Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Mental Health > निर्णय घेता येत नाही, बोलणंही बंद; ऑनलाइन गेमिंगने मुलांच्या मेंदूवर कसा परिणाम होतो पाहा, जगणंच उद्धवस्त

निर्णय घेता येत नाही, बोलणंही बंद; ऑनलाइन गेमिंगने मुलांच्या मेंदूवर कसा परिणाम होतो पाहा, जगणंच उद्धवस्त

Online Gaming Addiction Impact : एआयचा अतिवापरामुळे येणाऱ्या डिप्रेशन वाढत्या धोक्याबाबत अनेक एक्सपर्टनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच मुलांमध्ये ऑनलाईन गेमिंगच्या वाढत्या सवयीबाबतही अनेकांनी चिंता व्यक्त केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 18:08 IST2026-02-05T10:52:35+5:302026-02-05T18:08:27+5:30

Online Gaming Addiction Impact : एआयचा अतिवापरामुळे येणाऱ्या डिप्रेशन वाढत्या धोक्याबाबत अनेक एक्सपर्टनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच मुलांमध्ये ऑनलाईन गेमिंगच्या वाढत्या सवयीबाबतही अनेकांनी चिंता व्यक्त केली.

Online Gaming Addiction How online gaming ruins lives, see how it affects the brain and how children become victims | निर्णय घेता येत नाही, बोलणंही बंद; ऑनलाइन गेमिंगने मुलांच्या मेंदूवर कसा परिणाम होतो पाहा, जगणंच उद्धवस्त

निर्णय घेता येत नाही, बोलणंही बंद; ऑनलाइन गेमिंगने मुलांच्या मेंदूवर कसा परिणाम होतो पाहा, जगणंच उद्धवस्त

Online Gaming Addiction Impact : उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील तीन बहिणींच्या आत्महत्येची घटनेने लोकांना चांगलाच धक्का बसला आहे. तिघी बहिणींनी इमारतीच्या ९व्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. प्राथमिक माहितीनुसार, तिन्ही बहिणी कोरिअन ऑनलाईन गेमिंगच्या शिकार होत्या. त्यामुळे अनेक पालकांची चिंता वाढली आहे. अशात हे ऑनलाईन गेम्स मुलांच्या मेंदूवर कसा प्रभाव करतात किंवा ते यात कसे अडकतात? असे प्रश्न समोर येत आहेत. हेच आज आपण या लेखात समजून घेणार आहोत.

एका रिपोर्टनुसार, एआयचा अतिवापरामुळे येणाऱ्या डिप्रेशन वाढत्या धोक्याबाबत अनेक एक्सपर्टनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच मुलांमध्ये ऑनलाईन गेमिंगच्या वाढत्या सवयीबाबतही अनेकांनी चिंता व्यक्त केली.

गाझियाबादमधील घटना नेमकी काय?

बुधवारी सकाळी गाझियाबादच्या एका इमारतीच्या नवव्या मजल्याहून उडी घेत तीन बहिणींनी जीव दिला. तिन्ही बहिणी १२, १४ आणि १६ वयाच्या होत्या. या घटनेचं खरं कारण अजून समोर आलेलं नाही. पण सुरूवातीच्या रिपोर्टनुसार, एका कोरिअर ऑनलाईन टाक्स - बेस्ड गेमिंगची त्यांना सवय होती. असंही सांगण्यात येत आहे की, मुलींचे आई-वडील त्यांच्या ऑनलाईन गेमिंगच्या सवयीबाबत आक्षेप घेत होते.

गेमिंग डिसऑर्डर मानसिक आरोग्यासाठी घातक

मानसोपचार तज्ज्ञ सांगतात की, ऑनलाईन गेम्स जसे की, पब्जी, फ्री फायर आणि इतर बॅटल गेम्स हल्ली केवळ मनोरंजनाचं माध्यम राहिलेले नाही तर अनेक तरूणांसाठी जीवघेणं व्यसन बनले आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने गेमिंग डिसऑर्डरला मानसिक आरोग्य समस्येच्या श्रेणीत ठेवलं आहे. ज्यात व्यक्ती गेमिंगवरील कंट्रोल हरवतो. अभ्यास, कामे, नाती आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू लागतात.

