lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Inspirational > आहार गाथेची भेट देणाऱ्या डॉ. कमला सोहोनींना गुगलचा सलाम! महान संशोधकाचा सन्मान

आहार गाथेची भेट देणाऱ्या डॉ. कमला सोहोनींना गुगलचा सलाम! महान संशोधकाचा सन्मान

Google Doodle Dr. Kamla Sohoni First Indian Women Scientist To get Ph.D. 112 Anniversary : डॉ. कमला सोहोनी हे नाव मराठी घरांमध्ये उत्तम परिचित आहेच, त्यांच्या वाढदिवसानिमित्त गुगलनेही त्यांचा विशेष सन्मान केला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2023 01:58 PM2023-06-19T13:58:10+5:302023-06-19T14:02:06+5:30

Google Doodle Dr. Kamla Sohoni First Indian Women Scientist To get Ph.D. 112 Anniversary : डॉ. कमला सोहोनी हे नाव मराठी घरांमध्ये उत्तम परिचित आहेच, त्यांच्या वाढदिवसानिमित्त गुगलनेही त्यांचा विशेष सन्मान केला.

Google Doodle Dr. Kamla Sohoni First Indian Women Scientist To get Ph.D. 112 Anniversary :Dr. who visited Ahar Gatha. Google Salute to Kamala Sohoni! Honoring a great researcher | आहार गाथेची भेट देणाऱ्या डॉ. कमला सोहोनींना गुगलचा सलाम! महान संशोधकाचा सन्मान

आहार गाथेची भेट देणाऱ्या डॉ. कमला सोहोनींना गुगलचा सलाम! महान संशोधकाचा सन्मान

डॉ. कमला सोहोनींचं आहार गाथा हे पुस्तक आजही घरोघर मिळावं. विशेषत: मातृत्त्वाची चाहूल लागली, आपण काय खावं, गरोदरपणात, बाळ झाल्यावर आणि पुढे बाळाचा आहार कसा असावा असे प्रश्न पडू लागले की आजही मराठीत एक पुस्तक घरी येतंच. त्याचंच नाव आहार गाथा. डॉ. कमला सोहोनी हे नाव मग अगदी आपल्या घरातल्या जिवाभावाच्या माणसाचं वाटू लागतं. कुणाही भारतीय शास्त्रज्ञाला हा मान मिळणं आणि त्यांचं संशोधन, अभ्यास हे सारं तर अत्यंत उत्तम आणि महान असावं हेच मराठी माणसांसाठी अभिमानाचं आहे. १८ जून हा डॉ. कमला सोहोनी यांचा वाढदिवस. गुगलने खास डूडल करत डॉ. कमला सोहोनी यांना सलाम केला. त्यांचा संशोधन ध्यास आणि अभ्यासाचाही गौरव केला (Google Doodle Dr. Kamla Sohoni First Indian Women Scientist To get Ph.D. 112 Anniversary).

डॉ. कमला सोहोनी. विज्ञानात पीएच.डी मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत १८ जून हा डॉ. सोहोनी यांचा जन्मदिवस, यंदा त्यांचा ११२ वा जन्मदिवस होता, यानिमित्त गुगलने त्यांचे कार्य दर्शवणारे डूडल तयार केले आहे. डॉ. सोहोनी यांचा फोटो, गुगलची अक्षरे आणि सूक्ष्मदर्शक, स्लाईड्स, वनस्पतीविज्ञान अशा विज्ञानाशी निगडीत गोष्टींची चित्रे असे अतिशय कल्पक असे हे डूडल तयार करण्यात आले आहे.

(Image : Google)
(Image : Google)

त्यांचा जन्म इंदौरमध्ये १८ जून १९११ मध्ये झाला. वडिल आणि काका विज्ञान क्षेत्रात कार्यरक होते. त्यामुळे कमला यांनीही याच क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. मुंबई विद्यापिठातून रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयांचा अभ्यास केल्यानंतर १९३३ मध्ये या विषयांत त्यांनी पदवी मिळवली. अशाप्रकारे विज्ञान शाखेत प्रवेश मिळवणे त्या काळी महिलांसाठी अजिबात सोपी गोष्ट नव्हती, मात्र त्यांनी त्यासाठी संघर्ष केला. इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्समध्ये सुरुवातीला महिलांवर लादण्यात आलेल्या कठोर अटी नियमांचा त्यांना सामना करावा लागला होता. अनेकदा त्यांच्या क्षमतांवरही शंका उपस्थित करण्यात आल्या. मात्र हार न मानता जिद्दीने सर्व अडथळे पार करत त्यांनी यश संपादन केले. त्यांचे हेच कतृत्व लक्षात घेऊन संचालकांनी त्यांचे कौतुक केले आणि त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये महिलांना प्रवेश मिळण्यास सुरुवात झाली. 

शेंगांमध्ये असलेल्या प्रथिने आणि त्याच्या पोषणामुळे विशेषत: मुलांवर होणारा परिणाम यावर डॉ. सोहोनी यांनी संशोधन केले. त्यांच्या निष्कर्षांनी बायोकेमिस्ट्रीच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले आणि पोषण वाढवण्यासाठी शेंगांचे महत्त्व देखील अधोरेखित केले आहे. १९३७ मध्ये डॉ. सोहोनी यांना केंब्रिज विद्यापीठात संशोधनासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि केंब्रिजची शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. वनस्पतींच्या पेशींमध्ये असलेल्या सायटोक्रोम सी चा शोध लावला. चौदा महिन्यांच्या कमी कालावधीत त्यांनी उर्जा निर्मितीसाठी उपयुक्त असाणाऱ्या या घटकाचा अभ्यास करुन शोध लावला. डॉ. सोहोनी यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले. मुंबईतील रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या त्या पहिल्या महिला संचालक होत्या.

Web Title: Google Doodle Dr. Kamla Sohoni First Indian Women Scientist To get Ph.D. 112 Anniversary :Dr. who visited Ahar Gatha. Google Salute to Kamala Sohoni! Honoring a great researcher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.