काही दिवसांमध्ये आता मुलांच्या परीक्षा सुरू होतील. परीक्षेचा काळ सगळ्याच मुलांसाठी चांगलाच तणावाचा, भितीचा, चिंतेचा असतो. पण परीक्षेच्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त मुलांना असं वाटतं की, चांगला अभ्यास करूनही त्यांना काही आठवत नाहीये. जर आपल्याला सुद्धा असं वाटत असेल तर घाबरण्याची गरज नाही. कारण असं वाटणं फारच कॉमन आहे आणि याचा सगळ्यांनीच सामना केलेला असतो. बरीच मुलं या समस्येला आपली कमजोरी समजतात. पण प्रत्यक्षात असं नसतं. परीक्षेच्या हॉलमध्ये जाताच असं वाटतं की, ते सगळं काही विसरले. पण यामागचं कारण वेगळंच असतं.
असं का होतं?
परीक्षा जवळ येताच प्रत्येक विद्यार्थ्याला टेंशन येतं आणि जशी परीक्षा सुरू होते, तेव्हा मेंदू याला तणाव समजतो. त्यामुळे शरीरात कार्टिसोल म्हणजेच तणावाचे हार्मोन वाढतात. या हार्मोनमुळे मेंदूची विचार करण्याची आणि गोष्टी लक्षात ठेवण्याची क्षमता कमजोर पडते. याच कारणाने मेंदू शांत असूनही विचार करू शकत नाही, आधी वाचलेल्या गोष्टी लगेच आठवत नाहीत. पण याचा अर्थ असा होत नाही की, आपण चांगली तयारी केली नाही. फक्त टेंशनमुळे मेंदू लगेच गोष्टी आठवू शकत नाही.
फोकस करण्यास अडचण
परीक्षेदरम्यानच्या टेंशनमुळे विद्यार्थी फोकस करू शकत नाहीत. त्यांच्या डोक्यात सतत नकारात्मक विचार येतात, जसे की, तेच जर फेल झाले तर काय होईल? किंवा मी जर सगळं काही विसरलो तर काय होईल?
रट्टा मारल्याने होते समस्या
बरेच विद्यार्थी असे असतात, जे परीक्षेच्या शेवटच्या क्षणी रट्टा मारू लागतात. ज्यामुळे परीक्षेच्या हॉलमध्ये जाताच ते सगळं काही विसरतात. पण जर कुणी चांगली तयारी केली असेल, तर त्यांच्यासोबत असं कधी होत नाही.
काय काळजी घ्याल?
परीक्षा केंद्रावर गेल्यावर आरामात आपल्या जागेवर बसा. लिहायला सुरूवात करण्याआधी मोठा श्वास घ्या. यादरम्यान काही की-वर्ड आठवले तर लिहून घ्या. आधी सोप्या प्रश्नांची उत्तरं लिहून काढा आणि नंतर अवघड प्रश्नांकडे लक्ष द्या.
Web Summary : Exam stress triggers cortisol, impairing memory and focus. Avoid last-minute cramming. Relax, breathe deeply, jot down keywords, and tackle easier questions first to combat anxiety.
Web Summary : परीक्षा का तनाव कोर्टिसोल को बढ़ाता है, जिससे याददाश्त और एकाग्रता कमजोर होती है। अंतिम समय में रट्टा मारने से बचें। शांत रहें, गहरी सांस लें, कीवर्ड लिखें और आसान प्रश्नों से शुरुआत करें।