Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्न मोडलं म्हणून ‘ती’ डगमगली नाही, मैदानात उतरताच केला नवा विक्रम-स्मृती मानधनाची कमाल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2025 19:07 IST

Smriti Mandhana is back in action !! after heartbreak she came back stronger, broke a record : स्मृती मानधनाने केला नवा विक्रम. लग्न मोडले पण जिद्द नाही.

तो मला सोडून गेला, त्याच्याशिवाय मी आयुष्यात काहीच करु शकत नाही. ही वाक्य ओळखीची वाटतात का? अनेक मुलींना ब्रेकअपनंतर असेच वाटते. अर्थात ते सहाजिक आहे , त्यामागे भावना तशीच असते. (Smriti Mandhana is back in action !! after heartbreak she came back stronger, broke a record )पण त्या ब्रेकअपमधून बाहेर येताना कसे यायचे हे पूर्णपणे आपल्या हातात असते. लग्न मोडलं म्हणजे आयुष्य संपत नाही याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपली लाडकी स्मृती मानधना. गेल्या महिनाभर सगळीकडे तिच्या आणि पलाशच्या  लग्नाचीच बातमी होती. का मोडले, कसे मोडली काहीही स्पष्ट नाही. पण मानसिक त्रास तर नक्कीच होत असेल. लग्न मोडल्यानंतर स्मृती आता परत खेळणार की नाही. किती कालावधीचा ब्रेक घेणार. तिच्या खेळावर याचा परिणाम होईल वगैरे अनेक चर्चांनी जोर धरला होता पण सगळ्यांची बोलती बंद करत माझ्यासाठी क्रिकेट खेळण्याएवढं महत्त्वाचं काहीच नाही असें स्पष्टपणे स्मृतीने सांगितलं. 

भारतीय महिला क्रिकेटसाठी २१ डिसेंबर हा दिवस अभिमानाचा ठरला. विजाग येथे श्रीलंका विरोधातील पहिल्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात स्मृती मानधाना हिने केवळ मैदानावर पुनरागमनच केले नाही, तर इतिहासही रचला. महिला टी २० क्रिकेटमध्ये ४,००० धावा पूर्ण करणारी ती जगातील दुसरी तर भारताची पहिली खेळाडू ठरली. हा टप्पा गाठताच स्मृतीने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता, सातत्य आणि मानसिक ताकद सिद्ध केली.

१२२ धावांचे लक्ष्य गाठत स्मृतीने हा रेकॉर्ड रचला. आकडेवारीपेक्षा अधिक महत्त्वाची बाब म्हणजे तिचे हे पुनरागमन. काही काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर थेट मैदानात येऊन असा विक्रम करणे, हे प्रत्येक खेळाडूला जमतेच असे नाही. वैयक्तिक आयुष्यात सुरु असलेल्या घडामोडींचा खेळीवर परिणाम होऊ न देता ती बिनधास्त खेळली. 

स्मृती मनधाना ही आज केवळ एक यशस्वी फलंदाज नाही, तर भारतीय महिला क्रिकेटची ओळख जगभरात करुन देणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. भारतासाठी टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू म्हणून तिचे नाव आधीच कोरले गेले आहे. आता ती न्यूझीलंडच्या दिग्गज खेळाडू सुजी बेट्स यांच्या ४,७१६ धावांच्या विक्रमाच्या जवळ पोहचली आहे. हे लक्ष्य गाठणेही अशक्य नाही, कारण स्मृतीचा फॉर्म, फिटनेस आणि खेळावरील निष्ठा आजही तितकीच भक्कम आहे.

मैदानाबाहेरही स्मृतीने घेतलेले निर्णय तिच्या समर्पणाची साक्ष देतात. वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांनाही तिने बाजूला ठेवून देशासाठी खेळण्याला प्राधान्य दिले. संघाच्या विजयासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देणारी ही वृत्तीच तिला इतरांपेक्षा वेगळी ठरवते. अलीकडेच भारताच्या ODI विश्वचषक विजयातही तिची भूमिका निर्णायक ठरली होती.

स्मृती मंधानाचे कौतुक केवळ तिच्या धावांसाठी नाही, तर तिच्या सकारात्मक वृत्ती, शांत नेतृत्व आणि तरुण खेळाडूंना मिळणाऱ्या प्रेरणेसाठीही केले जाते. तिचा प्रत्येक डाव भारतीय महिला क्रिकेटला नवी दिशा देतो. ती खेळताना दिसली की आत्मविश्वास, संयम आणि आक्रमकता यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Smriti Mandhana shines after called-off wedding, sets new record!

Web Summary : Despite personal turmoil, Smriti Mandhana achieved a T20 milestone, becoming the fastest Indian woman to score 4000 runs. Her resilience inspires, proving that cricket remains her unwavering priority and passion.
टॅग्स :स्मृती मानधनाटी-20 क्रिकेटमहिलाप्रेरणादायक गोष्टीसोशल व्हायरलसोशल मीडिया