Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Mental Health > विनाकारण नेहमीच चिंतेत, तणावात राहता? सेकंड हँड स्ट्रेसचे असू शकता शिकार, पाहा बचावाचे उपाय

विनाकारण नेहमीच चिंतेत, तणावात राहता? सेकंड हँड स्ट्रेसचे असू शकता शिकार, पाहा बचावाचे उपाय

Secondhand Stress : सेकंड हँड स्ट्रेस हा एखाद्या व्हायरल इन्फेक्शनसारखा असतो. जो एका व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीमध्ये वेगाने पसरतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 10:40 IST2026-04-08T10:39:56+5:302026-04-08T10:40:41+5:30

Secondhand Stress : सेकंड हँड स्ट्रेस हा एखाद्या व्हायरल इन्फेक्शनसारखा असतो. जो एका व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीमध्ये वेगाने पसरतो.

What is secondhand stress and how to handle it | विनाकारण नेहमीच चिंतेत, तणावात राहता? सेकंड हँड स्ट्रेसचे असू शकता शिकार, पाहा बचावाचे उपाय

विनाकारण नेहमीच चिंतेत, तणावात राहता? सेकंड हँड स्ट्रेसचे असू शकता शिकार, पाहा बचावाचे उपाय

Secondhand Stress : आजकाल बरेच लोक तणाव, चिंतेचे शिकार आहेत. कुणाला खाजगी गोष्टींमुळे तणाव असतो, कुणाला आर्थिक अडचणींमुळे तर कुणाला कामाच्या ओझ्यामुळे. तणावाची कारणे वेगवेगळी असतात. आज आम्ही आपल्याला एका अशा वेगळ्या तणावाबाबत सांगणार आहोत, ज्याबाबत कदाचित ऐकलं नसेल. आपण सेकंड हँड गाडीबाबत ऐकलं असेलच, पण कधी सेकंड हँड स्ट्रेसबाबत ऐकलं नसेल. सेकंड हँड स्ट्रेस हा एखाद्या व्हायरल इन्फेक्शनसारखा असतो. जो एका व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीमध्ये वेगाने पसरतो. आपण अनेकदा बघतो की, आपल्या आजूबाजूचं वातावरण तणावपूर्ण असतं किंवा आपला एखादा सहकारी चिंतेत असतो याचा थेट प्रभाव आपल्यावरही पडतो.

गंमत म्हणजे असं अनेकदा होतं की, आपल्याला आपल्या तणावाचं कारणच माहीत नसतं किंवा कोणत्याही कारणाशिवाय आपण चिंतेत राहतो. ही सेकंड हँड स्ट्रेसची लक्षणं आहेत. जी हळूहळू आपल्याला डिप्रेशनकडे घेऊन जातात. मेंटल फाउंडेशनच्या एका रिपोर्टनुसार, काही लोकांमध्ये काही कारणाने स्ट्रेस असण्याच्या तुलनेत सेकंड हँड स्ट्रेस अधिक बघायला मिळतो. 

दुसऱ्यांच्या तणाव पाडतो प्रभाव

एकदा नाही तर अनेकदा असं होतं की, दुसऱ्यांची चिंता, त्यांचा तणाव आपल्याला सुद्धा तणावग्रस्त करतो. त्यांचे नकारात्मक विचार आपल्यावर इतकी घट्ट पकड घेतात की, आपली विचार करण्याची, समजण्याची क्षमता कमी होऊ लागते. अशात ना धड आपण त्यांना मदत करू शकत ना स्वत:ची. या परिणाम असा होतो की, त्याच नकारात्मक वादळात आपण अडकतो. 

सेकंड हँड स्ट्रेसपासून बचावाचे उपाय

स्वत:ला थोडं दूर ठेवा - जेव्हाही आपल्याला वाटत असेल की, सेकंड हँड स्ट्रेस आपल्यावर हावी होत आहे तर त्या स्थितीतून स्वत:ला थोडं दूर ठेवा. कुणाच्याही समस्येत किंवा अडचणीत तोपर्यंत उडी घेऊ नका जोपर्यंत समोरून मदत मागितली जात नाही. सतत दुसऱ्यांच्या चिंतेत स्वत:ला गुंतवून ठेवाल तर आपण कुणाचीही मदत करू शकणार नाही. उलट आपणच तणावाच्या जाळ्यात अडकाल.

स्वत:ची काळजी घ्या - तणावग्रस्त व्यक्तीची मदत करण्यासाठी आधी आपल्याला स्वत:ला मजबूत ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी रोज मोठा श्वास घेण्याचा व्यायाम करा. मानसिक स्थिती मजबूत करण्यासाठी योगा करा. निसर्गाच्या सानिध्यात शांत वेळ घालवा. या गोष्टींच्या मदतीने आपण सकारात्मक रहाल.

आवाक्यातील गोष्टींचा स्वीकार - आपण कितीही प्रयत्न करा, पण काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्या नियंत्रणात नसतात. त्यासाठी फार धावपळ करून काहीच उपयोग नसतो. त्यामुळे स्वत:ला याची आठवण करून द्या की, दुसऱ्या व्यक्तीच्या भावना, प्रतिक्रिया आणि निर्णय आपल्या हातात नाहीत. आपण केवळ आपल्या भावना आणि प्रतिक्रियांसाठी जबाबदार आहात.

Web Title : सेकंड हैंड तनाव: लक्षणों को पहचानें, दूसरों की चिंता से खुद को बचाएं।

Web Summary : सेकंड हैंड तनाव, वायरल संक्रमण की तरह, तेजी से फैलता है। तनावपूर्ण स्थितियों से दूरी बनाकर, स्वयं की देखभाल करके और जो आपके नियंत्रण में नहीं है उसे स्वीकार करके खुद को बचाएं। डिप्रेशन से बचने के लिए लक्षणों को पहचानें।

Web Title : Secondhand stress: Recognize symptoms, protect yourself from others' anxiety.

Web Summary : Secondhand stress, like a viral infection, spreads rapidly. Protect yourself by creating distance from stressful situations, practicing self-care, and accepting what you cannot control. Recognize the signs to prevent depression.