Join us  

Deepika padukone : '....१८ वर्षांची असल्यापासून लोक मला ब्रेस्ट सर्जरीचे सल्ले द्यायचे'; दीपिकानं शेअर केला विचित्र अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 2:12 PM

Deepika padukone : सर्वात वाईट सल्ल्याबद्दल बोलताना दीपिका म्हणाली, 'मला मिळालेला सर्वात वाईट सल्ला म्हणजे ब्रेस्ट इम्प्लांट करणं. तेव्हा मी फक्त 18 वर्षांची  होते

अभिनेत्री दीपिका पदुकोण  (Deepika Padukone)  शकुन बत्रा दिग्दर्शित 'गेहराईयां' (Gehraiyaan) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट नुकताच OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. आता दीपिका पदुकोणने एका मुलाखतीदरम्यान तिच्या आयुष्यातील लोकांकडून मिळालेला सर्वोत्तम आणि सर्वात वाईट सल्ला सांगितला. आपल्या आयुष्यातील सर्वात वाईट सल्ल्याची आठवण करून देत तिने सांगितले की, वयाच्या १८ व्या वर्षी अनेकांनी ब्रेस्ट इम्प्लांट करण्याचा सल्ला दिला होता.  (Deepika padukone revealed she was advised to go for breast surgery before entering in movies)

दीपीकाला शाहरूखकडून मिळाला सगळ्यात चांगला सल्ला

फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत, दीपिका तिला मिळालेल्या सर्वोत्तम आणि वाईट सल्ल्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली, "शाहरुख चांगला सल्ला देतो आणि मला त्याच्याकडून खूप काही मिळाले आहे. मला त्याच्याकडून जे काही मिळाले ते सर्वोत्तम आहे.

रोजच्या वापरासाठी खास छोट्या मंगळसूत्राच्या लेटेस्ट डिजाईन्स; पाहा आकर्षक पॅटर्न्स

जी लोक तुम्हाला माहीत आहेत आणि त्यांच्यासोबत काम करायला तुम्हाला आनंद वाटेल अशा लोकांसोबत काम करा. कारण तुम्‍हाला चित्रपटात काम करताना तुम्‍ही जीवन जगता, आठवणी निर्माण करता आणि अनुभव निर्माण करता. हा शाखरूखकडून मिळालेला मौल्यवान सल्ला होता.'' 

यानंतर, सर्वात वाईट सल्ल्याबद्दल बोलताना दीपिका म्हणाली, 'मला मिळालेला सर्वात वाईट सल्ला म्हणजे ब्रेस्ट इम्प्लांट करणं. तेव्हा मी फक्त 18 वर्षांची  होते आणि मला अनेकदा आश्चर्य वाटतं की तो सल्ला गंभीरपणे मनावर न घेण्याचं शहाणपण माझ्याकडे होतं."

सारा खानचा ट्रायल रूम ‘ब्रेन फ्राय’ व्हिडिओ; काही सेकंदातच २० पेक्षा जास्तवेळा बदलले कपडे

दीपीका स्वत:ला भाग्यवान समजते की तिनं आतापर्यंत  ब्रेस्ट सर्जरीचं पाऊल उचललं नाही. दीपिका ये जवानी है दिवानी सारख्या अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये दिसली आहे. चेन्नई एक्सप्रेस, हॅप्पी न्यू इयर, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत इत्यादी चित्रपटांमध्ये ती मुख्य भूमिकेत दिसली आहे. 

ब्रेस्ट सर्जरी म्हणजे नक्की काय?

ब्रेस्ट इम्प्लांट ही एक प्रकारची शस्त्रक्रिया आहे ज्याद्वारे स्तनाचा आकार सुधारला जातो. या शस्त्रक्रियेमध्ये स्तनाच्या आत कृत्रिम पदार्थाचा थर टाकला जातो. ब्रेस्ट इम्प्लांटनंतर बाळांना स्तनपान करता येईल का, असा प्रश्न अनेकवेळा समोर येतो. यामध्ये प्रत्यारोपण, ऑपरेशन्स आणि औषधांचा खर्च समाविष्ट आहे. हा खर्च सुमारे 35 ते 40 हजार रुपये आहे. त्याच वेळी, स्तन रिडक्शनसाठी 35 ते 40 हजार रुपये खर्च केले जातात. 

 

टॅग्स :दीपिका पादुकोणसोशल व्हायरलसोशल मीडियासेलिब्रिटीबॉलिवूड