Lokmat Sakhi >Parenting > उन्हाळी सुटीनंतर मुलांना अभ्यासाचा कंटाळा येतोय? ३ टिप्स- हसत खेळत भरपूर अभ्यास करतील...

उन्हाळी सुटीनंतर मुलांना अभ्यासाचा कंटाळा येतोय? ३ टिप्स- हसत खेळत भरपूर अभ्यास करतील...

How to Encourage Good Study Habits in a Child: भली मोठी उन्हाळी सुटी संपल्यानंतर पुन्हा अभ्यासाला बसणं मुलांच्या जिवावर येतंच..(3 ways to help children focus on studies)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2025 09:20 IST2025-06-24T09:15:59+5:302025-06-24T09:20:01+5:30

How to Encourage Good Study Habits in a Child: भली मोठी उन्हाळी सुटी संपल्यानंतर पुन्हा अभ्यासाला बसणं मुलांच्या जिवावर येतंच..(3 ways to help children focus on studies)

3 tips your child will do better studies, How to Encourage Good Study Habits in a Child, 3 ways to help children focus on studies | उन्हाळी सुटीनंतर मुलांना अभ्यासाचा कंटाळा येतोय? ३ टिप्स- हसत खेळत भरपूर अभ्यास करतील...

उन्हाळी सुटीनंतर मुलांना अभ्यासाचा कंटाळा येतोय? ३ टिप्स- हसत खेळत भरपूर अभ्यास करतील...

उन्हाळी सुटी संपून आता पुन्हा एकदा नुकतीच शाळांना सुरुवात झाली आहे. शाळा सुरू होतात तेव्हा सुरुवातीचे २- ४ दिवस मुलांना खूप उत्साह असतो. कारण नवा वर्ग, नवी पुस्तकं, नवे दप्तर अशा गोष्टींमुळे ते एकदम आनंदात, उत्साहात असतात. पण जसा जसा नव्या गोष्टींचा उत्साह मावळत जातो, तशीतशी मुलांना शाळा आणि अभ्यासही कंटाळवाणा होत जातो. मुलं शाळेत तर जातात, पण घरी आल्यानंतर अभ्यास करण्याचा त्यांना जाम कंटाळा येतो. कारण सुटीमुळे अभ्यासाची सवय पार मोडलेली असते (3 ways to help children focus on studies). मुलांना पुन्हा अभ्यासाकडे वळवायचं असेल तर या काही साध्यासोप्या गोष्टी करून पाहा...(How to Encourage Good Study Habits in a Child?)

मुलांचं अभ्यासात मन रमावं म्हणून काय करावं?

 

१. अभ्यासाचे तास

हा खूप महत्त्वाचा विषय आहे. तुमची मुलं सुटी लागण्याच्या आधी जर २ तास अभ्यास करत असतील तर यावर्षीही शाळा सुरू झाल्या झाल्या त्यांनी लगेचच २ तास पुस्तक हातात घेऊन् बसावं ही अपेक्षा करू नका.

सतत थकवा येतो, घशाला कोरड पडते? ‘या’ पद्धतीने पाणी प्या- मिळते एनर्जी आणि त्रासही होत नाही..

एकदम जास्त वेळ अभ्यासाला बसवलं तर ती कंटाळतील. त्यामुळे हळूहळू त्यांचा अभ्यासाचा वेळ वाढवत न्या. सुरुवातीला त्यांनी अभ्यासाला बसणं हेच गरजेचं आहे.

 

२. आवडीचे विषय

मुलांच्या आवडीच्या विषयापासून अभ्यासाला सुरुवात केली तर त्यांचा उत्साह टिकून राहातो. नेहमीच आवडीच्या विषयांचा अभ्यास करून उपयोग नाही हे अगदी खरं.

नाश्ता करताना लक्षात ठेवा ८ गोष्टी, कोलेस्टेरॉल-मधुमेह-वाढत्या वजनाचं टेन्शनच होईल कमी!

पण आता सुरुवातीला त्यांना अभ्यासाची गोडी लागण्यासाठी काही दिवस आवडीचा विषय रोज थोडा वेळ का असेना पण करू द्या.

 

३. ग्रुप स्टडी

मुलांच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना तुमच्याघरी अभ्यासाला बोलवा आणि त्यांना एकत्रित बसून अभ्यास करायला लावा. अर्थात ते अभ्यास खरंच करत आहेत की नाही याकडे तुम्हाला लक्ष ठेवावंच लागेल.

सोन्याचांदीच्या महागड्या दागिन्यांपेक्षा २०० रुपयांचे टेराकोटा दागिने खाऊन जातील भाव! स्टायलिश, ट्रेण्डी १० डिझाईन्स

मुलं एकत्र आले की गप्पाही मारतील, पण ग्रुप स्टडीमध्ये एकमेकांचं पाहून मुलं शिकतात आणि नेटाने अभ्यासही करतात. सुरुवातीचेे काही दिवस हा प्रयोग करून पाहा.. 

 

Web Title: 3 tips your child will do better studies, How to Encourage Good Study Habits in a Child, 3 ways to help children focus on studies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.