Lokmat Sakhi >Mental Health > कुत्रा, मांजर पाळणं डोकेदुखी वाटतं? हा तर टेंशन घालवण्याचा बेस्ट उपाय, थेरपीचा नवा प्रकार

कुत्रा, मांजर पाळणं डोकेदुखी वाटतं? हा तर टेंशन घालवण्याचा बेस्ट उपाय, थेरपीचा नवा प्रकार

international Dog day : पाळीव प्राणी तुम्हाला व्यायाम करण्यास आणि खेळण्यास प्रोत्साहित करू शकतात. अगदी तुमच्या हृदयाचेही आरोग्य सुधारू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 04:43 PM2021-08-26T16:43:44+5:302021-08-26T17:00:48+5:30

international Dog day : पाळीव प्राणी तुम्हाला व्यायाम करण्यास आणि खेळण्यास प्रोत्साहित करू शकतात. अगदी तुमच्या हृदयाचेही आरोग्य सुधारू शकते.

International Dog day : Pet therapy mental health benefits | कुत्रा, मांजर पाळणं डोकेदुखी वाटतं? हा तर टेंशन घालवण्याचा बेस्ट उपाय, थेरपीचा नवा प्रकार

कुत्रा, मांजर पाळणं डोकेदुखी वाटतं? हा तर टेंशन घालवण्याचा बेस्ट उपाय, थेरपीचा नवा प्रकार

Highlightsपाळीव प्राण्यांच्या 74% मालकांनी पाळीव प्राण्यांच्या सहवासानं मानसिक आरोग्यात सुधारणा  झाल्याचं सांगितले.

रोजचं जीवन जगताना सगळ्यांनाच ताण, स्ट्रेसचा सामना करावा लागतो. जो तो व्यक्ती ताण हलका करण्यासाठी काय करता येईल याचा मार्ग शोधतो. घरोघरच्या महिलांच्या डोक्यावरचा ताण काही केल्या कमी होत नाही. कारण एकामागोमाग एक कामांची यादी काही सरत नाही. तुमचा विश्वास बसणार नाही पण ताण घालवण्यासाठी पाळीव प्राण्यांचा खूप उपयोग होतो. आता वैद्यानिकदृष्यासुद्धा हे सिद्ध झालं की पाळीव प्राणी विशेषतः कुत्रे, मांजरी ताण- तणाव कमी करण्याशिवाय व्यक्तीचा एकटेपणा दूर करतात. 

पाळीव प्राणी तुम्हाला व्यायाम करण्यास आणि खेळण्यास प्रोत्साहित करू शकतात. अगदी तुमच्या हृदयाचेही आरोग्य सुधारू शकते. त्याच वेळी, पाळीव प्राणी वृद्धांसाठी एक चांगला साथीदार असल्याचे सिद्ध झाले आहे. पाळीव प्राणी असण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे लक्षात घेता, पाळीव प्राण्यांच्या थेरेपीवर औपचारिक संशोधन प्रथम 1960 च्या दशकात सुरू झाले. आज आंतरराष्ट्रीय श्वान (international Dog day) दिनानिमित्त समजून घेऊया पाळीव प्राण्यांच्या घरात असल्यानं कोणकोणते  आजार टाळता येतात. 

पेट थेरेपी काय आहे?

पेट थेरपी ही एक व्यक्ती आणि प्रशिक्षित प्राणी यांच्यात मार्गदर्शित संवाद आहे. याला अॅनिमल असिस्टेड थेरपी असेही म्हणतात. या थेरपीचा हेतू एखाद्या व्यक्तीस आरोग्याच्या समस्या किंवा मानसिक विकारावर मात करण्यास किंवा त्याला सामोरे जाण्यास मदत करणे आहे. या थेरेपीसाठी  जास्तीत जास्तवेळा कुत्रे आणि मांजरींचा वापर केला जातो. 

पेट थेरेपी कशी काम करते

ऑक्सफोर्ड ट्रिटमेंट सेंटरनुसार पाळीव प्राण्यांमध्ये ताण, तणाव, एंग्जायटी (anxiety) आणि डिप्रेशन कमी करण्याची आणि रुग्णांना आराम देण्याची क्षमता असते. पाळीव प्राण्यांशी बोलल्यानंतर  मूडही चांगला राहतो. प्राण्यांशी बोल्यानं व्यक्तीमध्ये  एंडोर्फिन वाढते त्यामुळे आनंद मिळतो. एंडोर्फिन हे मेंदूचे रसायन आहे जे शरीरातील तणाव आणि वेदना कमी करण्यासाठी महत्वाचं ठरतं. हे ओपिओइड नावाच्या औषधांच्या गटासारखे कार्य करते. ओपिओइड्समध्ये एनाल्जेसिक (Analgesic) आणि सेडेटिव इफेक्ट्स (sedative effects) असतात ते वेदना कमी करण्यासाठी वापरले जातात.

पेट थेरेपीचे फायदे

पाळीव प्राण्यांच्या 74% मालकांनी पाळीव प्राण्यांच्या सहवासानं मानसिक आरोग्यात सुधारणा  झाल्याचं सांगितले. कुत्रा किंवा मांजरीबरोबर खेळल्याने सेरोटोनिन आणि डोपामाइनची पातळी वाढू शकते, जे मन शांत करण्यासाठी आणि आराम देण्यासाठी फायदेशीर  ठरतं. 

कर्करोगावर उपचार घेत असलेले लोक, दीर्घकाळ एखाद्या आजारावर उपचार घेत असलेले लोक, हृदयरोगाचे रुग्ण, स्मृतिभ्रंश असलेली व्यक्ती, चिंताग्रस्त लोक, मानसिक आरोग्य विकार असलेले लोक, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) असेलेल्या लोकांना पेट्स थेरेपीचा फायदा होऊ शकतो. 

Web Title: International Dog day : Pet therapy mental health benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.