Lokmat Sakhi >Mental Health > सतत चिडचिड करता, गोष्टी विसरता? शरीरातलं 'हे' मिनरल झालंय बरंच कमी; पाहा लक्षणं

सतत चिडचिड करता, गोष्टी विसरता? शरीरातलं 'हे' मिनरल झालंय बरंच कमी; पाहा लक्षणं

Lithium Deficiency Symptoms : खरंतर या मिनरलची शरीराला खूप कमी प्रमाणात गरज असते. पण जर हे मिळालंच नाही तर यामुळे आपला मेंदू आणि नर्वस सिस्टीमवर खूप प्रभाव पडतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 15:51 IST2025-08-30T11:23:03+5:302025-08-30T15:51:51+5:30

Lithium Deficiency Symptoms : खरंतर या मिनरलची शरीराला खूप कमी प्रमाणात गरज असते. पण जर हे मिळालंच नाही तर यामुळे आपला मेंदू आणि नर्वस सिस्टीमवर खूप प्रभाव पडतो.

Lithium deficiency symptoms of mental health and how to get it | सतत चिडचिड करता, गोष्टी विसरता? शरीरातलं 'हे' मिनरल झालंय बरंच कमी; पाहा लक्षणं

सतत चिडचिड करता, गोष्टी विसरता? शरीरातलं 'हे' मिनरल झालंय बरंच कमी; पाहा लक्षणं

Lithium Deficiency Symptoms :  शरीर हेल्दी आणि फिट ठेवण्यासाठी शरीराला वेगवेगळ्या व्हिटामिन्स आणि मिनरल्सची गरज पडते. आयर्न, कॅल्शिअम, झिंक किंवा मॅग्नेशिअम ही तत्व शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. यांबाबत आपण अनेकदा ऐकलंही असेल. पण एक मिनरल असतं, ज्याबाबत फार कमी बोललं जातं. खरंतर या मिनरलची शरीराला खूप कमी प्रमाणात गरज असते. पण जर हे मिळालंच नाही तर यामुळे आपला मेंदू आणि नर्वस सिस्टीमवर खूप प्रभाव पडतो.

आपण ज्या मिनरलबाबत बोलत आहोत ते आहे लिथिअम. लिथिअम हे एक असं मिनरल आहे जे मूड चांगला ठेवण्यास, मेंदूच्या सेल्सना सपोर्ट करण्यास आणि मानसिक संतुलन कायम ठेवण्यास मदत करतं. जर शरीरात हे कमी झालं तर याचा मानसिक आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. आज आपण पाहणार आहोत की, शरीरात लिथिअम कमी झाल्यावर कोणकोणत्या समस्या होऊ शकतात.

लिथिअम कमी झाल्यावर काय होतं?

- जर आपल्याला कोणत्याही कामात फोकस करण्यास अडचण येत असेल, किंवा आपण गोष्टी विसरत असाल तसेच ब्रेन फॉगची समस्या होत असेल तर हे लिथिअम कमी झाल्याचं लक्षण असू शकतं. कारण लिथिअममुळे मेंदूच्या कोशिका सुरक्षित राहतात आणि मेंदूच्या आतील क्रिया सुरळीत होतात.

- जर आपल्याला पुन्हा पुन्हा मूड स्विंगची समस्या होत असेल, चिडचिड वाढली असेल किंवा छोट्या छोट्या गोष्टींचा राग येत असेल तर हा लिशिअम कमी झाल्याचा संकेत असू शकतो. लिथिअम सेराटोनिन आणि डोपामाइनसारख्या न्यूरोट्रांसमीटरना संतुलित ठेवण्यास मदत करतं. अशात याची कमतरता झाल्यास समस्या होऊ शकते.

- तसेच लिथिअम कमी झाल्यावर चिंता आणि तणाव जास्त प्रमाणात जाणवतो. सतत आपल्याला अस्वस्थ किंवा घाबरल्यासारखं वाटू शकतं. म्हणजेच काय तर लिथिअम कमी झाल्यानं नर्वस सिस्टीमचं संतुलन बिघडतं.

- जर आपल्याला झोपेतून पुन्हा पुन्हा उठावं लागत असेल, झोपमोड होत असेल तर याचाही संबंधी लिथिअमच्या कमतरतेसोबत असू शकतो. लिथिअम आपल्या बॉडी क्लॉकला किंवा सर्केडियन रिदमला संतुलित ठेवण्यास मदत करतं.

- जर आपल्या शरीरात लिथिअम कमी झालं असेल तर छोट्या छोट्या समस्या दूर करता येत नाहीत किंवा त्या सहन होत नाहीत. रोज तणावाशी दोन हात करण्याची शक्तीही कमी होते. त्यामुळे जास्त वेळ थकवा जाणवतो.

कशातून मिळेल लिथिअम?

धान्य, बटाटे, टोमॅटो, पत्ताकोबी, काही मिनरल वॉटर, जायफळ, धणे, जिरे, ब्लॅक टी आणि ग्रीन टीमधून लिथिअम मिळू शकतं. या गोष्टींचा आहारात समावेश केला तर लिथिअम कमी होणार नाही आणि आपली चिडचिडही वाढणार नाही.

Web Title: Lithium deficiency symptoms of mental health and how to get it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.