lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Mental Health > International happiness day : लोक आपल्या मनासारखे वागले तर आपण आनंदी, हे सूत्रच चूक!

International happiness day : लोक आपल्या मनासारखे वागले तर आपण आनंदी, हे सूत्रच चूक!

माझा आनंद माझ्यावरच अवलंबून का नाही, मी आनंदी राहणं ही माझी जबाबदारी असं आपण ठरवू शकतो का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 05:56 PM2021-03-20T17:56:43+5:302021-03-20T18:01:35+5:30

माझा आनंद माझ्यावरच अवलंबून का नाही, मी आनंदी राहणं ही माझी जबाबदारी असं आपण ठरवू शकतो का?

International happiness day: search your happiness within you. | International happiness day : लोक आपल्या मनासारखे वागले तर आपण आनंदी, हे सूत्रच चूक!

International happiness day : लोक आपल्या मनासारखे वागले तर आपण आनंदी, हे सूत्रच चूक!

Highlightsआनंद मिळून केवळ खळखळूण मनसोक्त जगण्याची इच्छा तुमच्यात जागृत होत असेल तर त्या भावनांना दाबून न ठेवता हवं तसं जगण्याचा प्रयत्न करा.

सुरेश पवार

आज आंतरराष्ट्रीय आनंद दिवस. तुम्ही वाचलंच असेल की १४९ देशांच्या यादीत भारत १३९ व्या क्रमांकावर आहे. म्हणजे आपण आनंदी नाही का? आपण उदास आहोत, कुठं गेला आपला आनंद मग?
प्रत्येकालाच वाटतं की आपण आनंदी रहावं.  पण आनंद म्हणजे नेमकं काय?  याबाबतीत अनेकांची मते देखील भिन्न आहेत .कुणाला सर्व काही मिळवण्यात आनंद मिळतो तर कुणाला वाटण्यात आनंद मिळतो, कुणाला नाचण्यात आनंद मिळतो तर कुणाला एकांतात काही क्षण घालवण्यात आनंद मिळतो. मुळात आनंद ही घटना नसून ती एक स्थिती आहे ज्यामध्ये सामान्यत: वाटतं त्यापेक्षा अधिक प्रसन्न वाटू लागतं. खेळण्याने,नाचण्याने, गाणी ऐकण्याने वा इतर अनेक गोष्टीतून व्यक्तीला मिळत असतो तो आनंद. एखादी गोष्ट  जीवनात अचानक मिळते ज्याची पूर्वकल्पना नसते जी अनपेक्षितपणे मिळते तो असतो आनंद आणि जेव्हा व्यक्त देखील होता येत नाही भावना निरंकारी होतात हसू न येता डोळ्यांद्वारे केवळ अश्रू ओघळतात तो असतो परमानंद असे आनंदाचे आपण टप्पे जरी पहिले असले तरी अभ्यासकांनी दोन प्रकारात याची विभागणी केलेली दिसते. हेडॉनिक (Hedonic)म्हणजे आयुष्यात उपभोगातून मिळणारा आनंद- आणि युडोमॉनिक (Euduaimonic) म्हणजे आपल्या आंतरिक क्षमतांच्या वापरामुळे झालेला आनंद.

 


  रोजच्या या धावपळीच्या जीवनात आपण आनंद शोधात असताना आनंदाचे केंद्रबिदूच बदलून टाकतो आणि दिवसभराच्या सर्व कामांवर त्या क्षणांचा परिणाम आपल्यावर होऊ लागतो. सकाळी ऑफिस ला निघताना नवरा बायकोचं भांडणं झालं तर अथवा आपल्या प्रियकर/प्रेयसीकडून ठरल्याप्रमाणे वागणूक नाही मिळाली तर आपल्याला वाईट वाटू लागतं व दिवसभर आपण त्या विचारात गुंतून पडतो. म्हणजे या ठिकाणी आपला आनंद हा व्यक्ती केंद्रित झाला. जेव्हा आनंद हा व्यक्तीकेंद्रित होतो तेव्हा मनासारखं वागावं, ठरल्याप्रमाबे व्हावं,स्तुती व्हावी असं सर्व घडलं तरच आनंद मिळतो. या आनंदासाठी आपण अपेक्षांचं ओझं व्यक्तींवर लादत असतो. मुळात व्यक्ती  स्वतंत्र असल्याने कोणत्याही ओझ्याखाली अधिक काळ टिकू शकत नाही त्यामुळे व्यक्तीकेंद्रित आनंद हा चिरकाल टिकेलच याची शाश्वती नसते. 
कधी कधी आनंद आणि समाधान यात लोकांचा फार गोंधळ उडालेला असतो. पगारात वाढ झाली की आनंद होतो पण त्याने समाधान मिळतेच असे नाही कारण समाधानाच्या शोधातील एक प्रवासी क्षण म्हणजे आनंद. मनाला प्रसन्न वाटणारी ही स्थिती हा आनंद जीवनात क्षणोक्षणी शोधण्याचा प्रयत्न करा.

 एखादं कामं करताना मनात संकोच नसणं,त्या क्षणाला वाटलं म्हणून हवं तसं मुक्त वावरावसं वाटणं आणि त्या कामातून किंवा कृतीतून आनंद मिळून केवळ खळखळूण मनसोक्त जगण्याची इच्छा तुमच्यात जागृत होत असेल तर त्या  भावनांना दाबून न ठेवता हवं तसं जगण्याचा प्रयत्न करा. 
 विंदा करंदीकरांच्या काही ओळी आठवतात. ‘असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर.’

(लेखक  सामाजिक काम करतात.)
 

Web Title: International happiness day: search your happiness within you.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.