प्रत्येकालाच असं वाटतं की त्यांचा दिवस शांती आणि पॉझिटिव्ह एनर्जीनं भरलेला असावा. नकळतपणे आपण अशी काही काम करतो ज्यामुळे संपूर्ण दिवसाची सुरूवात चांगली होत नाही. सकाळी उठल्यानंतर मोबाईल घेऊन बसल्यानं पूर्ण दिवस खराब जाऊ शकतो. चुकीची दृश्य, चुकीचे नोटिफिकेशन्स पाहिल्यामुळे दिवसाची सुरूवातही चुकीची होते. दिवसभर तुम्हाला ताण-तणाव जाणवतो. (What Is The First Thing You Should Do Every Morning BK Shivani Good Morning Tips)
प्रसिद्ध कथावाचक आणि मोटीव्हेशनल स्पीकर बी. के शिवानी यांनी एका युट्यूब चॅनेलवर अधिक माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यांनुसार दिवसाची सुरूवात आपण चुकीच्या गोष्टींनी करतो. डोळे उघडल्यानंतर फोन हातात घेतो आणि सोशल मीडिया चेक करतो आणि डोक्यात बरंच काय काय सुरू असते. यामुळे थकवा, ताण-तणाव, चिडचिडेपणा येतो. म्हणून सकाळचं पहिलं काम विचार करून करायला हवं.
सकाळची सुरूवात कशी करावी?
ब्रम्हकुमारी शिवानी सांगतात की, सकाळी उठल्यानंतर आपल्या इष्ट देवाचे स्मरण करून मनात गुड मॉर्निंग परमात्मा असे म्हणावे. हे ऐकायला खूपच शुल्लक वाटेल पण याचा परीणाम चांगला ठरेल. ज्या व्यक्तीला आपण सगळ्यात आधी आठवतो त्या व्यक्तीचे व्हायब्रेशन्स आपल्या मनाच्या स्थितीवर परिणाम करतात. सकाळी सकाळी जेव्हा आपण परमात्म्याला आठवतो तेव्हा आपण वायब्रेशनशी जोडले जातो. ज्यामुळे मन शांत, स्थिर आणि सकारात्मक होते.
लईच भारी! लग्नसराईसाठी मराळमोळ्या ज्वेलरीचे १० सुंदर सेट्स, साडीत नवीन कॉम्बो उठून दिसेल
सकाळी उठल्यावर हे म्हणा
'मी एक शांत आत्मा आहे, मी शक्तीशाली आहे, मी स्थिर आणि एकाग्र आत्मा आहे. मला कोणाकडून काहीही नको मला फक्त द्यायचे आहे. माझे शरीर निरोगी आहे. माझे कुटूंब एकजूट आणि प्रेमानं परीपूर्ण आहे. पूर्ण दिवसभर मी परमात्म्याचे साधन आहे जे सर्वांना सुख आणि शांती देते.'
बी, के शिवानी सांगतात की ही वाक्य फक्त बोलणं पुरेसं नाही तर जाणीवसुद्धा व्हायला हवी. डोळे बंद करून स्वत:ला शांत आत्मा रूपात व्हिज्युअलाईज करा. ही पाच मिनिटं तुमच्या संपूर्ण दिवसाचा मूड सेट करतील. हळूहळू याची तुम्हाला सवय होईल. तुम्ही स्वत:ला शांत, खूश फिल कराल. या छोट्याश्या सकाळची सुरूवात करून तुम्ही जीवनाला संतुलित, सकारात्मक आणि सफळ बनवू शकता.
