल्यानंतर मुलांना उलटी, श्वास घेण्यास त्रास, त्वचेत असामान्य बदल किंवा खूप झोप येत असेल तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा. डॉक्टरांना कफ सिरपचा ब्रॅण्ड विचारणंसुद्धा आवश्यक आहे. मुलांचे वय आणि वजन लक्षात घेऊन अचूक डोस देणं आवश्यक आहे.