lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > उडीद डाळच कशाला? कपभर रव्याचे करा क्रिस्पी मेदू वडे; आतून सॉफ्ट-बाहेरून कुरकुरीत; करा १५ मिनिटात

उडीद डाळच कशाला? कपभर रव्याचे करा क्रिस्पी मेदू वडे; आतून सॉफ्ट-बाहेरून कुरकुरीत; करा १५ मिनिटात

Instant Rava Medu Vada in 15 Mins - Crispy Breakfast : रव्याचे मेदू वडे कधी करून पाहिलं आहे का? या विकेंडला हा नाश्ता करून पाहाच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2024 01:22 PM2024-03-20T13:22:08+5:302024-03-21T08:33:58+5:30

Instant Rava Medu Vada in 15 Mins - Crispy Breakfast : रव्याचे मेदू वडे कधी करून पाहिलं आहे का? या विकेंडला हा नाश्ता करून पाहाच..

Instant Rava Medu Vada in 15 Mins - Crispy Breakfast | उडीद डाळच कशाला? कपभर रव्याचे करा क्रिस्पी मेदू वडे; आतून सॉफ्ट-बाहेरून कुरकुरीत; करा १५ मिनिटात

उडीद डाळच कशाला? कपभर रव्याचे करा क्रिस्पी मेदू वडे; आतून सॉफ्ट-बाहेरून कुरकुरीत; करा १५ मिनिटात

दाक्षिणात्य पदार्थांमध्ये मेदू वडा (Medu Vada) फार फेमस आहे. मेदू वडा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्ससाठी एक उत्तम पर्याय आहे. मेदू वडा खाल्ल्याने पोट तर भरतेच शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. मेदू वडा तयार करण्यासाठी अधिक वेळ लागत नाही. उडीद डाळ भिजत घालून आपण कुरकुरीत मेदू वडे घरी तयार करतो (Cooking Tips). बऱ्याचदा घरात उडीद डाळ उपलब्ध नसते. किंवा डाळ भिजत घालायला आपण विसरतो. पण मेदू वडा खाण्याची आपल्याला तीव्र इच्छा होत असेल तर, उडीद डाळीचा वापर न करता आपण रव्याचे क्रिस्पी मेदू वडे तयार करू शकता (Kitchen Tips and Tricks).

रव्याचे मेदू वडे हे बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असतात. रोजचे पोहे, उपमा, इडली-डोसे खाऊन कंटाळा आला असेल तर, एकदा ही रेसिपी नक्कीच करून पाहा. झटपट क्रिस्पी डिश काही मिनिटात तयार होईल(Instant Rava Medu Vada in 15 Mins - Crispy Breakfast).

रव्याचे क्रिस्पी मेदू वडे करण्यासाठी लागणारं साहित्य

रवा

मीठ

आलं

कडीपत्ता

हिरवी मिरची

नारळातून खोबरं काढणं होईल सोपं, २ भन्नाट ट्रिक्स! कष्ट विसरा- खोबरं मिळेल झटपट

कोथिंबीर

चिली फ्लेक्स

तेल

कृती

सर्वप्रथम, एका कढईत २ कप पाणी गरम करण्यासाठी ठेवा. गॅस मध्यम आचेवर ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, एक टेबलस्पून किसलेलं आलं, चिरलेला कडीपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालून मिक्स करा.

चवळी भिजत न घालता, झणझणीत हॉटेलस्टाईल उसळ करण्याची सोपी कृती; १० मिनिटात उसळ तयार

पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात एक कप रवा घालून मिक्स करा. २ ते ३ मिनिटांसाठी त्यावर झाकण ठेवा. गॅस मध्यम आचेवर ठेऊन वाफेवर रवा शिजवून घ्या. २ मिनिटानंतर गॅस बंद करा, व तयार उपमा एका प्लेटमध्ये काढून घ्या. हाताला एक चमचा तेल लावा, आणि रव्याचा उपमा मळून घ्या.

मळलेल्या पीठाचे गोळे तयार करून मेदू वड्याचा आकार द्या. दुसरीकडे एका कढईत तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. कडकडीत तेलात वडे सोडून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. अशा प्रकारे क्रिस्पी मेड वडे खाण्यासाठी रेडी. आपण हे मेदू वडे चटणीसोबत खाऊ शकता.

Web Title: Instant Rava Medu Vada in 15 Mins - Crispy Breakfast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.