Join us
Daily Top 2Weekly Top 5

टॉयलेट करताना जास्त जोर लावल्याने स्मरणशक्ती जाऊ शकते का? जाणून घ्या एक्सपर्ट काय सांगतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 10:10 IST

Mental Health : पोट साफ व्हावं म्हणून बरेच लोक टॉयलेटला गेल्यावर खूप जोर लावतात. ज्यामुळे वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात, पण स्मरणशक्ती कशी जाते? तेच समजून घेऊया.

Mental Health : काही दिवसांआधीच एक घटना समोर आली होती की, एका महिलेने शौच करताना इतका जोर लावला की काही काळासाठी तिची अनेक वर्षांची आठवणच गेली. मात्र काही तासांनंतर तिची स्मरणशक्ती आपोआप परत आली. अशी घटना दुर्मिळ असली तरी वैद्यकीयदृष्ट्या शक्य आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या घटना फार कमी प्रमाणात दिसतात. पण खरंच असं होतं का आणि कसं होतं, हे अनेकांना माहीत नसतं. पोट साफ व्हावं म्हणून बरेच लोक टॉयलेटला गेल्यावर खूप जोर लावतात. ज्यामुळे वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात, पण स्मरणशक्ती कसे जाते? तेच समजून घेऊया.

यामागचं विज्ञान काय?

जेव्हा एखादी व्यक्ती शौचासाठी खूप जोर लावते, तेव्हा शरीरात एक विशेष प्रक्रिया होते, तिला Valsalva maneuver म्हणतात. या प्रक्रियेत व्यक्ती श्वास रोखते, ज्यामुळे छाती आणि पोटावर जोरदार दाब निर्माण होतो. यामुळे अचानक ब्लड प्रेशर आणि हृदयाच्या ठोक्यांमध्ये बदल होऊ शकतो. त्याचा परिणाम असा होतो की काही क्षणांसाठी मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होऊ शकतो. रक्तप्रवाह कमी झाल्याने चक्कर येऊ शकते, हलकंसं बेशुद्ध पडल्यासारखं वाटू शकतं, गोंधळल्यासारखं होऊ शकतं. काही केसेसमध्ये तात्पुरती स्मरणशक्तीही जाऊ शकते.

ट्रांजिएंट ग्लोबल अम्नेशिया म्हणजे काय?

या अवस्थेला Transient Global Amnesia म्हणतात. या स्थितीत व्यक्तीला अलीकडच्या घटना आठवत नाहीत, वारंवार तेच प्रश्न विचारले जाऊ शकतात, पण स्वतःची ओळख कायम असते. चांगली गोष्ट म्हणजे ही समस्या कायमची नसते. बहुतेक वेळा काही तासांत स्मरणशक्ती परत येते. हे धोकादायक आहे का?

साधारणपणे कायमस्वरूपी नुकसान होत नाही. पण वारंवार बद्धकोष्ठता आणि सतत जोर लावणे हे शरीरासाठी चांगले नाही. यामुळे पाइल्सची समस्या होऊ शकते आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. 

बचावाचे सोपे उपाय  

फायबरयुक्त आहार घ्या. फळे, भाज्या, धान्य यांचा आहारात समावेश करा. दिवसभर भरपूर पाणी प्या. नियमित व्यायाम करा आणि जास्त काळ बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Straining during toilet can cause memory loss? Experts explain.

Web Summary : Straining during bowel movements can trigger Valsalva maneuver, reducing blood flow to the brain. This may cause temporary memory loss, called Transient Global Amnesia. While usually harmless, frequent straining isn't healthy. Fiber-rich diet, hydration, and exercise are preventive measures. Consult a doctor for persistent constipation.
टॅग्स :मानसिक आरोग्यआरोग्यहेल्थ टिप्स