भारतात करण्यात आलेल्या अनेक सर्व्हेमधून समोर आलं आहे की, टीनएजर्स आणि तरूण रोज अनेक तास ऑनलाईन गेमिंगवर घालवतात. ज्यामुळे त्यांचं रूटीन आणि वागणं प्रभावित होत आहे. इतकंच नाही तर यामुळे आत्महत्येच्या केसेसमध्ये वाढ दिसत आहे. २०२३ च्या एनसीआरबीच्या डेटानुसार, भारतात ८५ पेक्षा अधिक आत्महत्यांच्या केसेस थेटपणे ऑनलाईन गेमिंगशी संबंधित होत्या.

ऑनलाईन गेमिंगचा मेंदूवर प्रभाव कसा होतो?

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या रिपोर्टनुसार, गेमिंगचं व्यसन मेंदूच्या रिवार्ड सिस्टीमला वाईट प्रकारे प्रभावित करतं. काही केसेसमध्ये बघण्यात आलंय की, गेम हरल्यानंतर किंवा पालकांनी मोबाईल हिसकावून घेतल्यानंतर मुलांनी स्वत:ला इजा पोहोचवली, इतकंच काय तर आत्महत्याही केली.

मानसोपचार तज्ज्ञ सांगतात की, ऑनलाईन गेम्स अशाप्रकारे डिझाइन केले जातात की, ते लोकांनी पुन्हा पुन्हा खेळावेत. रिवार्ड सिस्टीम, लेव्हल अप, व्हर्चुअल करन्सी आणि सोशल कनेक्शन मेंदूमध्ये डोपामाइन रिलीज करतात, ज्यामुळे खेळण्याची इच्छा आणखी वाढते. जास्त वेळ खेळत राहिल्याने स्वत:वरील कंट्रोल हरवू शकतो आणि सवयीचा धोका वाढतो. डोपामाइनमुळे काही काळासाठी आनंद मिळतो, पण सतत गेम खेळल्याने मेंदूला याची सवय लागते. जर गेम खेळला नाही तर व्यक्तीमध्ये अस्वस्थता, चिडचिड जाणवते.

काय सांगतात एक्सपर्ट?

एक्सपर्ट सांगतात की, हा विषय केवळ गेमचं व्यसन इथपर्यंत मर्यादित नाही. याने मुलांची भावनिक परिपक्वता, आत्मसन्मान आणि कौटुंबिक संवादाच्या गुणवत्तेवरही प्रश्न उभा ठाकतो. ऑनलाईन बॅटल गेममुळे वेगाने डोपामाइन हार्मोन म्हणजे आनंद देणारे हार्मोन रिलीज होतात आणि मेंदूचं रिवार्ड सिस्टीम अॅक्टिव होतं. ज्यामुळे मुलं पुन्हा गेमच्या जाळ्यात अडकतात. अशाप्रकारचे गेम लगेच बंद करणं गरजेचं आहे.

Web Title : ऑनलाइन गेमिंग की लत जीवन को बर्बाद करती है: मस्तिष्क पर प्रभाव

Web Summary : ऑनलाइन गेमिंग की लत एक बढ़ती चिंता है, जो मानसिक स्वास्थ्य को प्रभावित करती है। गाजियाबाद आत्महत्या ऑनलाइन गेम के खतरों पर प्रकाश डालती है। विशेषज्ञ गेमिंग के मस्तिष्क की इनाम प्रणाली पर पड़ने वाले प्रभाव के बारे में चेतावनी देते हैं, जिससे लत और संभावित नुकसान होता है।

Web Title : Online gaming addiction destroys lives: Impact on brain, child victims.

Web Summary : Online gaming addiction is a growing concern, affecting mental health. Ghaziabad suicide highlights dangers of online games. Experts warn about gaming's impact on brain's reward system, leading to addiction and potential harm.