lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Mental Health > चटकन खूप राग येतो, संताप आवरत नाही ? १ सोपा उपाय, ५ मिनिटांत रागावर मिळवा नियंत्रण...

चटकन खूप राग येतो, संताप आवरत नाही ? १ सोपा उपाय, ५ मिनिटांत रागावर मिळवा नियंत्रण...

Anger Management : Practice These Yoga Exercises to Control Anger : रागामुळे आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्याला हानी पोहोचते. राग शांत करण्यासाठी आपण या योग मुद्रेची मदत घेऊ शकता. यामुळे राग तर शांत होईलच पण तणावही कमी होईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2023 02:39 PM2023-11-01T14:39:47+5:302023-11-01T15:02:55+5:30

Anger Management : Practice These Yoga Exercises to Control Anger : रागामुळे आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्याला हानी पोहोचते. राग शांत करण्यासाठी आपण या योग मुद्रेची मदत घेऊ शकता. यामुळे राग तर शांत होईलच पण तणावही कमी होईल.

Mushti Mudra for Anger Management, Mushti Mudra A Fist Gesture Meaning, Benefits & How to Do | चटकन खूप राग येतो, संताप आवरत नाही ? १ सोपा उपाय, ५ मिनिटांत रागावर मिळवा नियंत्रण...

चटकन खूप राग येतो, संताप आवरत नाही ? १ सोपा उपाय, ५ मिनिटांत रागावर मिळवा नियंत्रण...

राग येणे ही खूप सामान्य गोष्ट आहे. आपल्याला दिवसभरातून अनेकवेळा अनेक गोष्टींचा राग येत असतो. राग किंवा क्रोध हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर रागावर नियंत्रण मिळवणे अत्यावश्यक आहे. राग हा आपल्या प्रगतीमधील सर्वांत मोठा अडथळा आहे. राग आल्यावर आपण एकाग्रता गमावून बसतो. राग आल्यावर मानवी शरिरातील हार्मोन्स अनियंत्रित होतात. शरीराची लवचिकता कमी होते. राग आल्यामुळे माणसाची भावनिक स्थिती विस्कळीत होऊन त्याच्या इतर गोष्टींवर याचा वाईट परिणाम जाणवतो(Mushti Mudra for Anger Management).

रागामुळे माणसाचा सर्वनाश होऊ शकतो. रागावर नियंत्रण मिळवणे, अत्यंत आवश्यक असते. रागामुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला हानी पोहोचते. राग आरोग्यासाठी, नातेसंबंधांसाठी, तुमच्या आजूबाजूच्या लोकांसाठी, कोणासाठीही चांगला नाही. काही लोकांना छोट्या छोट्या गोष्टींवर सतत राग येतो, जे चुकीचे आहे. आपल्यापैकी बरेचसे लोक राग आणि चिडचिड यांना आपली सवय बनवतात. जर आपल्याला प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीवर राग आला तर आपले आरोग्य (Which Mudra is best for anger control?) बिघडू शकते. आपल्याला आलेला राग लगेच शांत (Practice These Yoga Exercises to Control Anger) करण्यासाठी आपण १ ते १०० आकडे मनात मोजतो किंवा त्या क्षणी भांडण होऊ नये म्हणून दूर जातो तसेच स्वतःला शांत करतो. यासोबतच आपण एक सोपी योग मुद्रा करून देखील आपला राग झटपट शांत करु शकतो. उत्तराखंड सरकारच्या योगा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर व आंतरराष्ट्रीय योग शिक्षक दिलराज प्रीत कौर यांनी राग नियंत्रणात ठेवण्यासाठी मुष्टी योग मुद्रेचा वापर कसा करावा याबद्दल माहिती दिली आहे(Mushti Mudra A Fist Gesture: Meaning, Benefits & How to Do).

राग शांत करण्यासाठी मुष्टी मुद्रा कशी करावी ? 

१. मुष्टी मुद्रा करण्यासाठी सर्वप्रथम सुखासनात बसावे. 

२. त्यानंतर आपल्या दोन्ही हातांच्या मुठी आवळून बंद कराव्यात. 

३. मुठी आवळून बंद करताना अंगठा सोडून मूठ बंद करुन घ्यावी, आणि अंगठा सर्व बोटांच्या वरच्या बाजूला ठेवावा.

मन अस्वस्थ, शरीराच्या सतत तक्रारी, जीवाला सुख नाही? ७ साधे सोपे नियम, जगण्यात सुखच सुख...

सिधे रस्ते की उलटी चाल! डोकं फारच भंजाळलं, स्ट्रेस वाढला तर १ सोपा उपाय...

४. आपली बोटे आणि अंगठा अशा प्रकारे वाकवा की आपला अंगठा वरून तुमच्या अनामिकेला स्पर्श करेल. 

५. आता या दोन्ही हातांच्या मुठी आवळून दोन्ही पायांच्या गुडघ्यावर रिलॅक्स ठेवून डोळे बंद करा. 

६. डोळे बंद करुन दीर्घ श्वास घ्या, श्वास घेताना व सोडताना श्वासांवर लक्ष केंद्रित करा. 

७. ही योग मुद्रा दिवसातून ३ वेळा १५ मिनिटांसाठी करा.

ग्रीन टी पिताना हमखास ५ चुका करताय? वजन तर कमी होणारच नाही उडेल झोप, बिघडेल तब्येत...

मुष्टी मुद्रा करण्याचे फायदे.... 

१. तणाव आणि चिंता कमी होऊन मनाला विश्रांती मिळते.

२. जर आपल्याला कोणत्याही प्रकारचा भावनिक किंवा मानसिक त्रास किंवा स्ट्रेस येत असेल तर ही योग मुद्रा नक्की करा. 

३. ही योग मुद्रा आपल्या शरीरातील ऊर्जा वाढवण्यास व दिवसभर टिकवून ठेवण्यास मदत करते. 

४. आपल्या मेंदूची एकाग्रता आणि मेंटल फोकस देखील वाढण्यास मदत होते. 

५. याचबरोबर अनेक प्रकारच्या वेदनांपासून देखील आराम मिळतो.

मुष्टी योग मुद्रा करताना घ्यायची खबरदारी... 

हे आसन करताना मन शांत करावे. सर्व नकारात्मक भावना सोडून सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा.

Web Title: Mushti Mudra for Anger Management, Mushti Mudra A Fist Gesture Meaning, Benefits & How to Do

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.