Lokmat Sakhi >Parenting > पाठांतर करुनही मुलं वाचलेलं विसरतात? ४ टिप्स, अभ्यास राहील नीट लक्षात

पाठांतर करुनही मुलं वाचलेलं विसरतात? ४ टिप्स, अभ्यास राहील नीट लक्षात

4 ways students can remember what they read : ४ सोप्या युक्त्या, पाठांतर करा नीट आणि लक्षात राहील छान..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2024 05:56 PM2024-03-20T17:56:55+5:302024-03-21T08:34:47+5:30

4 ways students can remember what they read : ४ सोप्या युक्त्या, पाठांतर करा नीट आणि लक्षात राहील छान..

4 ways students can remember what they read | पाठांतर करुनही मुलं वाचलेलं विसरतात? ४ टिप्स, अभ्यास राहील नीट लक्षात

पाठांतर करुनही मुलं वाचलेलं विसरतात? ४ टिप्स, अभ्यास राहील नीट लक्षात

मुलांच्या विकासासाठी (Parenting Tips) निरोगी स्मरणशक्ती महत्वाची. मुलाच्या कमकुवत स्मरणशक्तीच्या समस्येमुळे काही पालक चिंतेत असतात. ज्यामुळे मुलं अभ्यास करण्यास टाळाटाळ करतात. शिवाय अभ्यास केलेलं काहीही लक्षात राहत नाही. मुख्य म्हणजे अभ्यासासोबतच सर्व क्षेत्रांमध्ये शिकण्याचा आणि विकसित करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. अनेक मुलांची स्मरणशक्ती खूप कमकुवत असते.

सुरुवातीला पालक आपल्या मुलाच्या कमकुवत स्मरणशक्तीकडे दुर्लक्ष करतात. पण पुढे जाऊन ही समस्या आणखीन वाढत जाते (Child Care). या समस्येकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा आपण मुलांकडे वेळीच लक्ष देऊन त्यांची स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करू शकता. यामुळे मुलं परीक्षेत टॉप करतील, शिवाय चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होतील(4 ways students can remember what they read).

मुलांची स्मरणशक्ती आणि अभ्यासप्रती गोडी निर्माण व्हावी यासाठी काही टिप्स

- आपल्या मुलांनी लक्ष केंद्रित करावे असे वाटत असेल तर, त्यांच्या मागे अभ्यास कर म्हणून सारखं तगादा लावू नका. त्यांना सतत अभ्यासाला बसवू नका. मधेच ब्रेक द्या. त्या विश्रांती दरम्यान, शारीरिक हालचाली करायला सांगा. यामुळे मुलं आणखीन गोडीने अभ्यास करायला बसतील.

भाज्यांची सालं काढण्याची एक कमाल हटके युक्ती, काम होईल झटपट-भाज्या करा पटपट

- ब्रेक घेतल्यानंतर मुलांना उजळणी करायला सांगा. यामुळे त्यांना वाचलेलं सहज लक्षात राहील. ही युक्ती मुलांना परीक्षेत चांगले गुण मिळवण्यास मदत करेल. याशिवाय मुलाला स्वतः नोट्स बनवायला सांगा. यामुळे बऱ्याच गोष्टी स्मरणात राहतात. मुलाची स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यासाठी, त्यांना नोट्स लिहायला सांगा.

- मुलांची स्मरणशक्ती सुधारण्यासाठी त्यांचा अभ्यास मनोरंजक बनवा. म्हणजे सहज लक्षात राहील अशा काही टिप्स देऊन शिकवा. मुलांना ग्रुपमध्ये अभ्यास करायला सांगा. ग्रुप स्टडीमध्ये ज्ञानाची देवाण घेवाण होते. शिवाय वाचलेलं कायम लक्षात राहील. यासह नमुने वापरून शिकवा. यामुळे वाचलेलं लक्षात राहील.

उडीद डाळच कशाला? कपभर रव्याचे करा क्रिस्पी मेदू वडे; आतून सॉफ्ट-बाहेरून कुरकुरीत; करा १५ मिनिटात

- मुलांना मनात कोणताही विषय वाचला तर, पटकन लक्षात राहत नाही. शिवाय मनात वाचलेल्या गोष्टी मुलं लवकर विसरून जातात. त्यामुळे मुलं जे काही वाचत असतील तर, त्यांना मोठ्याने वाचायला सांगा. हे त्यांना त्यांचा स्वतःचा आवाज ऐकण्यास भाग पाडेल आणि लक्षात ठेवणे सोपे होईल.

- मुलांच्या स्मरणशक्तीत भर देण्यासाठी त्यांना अँटिऑक्सिडंट्स आणि ओमेगा -३ फॅटी ऍसिडयुक्त पदार्थ खायला द्या. शिवाय व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी१, बी१२, बी६, लोह, आयोडीनयुक्त पदार्थ मुलांच्या मेंदूला चालना देण्यास मदत करतात.

Web Title: 4 ways students can remember what they read

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.