मानसिक त्रासांच्या बाबतीत पाहीलं तर 'मला काही होत नाही', 'हे सगळे फक्त मनाचे खेळ आहेत' असं म्हणणारे अनेकजण आपल्याला भेटतात. खास म्हणजे एग्झायटी (anxiety) आणि डिप्रेशन (depression) या गोष्टी खोट्या असतात, खरंच असतं का पण असं? का आपणच त्यांना गंभीरपणे घेत नाही? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे. (things like Anxiety and depression are real, mental health is very important, must know some acts )कारण मानसिक आरोग्य ही तितकीच महत्त्वाची बाब आहे जितकी शारीरिक आरोग्य.
anxiety म्हणजे सततची काळजी, भीती किंवा अस्वस्थता. काही वेळा कोणतंही ठोस कारण नसतानाही मन बेचैन होतं, हृदयाचे ठोके वाढतात, घाम येतो, किंवा काहीतरी वाईट होणार आहे अशी भावना सतत डोक्यात फिरत राहते. दुसरीकडे depression म्हणजे केवळ दुःखी वाटणं नाही. हा एक गंभीर मानसिक त्रास आहे ज्यामध्ये व्यक्तीला सतत उदास वाटतं, आवडीच्या गोष्टींमध्ये रस कमी होतो, थकवा जाणवतो, झोप आणि भूक यामध्ये बदल होतात.
विशेष म्हणजे या दोन्ही गोष्टी बाहेरून लगेच दिसत नाहीत. अनेक लोक रोज हसत-खेळत जगतात, काम करतात, पण आतून मात्र ते तुटलेले असतात. त्यामुळेच अनेकांना वाटतं की 'हे काही खरं नाही' किंवा 'लोक नाटक करतात' पण ही धारणा चुकीची आहे.
दीपिका पदूकोण ने एका मुलाखतीत सांगितलं होतं, "Depression is like being in a room full of people and still feeling completely alone." हे वाक्य खूप काही सांगून जातं. बाहेरून सर्व काही ठीक दिसत असलं तरी आतून व्यक्ती किती त्रास सहन करत असते, हे समजून घेणं गरजेचं आहे.
लक्षणांकडे पाहिलं तर काही गोष्टी वारंवार जाणवतात, सततची चिंता, छोट्या गोष्टींवर जास्त विचार करणं, स्वतःबद्दल नकारात्मक विचार येणं, लोकांपासून दूर राहण्याची इच्छा होणं, ऊर्जा कमी वाटणं, किंवा अचानक रडू येणं. काही वेळा शरीरातही बदल जाणवतात, जसं की डोकेदुखी, पोटदुखी किंवा थकवा.
महत्त्वाचं म्हणजे, या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. 'हे आपोआप ठीक होईल' "जस्ट अ फेज" असा विचार करणं धोकादायक ठरू शकतं. वेळेवर योग्य मदत घेतली, तर या अवस्थांमधून बाहेर पडणं शक्य आहे. यासाठी समुपदेशन (counselling), थेरपी, आणि गरज पडल्यास डॉक्टरांनी दिलेली औषधं घेणं गरजेचं आहे. तसंच, स्वतःसाठी थोडा वेळ काढणं, नियमित व्यायाम, चांगली झोप आणि जवळच्या लोकांशी मोकळेपणाने बोलणं हे छोटे उपायही मोठा फरक घडवू शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या भावना मान्य करणं आणि मदत मागायला न लाजणं. मानसिक आरोग्य समस्यांना मनाचे खेळ समजणं बंद करा आणि वेळीच उपचारही घ्या.
