Lokmat Sakhi >Mental Health > मेरा चैन वैन सब उजड़ा, ‘इतके’ तुम्ही मोबाइल पाहिला नाही तर दिवाने होता?

मेरा चैन वैन सब उजड़ा, ‘इतके’ तुम्ही मोबाइल पाहिला नाही तर दिवाने होता?

सोशल मीडिया ॲक्डिक्शन ही सध्याची सर्वात मोठी समस्या आहे. प्रत्येकानेच त्यातून बाहेर पडण्याचा विचार करायला हवा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2024 06:10 PM2024-06-07T18:10:52+5:302024-06-07T18:16:33+5:30

सोशल मीडिया ॲक्डिक्शन ही सध्याची सर्वात मोठी समस्या आहे. प्रत्येकानेच त्यातून बाहेर पडण्याचा विचार करायला हवा.

how to get rid of social media addiction? social media addiction not good for mental health | मेरा चैन वैन सब उजड़ा, ‘इतके’ तुम्ही मोबाइल पाहिला नाही तर दिवाने होता?

मेरा चैन वैन सब उजड़ा, ‘इतके’ तुम्ही मोबाइल पाहिला नाही तर दिवाने होता?

Highlightsतुम्हाला सोशल मीडिया पाहण्याचे व्यसन तर जडले नाही ना?

डाॅ. संजय जानवळे (एम. डी. बालरोगतज्ज्ञ)

सतत काहीतरी करणे, हा माणसाच्या स्वभावाचा जणू स्थायीभाव आहे. ‘काहीच न करता नुसतं बसलं की, एकाकीपणा वाटायला लागतो, कटांळा येतो, मन चिंताक्रांत होते. सतत मोबाईल पहाण्याने यापासून दिलासा लाभतो. पण एकदा सोशल मीडिया पहाण्यास सुरुवात केली की, वेळ कुठे जातो हे कळत नाही. त्यासाठी तुम्ही सोशल मीडियावर किती वेळ घालवता हे आधी. तपासून पहा. तुम्हाला सोशल मीडिया पाहण्याचे व्यसन तर जडले नाही ना?

व्यसन लागले आहे हे कसे तपासायचे?

सकाळी उठल्यावर लगेच अथवा रात्री झोपण्यापुर्वी शेवटी सोशलमिडीया पहात असाल तर..
स्मार्टफोन नसल्यास तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर..
लाईक्स, रिट्विटस्, व्हूयज मिळत नसल्यास वाईट वाटत असेल तर..
मित्रांना, कुटुंबातील सदस्यांना प्रत्यक्षात बोलण्याऐवजी सोशल मीडियातच बोलावे वाटत असेल तर..
रोज घडलेल्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला ऑनलाइन शेअर कराव्या वाटत असतील तर..
तर समजा की तुम्हाला सोशल मीडियाचे व्यसन जडले आहे, असे समजावे.

होतं काय?

१. लहानथोरांपासून सर्वजण स्मार्टफोनच्या आहारी गेले आहेत, महिलाही याला अपवाद नाहीत. जगभरात सुमारे ३.८ अब्जाहून अधिक लोक स्मार्टफोनचा वापर करत असून त्यांच्या आधुनिक जीवनाची ती एक नैसर्गिक गरज बनली आहे. साधारणपणे एक भारतीय सुमारे १९४ मिनिटे सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर व्यतीत करतात. स्मार्टफोन किंवा टॅब वर १०० टक्के लोक सोशल मीडिया पाहतात. सोशल मीडियाचे ८९ टक्के युजर्स रोज ॲक्टिव्ह असतात. 
२. शाळकरी मुलात स्मार्टफोन वापराचे प्रमाण मोठे असून त्यांना त्याचे व्यसन जडण्याचा धोका संभवत आहे. शास्त्रज्ञाच्या मते स्मार्टफोनमध्ये सोशल मीडिय पाहतांना बरं वाटणारे जे केमिकल्स स्रवतात ते हेराॅईन सारख्या मादकपदार्थाहून अधिक तीव्र असतात.
३. सकाळी उठल्यावर हातात आधी मोबाईल असतो. सकाळी तंबाखूचे सेवन केल्याशिवाय काही जणांना शौचास होत नव्हती, आता मोबाईल पाहिल्याशिवाय ती होत नाही. म्हणून बरेचजण स्वच्छतागृहातही मोबाईल घेऊन जातात आणि तोच मोबाईलच जेवतानाही ते पहात असतात. कुठे पर्यटनाला गेले की, पहिले सेल्फी काढ, व्हिडीओ काढ अन् कर पोस्ट कर अशी घाई झालेली असते. तिथले निसर्गसौंदर्य पाहून हरखून जाणे, क्षणभर स्वत:ला विसरणे, तल्लीन होणे सोडा, तो देखावा मनाच्या खोल कप्प्यात, स्मृतीकोषात साठवणे सोडा. तो फोटो जास्त लोकांनी लाईक केला नाही तर मन उदास होते. पर्यटनाच्या आनंदाचे मुसळ तर केरात जाते.

