Join us
Daily Top 2Weekly Top 5

सतत आनंदी, स्ट्रेस फ्री रहायचंय? रोजच्या रूटीनमध्ये करा एक छोटासा बदल, तणाव-चिंता काय असते विसराल....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 09:23 IST

Mental Health: जर आपल्याला आनंदी, स्ट्रेस फ्री रहायचं असेल तर एक बदल आपल्यासाठी महत्वाचा ठरतो. तो कोणता हे पाहुयात.

How Reducing Social Media Improves Mental Health: आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावर स्क्रोल करत वेगवेगळे रील्स बघणे, पोस्ट बघणे ही अनेकांची रोजची सवय झाली आहे. इन्स्टाग्रामवर अपडेट्स पाहणे, TikTok व्हिडीओ बघणे किंवा व्हॉट्सअॅपवर मेसेजला उत्तर देणे या सगळ्यात लोक तासन्तास घालवतात, पण याचा मानसिक आरोग्यावर किती परिणाम होतो हे अनेकांना कळत नाही. असंही म्हणू शकतो की, कळत असूनही कुणी त्यावर लक्ष देण्याबाबत फारसे गंभीर नसतात. कोविड महामारी दरम्यान सोशल मीडियाने लोकांना जोडून ठेवण्यास मदत केली, पण आता तज्ज्ञांच्या मते जास्त स्क्रीन टाइम फायदेशीरपेक्षा अधिक हानिकारक ठरू शकतो. पण जर आपल्याला आनंदी, स्ट्रेस फ्री रहायचं असेल तर एक बदल आपल्यासाठी महत्वाचा ठरतो. तो कोणता हे पाहुयात.

संशोधनात काय आढळलं?

जर्मनीतील एका मेंटल हेल्थ रिसर्च केंद्रात, Julia Brailovskaia यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या अभ्यासात एक सोपा उपाय समोर आला. तो म्हणजे सोशल मीडिया वापर कमी करा आणि त्या वेळेत शारीरिक हालचाल वाढवा. रिसर्चनुसार, दररोज फक्त 30 मिनिटे सोशल मीडियावर घालवला जाणारा वेळ कमी करून त्या वेळेत व्यायाम केल्यास मानसिक आरोग्यात मोठा सकारात्मक बदल दिसतो.

या अभ्यासात 642 लोकांचा समावेश होता. त्यांना वेगवेगळ्या गटांमध्ये विभागण्यात आले. एका गटाने 30 मिनिटे सोशल मीडिया कमी केला. दुसऱ्याने 30 मिनिटे व्यायाम वाढवला, तिसऱ्याने दोन्ही बदल केले, चौथ्या गटाने काहीही बदल केला नाही.

दोन आठवड्यांनंतर दिसून आले की, ज्यांनी सोशल मीडियाचा वापर कमी केला किंवा व्यायाम वाढवला ते अधिक आनंदी आणि कमी तणावग्रस्त होते. डिप्रेशनची लक्षणे कमी झाली. सर्वात जास्त फायदा त्या लोकांना झाला ज्यांनी दोन्ही बदल एकत्र केले.

एक्सपर्ट्स काय सांगतात?

एक्सपर्टच्या मते, सोशल मीडियाचा जास्त वापर हा व्यसनासारखा होऊ शकतो. सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्स, इतरांशी तुलना आणि नकारात्मक कंटेंट यामुळे चिंता आणि असुरक्षितता वाढते. याउलट, शारीरिक हालचाल जसे की, वॉकींग, जॉगिंग केल्याने शरीरात फील गुड हार्मोन्स तयार होतात, जे मूड सुधारतात, तणाव कमी करतात आणि ऊर्जा वाढवतात. 

दीर्घकालीन परिणाम

या अभ्यासाची खास गोष्ट म्हणजे त्याचे फायदे दीर्घकाळ टिकले. 6 महिन्यांनंतरही लोकांमध्ये सोशल मीडिया वापर कमी आणि व्यायामाची सवय जास्त दिसून आली, खासकरून ज्यांनी दोन्ही बदल केले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Happy and Stress-Free? Small Daily Change Beats Anxiety, Worry!

Web Summary : Reducing social media by 30 minutes daily and exercising improves mental health. A study showed increased happiness and reduced stress with these changes, especially when combined. Benefits lasted long-term, even after six months.
टॅग्स :मानसिक आरोग्यहेल्थ टिप्ससोशल मीडिया