Join us

रोज न विसरता करा ५ गोष्टी, १० मिनिटंही पुरेशी-मात्र मेंदू होईल कम्प्युटरपेक्षा सुपरफास्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 13:41 IST

Strong Brain Activity : रोज केवळ १० मिनिटं काही खास अ‍ॅक्टिविटी करूनही मेंदुची क्षमता वाढवता येऊ शकते. असे काही ५ उपाय आपण पाहणार आहोत.

Strong Brain Activity : आजकाल स्पर्धा इतकी वाढली आहे की, मेंदू तेजतर्रार आणि अ‍ॅक्टिव ठेवावा लागतो. तेव्हा इतरांच्या सोबतच आपण चालू शकतो. विद्यार्थी असो वा प्रोफेशनल तल्लख बुद्धी किंवा हुशारी महत्वाची ठरते. मेंदू शार्प करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी केल्या जाऊ शकतात. महत्वाची बाब म्हणजे यासाठी आपल्याला फार जास्त वेळही खर्च करण्याची गरज नाही. रोज केवळ १० मिनिटं काही खास अ‍ॅक्टिविटी करूनही मेंदुची क्षमता वाढवता येऊ शकते. असे काही ५ उपाय आपण पाहणार आहोत.

पझल सॉल्व्ह करा

पझल सॉल्व्ह करणं किंवा ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमधील गोष्टी शोधणं एक चांगली कसरत आहे. कोडी सोडवणं किंवा लॉजिकल पझल सॉल्व्ह केल्यानं मेंदुची विचार करण्याची आणि समजण्याची क्षमता वाढते. ज्यामुळे मेंदू अधिक अ‍ॅक्टिव होतो. समस्या सोडवण्याची क्षमता वाढते. स्मरणशक्ती वाढते. रोज केवळ १० मिनिटं ही पझल्सची ही अ‍ॅक्टिविटी केली तर आपला मेंदू शार्प होऊ शकतो.

मेडिटेशन

मेडिटेशन करून केवळ स्ट्रेस कमी होतो असं नाही तर मेंदू शार्प करण्यासही मदत मिळते. रोज केवळ १० मिनिटं मेडिटेशन केल्यानं आपला फोकस वाढतो. एकाग्रता वाढते, कन्फ्यूजन दूर होतं आणि तणाव कमी होतो. सुरूवातीला केवळ ५ ते १० मिनिटं मेडिटेशन करून बघाल तर फरक दिसून येईल.

रोज नवे शब्द शिका

रोज नवे शब्द शिकण्याची किंवा भाषा शिकण्याची अ‍ॅक्टिविटी केली तर मेंदू अ‍ॅक्टिव राहतो. रोज केवळ ५ नवीन शब्द शिकल्यास शब्दसाठा तर वाढतोच, सोबतच मेंदुही शार्प होतो. इतकंच नाही तर आपलं कम्युनिकेशन स्किलही सुधारतो. स्मरणशक्ती वाढते आणि नवीन भाषा शिकणं सोपं होतं. यासाठी आपण डिक्शनरी, वर्ड ऑफ द डे अ‍ॅप्स किंवा न्यूजपेपर वाचू शकता.

म्यूझिक ऐका

म्यूझिक ऐकणं केवळ मनोरंजन नाही तर मेंदुसाठीही फायदेशीर असतं. खासकरून क्लासिकल म्यूझिकनं मेंदुची काम करण्याची क्षमता वाढते. म्यूझिक ऐकल्यानं मूड फ्रेश होतो, क्रिएटिव्हिटी वाढते आणि स्मरणशक्ती वाढते. त्यामुळे रोज १० मिनिटं शांत वातावरणात म्यूझिक ऐकून मेंदू शार्प करू शकता.

वाचन करा

वेगवेगळ्या विषयांची पुस्तकं वाचणं मेंदुसाठी सगळ्यात चांगली एक्सरसाईज मानली जाते. रोज किमान १० मिनिटं पुस्तक वाचल्यास मेंदू अ‍ॅक्टिव राहतो. असं केल्यानं नॉलेज वाढतं. सोबतच कल्पनाशक्तीही वाढते आणि विचार करण्याची पद्धतही सुधारते. जर मोठाले पुस्तकं वाचण्यासाठी वेळ नसेल तर छोट्या छोट्या कथाही वाचू शकता किंवा लेख वाचू शकता.

टॅग्स :मानसिक आरोग्यहेल्थ टिप्सआरोग्य