Join us

ना चिडचिड ना रट्टे-लहान मुलांना शिस्त शिकवण्यासाठी ३ प्रेमळ टिप्स, मुलांना लागेल योग्य वळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 12:29 IST

Child Care Tips : चाइल्ड स्पेशलिस्ट डॉ. अर्पित गुप्ता यांनी चिमुकल्यांना शिस्त लावण्यासाठी 3 सोप्या टिप्स दिल्या आहेत.

Child Care Tips :लहान मुलं ती लहानच असतात. त्यांना जे करायचं तेच ते करतात. हट्टीपणा, मस्ती, रूसून बसणं, आरडाओरड करणं आणि जोरजोरात रडणं या गोष्टी तर त्यांच्या आवडत्या असतात. अशात अनेक पालक नेहमीच चिंतेत असतात की, आपल्या चिमुकल्यांना शिस्त कशी लावावी? कधी कधी तर चिमुकले इतके मस्तीखोर होतात की, पालक (Pareting Tips) त्यांना आपल्या नातेवाईकांकडे किंवा बाहेर कुठे नेण्यासही घाबरतात. 

लहान मुलं मस्ती करतात, हट्टी असतात यात काही नवीन नाही. या गोष्टीही त्यांच्यासाठी महत्वाच्या असतात. आता लहान मुलं मस्ती करणार नाही तर कोण करणार? पण सोबतच त्यांना शिस्त लावणंही महत्वाचं असतं. अशात चाइल्ड स्पेशलिस्ट डॉ. अर्पित गुप्ता यांनी चिमुकल्यांना शिस्त (How to discipline Children) लावण्यासाठी 3 सोप्या टिप्स दिल्या आहेत.

टाइम आउट नियम

आता लहान मुलांना चांगल्या सवयी किंवा शिस्त लावण्यासाठी आपण वेगवेगळे नियम करत असलाच. पण जर मुलांनी ते नियम फॉलो केले नाही तर त्यांना टाइम आउट द्या. याचा अर्थ मुलांना काही वेळासाठी एका अशा ठिकाणी उभं करा किंवा बसवा जिथे त्यांचं मन विचलित होणार नाही. पण टाइम आउटची वेळ ही लेकरांच्या वयानुसार असावी. म्हणजे 4 वयाच्या लेकरांना 4 ते 5 मिनिटं.

शांतपणे बोला

जेव्हा टाइम आउट संपेल तेव्हा मुलासोबत बोला. त्याला समजवा की, त्याचं किंवा तिचं वागणं चुकीचं होतं. पुन्हा असं करायचं नाही. जर पुन्हा तिच चूक केली तर पुन्हा टाइम आउट केलं जाईल. म्हणजे एकप्रकारे शिक्षा दिली जाईल.

'हे' नाही तर 'ते' नाही!

लहान मुलांना शिस्त लावायची असेल तर त्यांना लॉजिकल कॉन्सिक्वेंस समजावून सांगणं खूप महत्वाचं असतं. म्हणजे त्यांना हे सांगा की, होमवर्क केलं नाही तर टीव्ही बघायला मिळणार नाही. तसेच जर त्यानी घरात पाणी सांडवलं तर त्यांनाच पुसावं लागेल, पसारा केला तर त्यांनाच उचलावा लागेल.

परिणाम समजवा

या गोष्टी जर मुलांना समजावून सांगितल्या की, कोणतंही काम केलं तरी त्याचा परिणाम होत असतो. तसेच त्यांच्या चांगल्या किंवा वाईट वागण्याचा त्यांच्यावर प्रभाव पडतो, यामुळे त्यांना हळूहळू या गोष्टी समजू लागतील.

पॉझिटिव्ह रिवॉर्डही फायदेशीर

पॉझिटिव्ह रिवॉर्डही खूप फायदेशीर असतो. जर लहान मुलं एखादं चांगलं काम करत असतील, जसे की, खेळून झाल्यावर आपली खेळणी उचलून ठेवत असतील, कुणाची मदत करत असतील किंवा आपली खेळणी दुसऱ्यांसोबत शेअर करत असतील तर त्यांचं लगेच कौतुक करा. यानं त्यांना चांगलं वाटेल आणि ते या गोष्टी पुन्हा पुन्हा करतील.

टॅग्स :पालकत्वमानसिक आरोग्यआरोग्य