Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Inspirational > Women's Day 2026 : स्मृती मानधना 'बार्बी डॉल’, क्रिकेट खेळणारी स्मृती बार्बीच्या रुपात-पहिली भारतीय महिला..

Women's Day 2026 : स्मृती मानधना 'बार्बी डॉल’, क्रिकेट खेळणारी स्मृती बार्बीच्या रुपात-पहिली भारतीय महिला..

International Women's Day 2026: Smriti Mandhana Barbie doll: भारतीय क्रिकेटपटू Smriti Mandhana हिला बार्बीच्या पहिल्या “ड्रीम टीम” मध्ये स्थान मिळालं असून तिच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित खास बार्बी डॉल तयार करण्यात आली आहे.

By कोमल दामुद्रे | Updated: March 6, 2026 14:21 IST2026-03-06T14:20:15+5:302026-03-06T14:21:59+5:30

International Women's Day 2026: Smriti Mandhana Barbie doll: भारतीय क्रिकेटपटू Smriti Mandhana हिला बार्बीच्या पहिल्या “ड्रीम टीम” मध्ये स्थान मिळालं असून तिच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित खास बार्बी डॉल तयार करण्यात आली आहे.

International Women's Day 2026 Smriti Mandhana Barbie doll Women in sports Barbie First Indian cricketer Barbie doll Barbie Dream Team 2026 Smriti Mandhana achievement Role model for girls | Women's Day 2026 : स्मृती मानधना 'बार्बी डॉल’, क्रिकेट खेळणारी स्मृती बार्बीच्या रुपात-पहिली भारतीय महिला..

Women's Day 2026 : स्मृती मानधना 'बार्बी डॉल’, क्रिकेट खेळणारी स्मृती बार्बीच्या रुपात-पहिली भारतीय महिला..

लहानपणी आपल्या प्रत्येकीकडे एक तरी बार्बी बाहुली असेलच. पिढ्यापिढ्या मुलींचे जग हे बाहुली आणि घरघर याभोवतीच फिरत होते. या बार्बी बाहुलीने अनेक दशक मुलींच्या मनावर राज्य केलं. लहानपणी बाहुल्या खेळताना अनेक मुली स्वतःला डॉक्टर, शिक्षिका किंवा राजकुमारी म्हणून कल्पना करत असतं. त्या कल्पनांच्या जगात एक नाव कायम असायचं ते म्हणजे बार्बी डॉलच. वर्षानुवर्षे वेगवेगळ्या रूपात येणारी ही बाहुली आता एका नव्या रूपात समोर आली आहे , ती म्हणजे खेळाडूच्या रूपात. यावर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना हिला बार्बीच्या पहिल्या “ड्रीम टीम” मध्ये स्थान मिळालं आहे. तिच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित खास बार्बी डॉल तयार करण्यात आली आहे. ही केवळ एक बाहुली नसून मुलींना मोठी स्वप्नं पाहण्याचा संदेश देणारी कल्पना आहे.

विराट कोहली-रोहित शर्मा सांभाळतात बाळं-बदलतात डायपर, ऐका दमलेल्या बाबाची नवी कहाणी

बार्बी ही अनेक पिढ्यांच्या लहानपणीचा अविभाज्य भाग राहिली आहे. गुलाबी कपडे, सुंदर केस आणि वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये दिसणारी बार्बी मुलींच्या कल्पनाशक्तीला उंच भरारी देत आली. पण आता या बाहुलीने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे, ती खेळाडूंच्या रूपातली बार्बी.

प्रसिद्ध खेळणी उत्पादक Mattel ने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त “बार्बी ड्रीम टीम” ची घोषणा केली. या उपक्रमाचा उद्देश विविध क्षेत्रात अडथळे पार करून यश मिळवणाऱ्या महिलांचा गौरव करणे हा आहे. या टीममध्ये जगभरातील आठ प्रेरणादायी महिलांचा समावेश आहे.

या यादीत टेनिस स्टार Serena Williams, अंतराळवीर Kellie Gerardi, इंग्लंडची फुटबॉलपटू Chloe Kelly, रेसिंग ड्रायव्हर Regina Sirvent, तसेच इतर जागतिक क्रीडापटूंचा समावेश आहे. या सर्वांमध्ये भारतातून स्थान मिळालेली एकमेव खेळाडू म्हणजे स्मृती मानधना.

स्मृतीच्या प्रतिमेनुसार तयार केलेली ही बार्बी डॉल तिच्या क्रिकेटमधील कामगिरीचा गौरव करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. ही बाहुली विक्रीसाठी उपलब्ध नसली तरी तिचं महत्त्व खूप मोठं आहे. कारण ती मुलींना एक नवा संदेश देते, तुम्हीही खेळाडू होऊ शकता. लहानपणी भातुकली, घरघर आणि बाहुल्या खेळणाऱ्या मुलींच्या जगात आता एक नवी प्रतिमा तयार होत आहे. बार्बी जर क्रिकेटपटूच्या रूपात दिसत असेल, तर त्या बाहुलीशी खेळणाऱ्या मुलींनाही मैदानावर उतरण्याची प्रेरणा मिळू शकते.

आज स्मृती मानधना मैदानावर भारताची उपकर्णधार आहे. तिची फलंदाजी, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण कामगिरी तिला जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये स्थान मिळवून देते. पण तिचं बार्बी डॉलमध्ये रूपांतर होणं हे केवळ वैयक्तिक यश नाही, ते प्रेरणेचं प्रतीक आहे. 

महिला दिन हा फक्त शुभेच्छा देण्यासाठी नसून, अशा प्रेरणादायी स्त्रियांच्या प्रवासाचे कौतुक करण्यासाठी आहे, ज्यांनी चौकटी मोडून स्वतःचे विश्व निर्माण केले. स्मृती मानधना ही अशाच एका पिढीचे प्रतिनिधित्व करते जी केवळ स्वप्न पाहत नाही, तर ती स्वप्ने सत्यात उतरवते.

 


Web Title : स्मृति मंधाना: बार्बी डॉल के रूप में पहली भारतीय महिला क्रिकेटर

Web Summary : महिला दिवस पर भारतीय क्रिकेटर स्मृति मंधाना बार्बी की 'ड्रीम टीम' में शामिल हुईं। उनसे प्रेरित एक बार्बी डॉल उनकी उपलब्धियों का जश्न मनाती है, जो लड़कियों को खेल में आगे बढ़ने के लिए प्रेरित करती है। यह डॉल बिक्री के लिए नहीं है, लेकिन क्रिकेट में महिला सशक्तिकरण का प्रतीक है।

Web Title : Smriti Mandhana: First Indian woman cricketer as a Barbie doll.

Web Summary : Indian cricketer Smriti Mandhana joins Barbie's 'Dream Team' on Women's Day. A Barbie doll inspired by her celebrates her achievements, inspiring girls to pursue sports. This doll isn't for sale but symbolizes a powerful message of female empowerment in cricket.