Lokmat Sakhi >Health > कोणत्या व्हिटामिन्सच्या कमतरतेमुळे घाबरल्यासारखं वाटतं, मन सतत चिंता करतं? ‘ही’ यादी वाचा..

कोणत्या व्हिटामिन्सच्या कमतरतेमुळे घाबरल्यासारखं वाटतं, मन सतत चिंता करतं? ‘ही’ यादी वाचा..

Which Vitamin Deficiency Causes Anxiety : तणावामुळे व्यक्तीचं मानसिक आरोग्य प्रभावित होतं. अशात आपलं मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आहारात काही व्हिटॅमन्सचा समावेश करणं गरजेचं असतं. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 19:13 IST2025-02-13T12:02:36+5:302025-02-13T19:13:06+5:30

Which Vitamin Deficiency Causes Anxiety : तणावामुळे व्यक्तीचं मानसिक आरोग्य प्रभावित होतं. अशात आपलं मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आहारात काही व्हिटॅमन्सचा समावेश करणं गरजेचं असतं. 

Which vitamin deficiency causes anxiety | कोणत्या व्हिटामिन्सच्या कमतरतेमुळे घाबरल्यासारखं वाटतं, मन सतत चिंता करतं? ‘ही’ यादी वाचा..

कोणत्या व्हिटामिन्सच्या कमतरतेमुळे घाबरल्यासारखं वाटतं, मन सतत चिंता करतं? ‘ही’ यादी वाचा..

Which Vitamin Deficiency Causes Anxiety : आजकाल कामाच्या वाढलेल्या ताणामुळे बरेच लोक तणावात असतात. नंतर याची लक्षणं वाढतात. कामाचा ताण, कुटुंबाची वाढती जबाबदारी, लाइफस्टाईलच्या चुकीच्या सवयी यामुळे दिवसेंदिवस ताण वाढतो. पण अनेकदा काही व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळेही सुद्धा ही समस्या होते. तणाव वाढला की, व्यक्तीला घाबरल्यासारखं वाटतं. तणावामुळे व्यक्तीचं मानसिक आरोग्य प्रभावित होतं. अशात आपलं मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आहारात काही व्हिटॅमन्सचा समावेश करणं गरजेचं असतं. 

व्हिटॅमिन बी1

व्हिटॅमिन बी1 म्हणजे थियामनच्या कमतरतेमुळे व्यक्तीला घाबरल्यासारखं वाटू शकतं. जेव्हा शरीरात व्हिटॅमिन बी 1 कमी होतं तेव्हा डिप्रेशन, चिंता, चिडचिडपणा आणि झोप न येणं अशा समस्या होतात. व्हिटॅमिन बी1 मुळे मेंदुत ग्लूकोजला ऊर्जेल बदलण्याचं काम होतं. जर हे व्हिटॅमिन शरीरात पुरेसं नसेल तर थकवा, भूक न लागणं आणि पोटासंबंधी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्हाला नेहमीच घाबरल्यासारखं वाटत असेल तर व्हिटॅमिन बी1 असलेल्या फूड्सचा आहारात समावेश करावा.

व्हिटॅमिन डी

व्हिटॅमिन डी शरीरासाठी फार महत्वाचं असतं. यानं हाडं आणि मासंपेशी मजबूत होतात. शरीरात व्हिटॅमिन डी कमी झालं की, मानसिक आरोग्याची समस्या होत. घाबरलेपणाही व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे वाटू शकतो. जर तुम्हाला पुन्हा पुन्हा तणाव, घाबरलेपणा किंवा चिंता वाटत असेल तर डाएटमध्ये व्हिटॅमिन डी देणाऱ्या फूड्स समावेश करावा.

व्हिटॅमिन बी

व्हिटॅमिन बी महत्वाच्या तत्वांपैकी एक आहे. जेव्हा शरीरात याची कमतरता होते, तेव्हा थकवा, चिंता, चिडचिडपणा जाणवतो. व्हिटॅमिन बी मुळे मूड आणि ऊर्जेत वाढ होते. मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन बी12 आणि बी9 गरजेचे असतात.

त्याशिवाय आयर्न, आयोडीन, सेलेनियम, मॅग्नेशिअम आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड कमी झाल्यावरही घाबरल्यासारखं वाटू शकतं.

Web Title: Which vitamin deficiency causes anxiety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.