lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Mental Health > Sleep Texting : फोनची रिंग वाजताच रात्री झोपेत चॅटिंग करता? तुम्हालाही उद्भवू शकतो स्लीप टेक्स्टिंगचा विकार 

Sleep Texting : फोनची रिंग वाजताच रात्री झोपेत चॅटिंग करता? तुम्हालाही उद्भवू शकतो स्लीप टेक्स्टिंगचा विकार 

Sleep Texting : रात्री झोपल्यानंतर मेसेजची रिंग वाजल्यावर अनेकजण झोपेतून जागे होतात आणि झोपेतच चॅट करतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 03:22 PM2022-05-12T15:22:25+5:302022-05-12T15:41:06+5:30

Sleep Texting : रात्री झोपल्यानंतर मेसेजची रिंग वाजल्यावर अनेकजण झोपेतून जागे होतात आणि झोपेतच चॅट करतात.

Sleep Texting : Sleep texting is turning into the new sleep talking | Sleep Texting : फोनची रिंग वाजताच रात्री झोपेत चॅटिंग करता? तुम्हालाही उद्भवू शकतो स्लीप टेक्स्टिंगचा विकार 

Sleep Texting : फोनची रिंग वाजताच रात्री झोपेत चॅटिंग करता? तुम्हालाही उद्भवू शकतो स्लीप टेक्स्टिंगचा विकार 

झोपेत असताना चालणे, बोलणे हे प्रकार अनेकदा तुम्ही पाहिले असतील, स्लीप टेक्स्टिंग हे झोपेच्या वेळी होणाऱ्या इतर वर्तनांपेक्षा वेगळे नसते. नॅशनल स्लीप फाउंडेशनचा अंदाज आहे की अंदाजे 10 टक्के अमेरिकन लोकांना पॅरासोम्नियाचा अनुभव येतो. वेगवेगळ्या पॅरासोम्निया झोपेच्या चक्राच्या वेगवेगळ्या टप्प्यांशी संबंधित आहेत. उदाहरणार्थ, स्वप्नं पाहणे हे डोळ्यांच्या जलद हालचाली (REM) झोपेशी संबंधित आहे आणि REM स्लीप बिहेवियर डिसऑर्डर म्हणून ओळखल्या जाणार्‍या विशिष्ट विकाराचा भाग आहे. 

2013 च्या तंत्रज्ञानाचा वापर आणि झोपेवरील अभ्यासात, संशोधकांना असे आढळले की 10 टक्के सहभागींनी त्यांच्या सेल फोनमुळे आठवड्यातून किमान काही रात्र जागं राहण्याची नोंद केली. स्लीप टेक्स्टिंगमध्ये एक अनुवांशिक घटक देखील असू शकतो, कारण ज्या लोकांना झोपेच्या विकारांचा कौटुंबिक इतिहास आहे त्यांना पॅरासोम्नियाचा त्रास होण्याचा धोका वाढतो. रात्री झोपल्यानंतर मेसेजची रिंग वाजल्यावर अनेकजण झोपेतून जागे होतात आणि झोपेतच चॅट करतात.

 ‘स्लीप टेक्स्टिंग’ म्हणजे झोपेतच आपल्या मोबाइलवरून इतरांना मेसेजेस पाठविणे... मोबाइलचा वापर वाढल्यामुळे, दिवसरात्र मोबाइलच्या संगतीतच राहात असल्याने आणि रात्रीबेरात्रीही ‘ऑनलाइन’ राहण्याच्या  सवयीमुळे हा विकार आता जगभर वाढीस लागतो आहे. या प्रकाराबद्दल अजून स्वतंत्रपणे संशोधन झालेलं नसलं, तरी पॅरासोम्नियाचा विकार असलेल्यांना हा विकार जडू शकतो, असं संशोधकांचं म्हणणं आहे. 

हाताची त्वचा खूप सैल पडलीये? २ सोपे उपाय, हातांवरच्या सुरकुत्या, काळपटपणा होईल दूर

पॅरासोम्निया हा विकार असलेले अनेक जण झोपेच्या दरम्यान, गाढ झाेपलेले असताना, तसेच अगदी जाग आल्यावरही काही विचित्र कृती करतात. जसं की, झोपेचे चालणं, झोपेत बरळणं, झोपेतच टेक्स्टिंग करणं... घोरणारे लोकं जसं ‘आपण बिलकुल घोरत नाही,’ असं ठामपणे सांगतात, तसेच झोपेत चालणाऱ्या, बोलणाऱ्या, टेक्स्टिंग करणाऱ्या लोकांचंही म्हणणं असतं, असलं काही आम्ही करतच नाही. कारण या काळात आपण काय केलं, हे त्यांना खरोखरंच काहीच आठवत नसतं. लोक झोपेत अशी कृती का करतात? याबाबत नेमका अभ्यास अजून झालेला नसला, तरी चर्चा सुरु झाली आहे.  झोपेच्यातीन स्थिती असतात.

 उन्हामुळे खूप चिडचिड होते? रागावर कंट्रोल ठेवण्यासाठी १० टिप्स; डोकं, मन दोन्ही राहील शांत

पहिला प्रकार म्हणजे, ‘आरईएम’ (रॅपिड आय मूव्हमेंट), दुसरा प्रकार आहे, ‘एनआरइएम’ (नॉन रॅपिड आय मूव्हमेंट) आणि तिसरा प्रकार आहे, झोप आणि जागृतावस्था यांच्या मधली स्थिती. या तिन्ही प्रकारच्या झोपेत पॅरासोम्निया असलेल्या व्यक्ती विचित्र कृती करू शकतात.  अर्ध्या झोपेत आणि अर्ध्या जागृतावस्थेत असलेल्या व्यक्ती मोबाइलवरून टेक्स्टिंग करतात, कारण अर्धवट जागृतावस्थेत त्यांना ‘टेक्स्ट अलर्ट’ ऐकू येतो आणि त्याप्रमाणे लगेच ते झोपेतच मोबाइलवरून प्रत्युत्तर देतात, असाच प्रकार झोपेचे विकार असणाऱ्यांकडूनही होतो. 

तुम्ही तरुण असाल, तुमच्या जवळच्या नात्यातल्या कोणाला पॅरासोम्नियाचा विकार असेल, निद्रानाश असेल, मद्यपान करीत असाल, मानसिक ताण असेल, वेदनाशामक औषधं घेत असाल, तर हा विकार होण्याची शक्यता वाढते. व्यवस्थित झोप घेणे, झोपताना आपला मोबाइल बंद करणे, लांब ठेवणे, अशा काही कृतींनी झोपेत टेक्स्टिंगची समस्या कमी होऊ शकते, पण नाहीच झालं, तर डॉक्टरांची भेट अवश्य घ्या.

Web Title: Sleep Texting : Sleep texting is turning into the new sleep talking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.