Women's Day 2025: पूर्वीपेक्षा आजकाल लोक वेगवेगळ्या आणि नवनवीन आजारांचे शिकार होत आहे. याची कारणं खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीची लाइफस्टाईल. आजकाल खासकरून भरपूर महिला चिंता आणि डिप्रेशनच्या (Depression) शिकार होत आहेत. अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, पुरूषांच्या तुलनेत महिला अधिक चिंता आणि डिप्रेशनच्या शिकार होतात. अशात डिप्रेशनची लक्षण आपल्याला माहीत असायला हवीत.
WHO च्या एका रिपोर्टनुसार, डिप्रेशन हा एक मानसिक आजार आहे. ज्याचे शिकार लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कुणीही होऊ शकतात. मात्र, पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये डिप्रेशन धोका अधिक असतो. डिप्रेशनची समस्या अशा लोकांना होत असते, जे लोक एखाद्या चिंतेत आहेत, ज्यांच्यासोबत काहीतरी चुकीचं झालं किंवा काही गंभीर नुकसान झालं.
डिप्रेशनची लक्षणं
उदास वाटणं
जर कुणी सतत उदास राहत असेल तर हे डिप्रेशनचं सुरूवातीचं लक्षण असू शकतं. अशावेळी जर हसती-खेळती व्यक्ती अचानक उदास रहायला लागली असेल, अबोल झाली असेल तर त्यांच्यासोबत बोला.
मूड स्वींग
जर व्यक्तीच्या मूडमध्ये सतत बदल होत असेल जसे की, अचानक खूप चिडचिडपणा करणे किंवा अचानक खूप शांत राहणे. या लक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.
चिडचिडपणा
छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिडपणा करणं हे डिप्रेशनचं लक्षण असू शकतं. जर एखादी व्यक्ती अचानक खूप जास्त चिडचिड करत असेल तर त्या व्यक्तीसोबत बोललं पाहिजे. काय समस्या आहे जाणून घेतलं पाहिजे.
एकटेपणा
चारचौघात मिक्स व्हावं वाटत नसेल, कुणाशी बोलावं असं वाटत नसेल, कुठेही बाहेर जायची इच्छा होत नसेल तर ही डिप्रेशनची लक्षण असू शकतात. याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.
झोपेची समस्या
झोप ही चांगल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी खूप महत्वाची असते. पण डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तीला एकतर खूप जास्त झोप येते नाही तर झोपच येत नाही. झोपेची अशी समस्या होणं डिप्रेशनचं लक्षण आहे.
भूकेमध्ये बदल
डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तीला एकतर खूप जास्त भूक लागते किंवा अजिबात भूक लागत नाही. जास्त भूक लागत असेल तर वजनही वाढतं, तसेच भूक कमी झाली तर वजनही कमी होतं.
कोणत्याच कामात लक्ष न लागणे
कोणत्याही कामात लक्ष न लागणे किंवा कामावर फोकस न करता येणं हे डिप्रेशनचं लक्षण असू शकतं. कोणत्याही गोष्टीवर फोकस न करता येणे म्हणजे डोक्यात दुसरं काहीतरी सतत चालू असतं.
आत्महत्येचा विचार
डिप्रेशन असलेल्या व्यक्तींच्या डोक्यात मरणे किंवा आत्महत्या करण्यासारखे विचार येऊ शकतात. अशाप्रकारचे विचार येत असतील तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डिप्रेशनही समस्या औषधं आणि थेरपीच्या माध्यमातून दूर केली जाऊ शकते.