आपण बहुतेक लोकांकडून ऐकलं असेल की लग्न झाल्यानंतर किंवा मुलं झाल्यानंतर करिअरबद्दल विचार करायलाही वेळ मिळत नाही. पण मेहनत करण्याची तुमची तयारी असेल आणि कुटुंबाचा पाठिंबा असेल तर तुम्ही लग्न आणि मुलं झाल्यानंतरही तुमची स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकता. केरळच्या मालविका नायर यांनी हे सिद्ध करून दाखवलं आहे. मुलाला जन्म दिल्यानंतर १७ दिवसांनी यूपीएससी परीक्षा दिली आणि उत्तीर्ण होऊन आयएएस झाल्या.
मालविका यांनी २०२४ च्या यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत ४५ वा रँक मिळवून एक आदर्श निर्माण केला आहे. त्या प्रेग्नेंट असताना त्यांनी प्रिलिम्स परीक्षा दिली. प्रिलिम्स उत्तीर्ण झाल्यानंतर मुख्य परीक्षेची तयारी सुरू केली, याच काळात त्यांच्या कुटुंबाने त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. बाळंतपणानंतर अवघ्या १७ दिवसांतच त्यांने मुख्य परीक्षा दिली आणि मोठं यश मिळवलं आणि आज त्या सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.
जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी
मालविका खूप दिवसांपासून यासाठी तयारी करत होत्या, याआधीही त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती, पण त्या त्यांच्या रँकवर खूश नव्हत्या. २०२२ मध्ये तिला ११८ वा आणि १७२ वा रँक मिळाला, परंतु पसंतीचा रँक न मिळाल्याने त्यांनी लग्नानंतरही हा अभ्यास असाच सुरू ठेवला आणि मुलाच्या जन्मानंतरही परीक्षा देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला.
कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, बापलेकीच्या हिमतीने भल्याभल्यांना केलं चितपट
अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान
एका मुलाखतीत मालविका यांनी सांगितलं की, ती शारीरिकदृष्ट्या कमकुवत होत्या, परंतु कुटुंबाच्या पाठिंब्याने त्यांनी हे आव्हान स्वीकारलं. मालविका यांचे पती आयपीएस अधिकारी आहे. मालविका यांना त्यांच्या आई-वडिलांनी खूप मदत केली. त्यांच्या मुलाची काळजी घेतली. मालविका यांच्या मोठ्या यशामागे त्यांची अनेक वर्षांची मेहनत आहे.