४. आता प्रत्येक मुलाच्या हातात मोबाईल असतो. बोटाने स्क्रिन स्क्रोल करण्यात ती मुलं व्यग्र असतात. मोबाईलशिवाय काही मुले खातपितही नाहीत. मोठी मुले फुटबाॅल सारखे खेळ मैदानावर नव्हे, तर मोबाईलवर खेळताना दिसतात. म्हणून मुलांमध्ये लठ्ठपणा वाढला आहे. 
५. ‘इंडीयन ॲकडमी आॅफ पेडियाट्रिक्सने’, दोन वर्षे वयाखालील मुलांना मोबाईल वापरण्यास मनाई केली आहे. मोठी मुले मोबाईलवर नको त्या गोष्टी बघतात आणि पालकांचे त्याकडे साफ दुर्लक्ष असते.
६. या व्यसनांमुळे माणसं माणसांशी दुरावयाला लागली आहेत. पती पत्नीच्या नाजूक नात्यावर त्याचा अनिष्ट परिणाम होत आहे. पुर्वी रस्त्यात मित्र भेटले की चेहरे फुलत असत. हसत गळाभेट होत असे. चार मित्र कट्टावर भेटत असत, तेव्हाचा एक कट चहा अन मनमोकळ्या गप्पा, थट्टामस्करी व हशा आता उरला नाही. आभासी विश्वात आपण वावरत आहोत. 

७. सर्वकाही निरर्थक आहे असे वाटायला लागले आहे. उत्सुकता व उत्साह कमी झाला आहे. दीर्घकाळ स्मार्टफोनच्या अतिवापराने मेंदूत अनेक केमिकल लोचे होतात व त्यामुळे गॅमा- अमिनोब्युटीरिक ॲसिड ( GABA) या न्युरोट्रान्समिटरचे प्रमाण कमीजास्त होते. निद्रानाश, एकाग्रता कमी होणे, सजृनशिलता कमी होणे, चिंताग्रस्तता वाढते. आकलनशक्ती कमी होणे, ताणतणाव वाढणे, एकाकीपणा, सतत असुरक्षीत वाटत राहणे, नातेसंबधात दुरावा, मानसिक आजार ही स्मार्टफोन व सोशलमिडीया अतिवापराचे दुष्परिणाम आहेत.

काय करता येईल?

१. या व्यसनापासून मुक्ती मिळवायला हवी. त्यासाठी सकाळी उठण्यासाठी अलार्म म्हणून मोबाईलचा वापर करु नका. सकाळी उठल्यावर लगेच मोबाईल पाह्यण्याची घाई करु नका. चार्जिंग करण्यासाठी मोबाईल दुसऱ्या खोलीत ठेवा. मोबाईलचा वापरावर स्वत: मर्यादा आणा. जेवताना मोबाईल सोबत ठेऊ नका. 
२. विशिष्ट कालावधीत मोबाईल स्वीच ऑफ ठेवा. कधीकधी मोबाईल घरी किंवा कारमध्येच राहू द्या. अवतीभवती, तुम्ही राहता, काम करता तिथे मन रमवा. तुमच्या भावनांचा विचार करा.
३. राहण्यासाठी झोपण्यापुर्वी किमान एक तास मोबाईल पाहू नका. वाचनासारखे छंद जोपासा. वाहन चालवताना जेवताना मोबाईल वापरु नका. आठवड्यातून एकदा नो मोबाईल दिवस पाळा. मोबाईल वापराबाबत नियमावली तयार करा.
४. मी या व्यसनापासून मुक्ती मिळवण्यासाठी  जिम जाॅईन केले. रनिंग सुरु करु केले. मित्रांच्या भेटी वाढवल्या.


dr.sanjayjanwale@gmail.com

Web Title: how to get rid of social media addiction? social media addiction not good for mental health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.