व्हिटामीन डी (Vitamin-D) आपल्या शरीरासाठी फार आवश्यक आहे. याचा सगळ्यात मोठा स्त्रोत सुर्याची किरणे हा आहे. हे व्हिटामीन आपल्या शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फरस अवशोषित करण्यास मदत करते. जे हाडं आणि दातांच्या मजबूतीसाठी आवश्यक असते. याव्यतिरिक्त व्हिटामीन डी इम्यून सिस्टिम चांगली ठेवता येते. (Vitamin D Deficiency Symptoms)
ज्यामुळे शरीरात इन्फेक्शन होत नाही आणि आजारांपासूनही बचाव होतो. हृदय आणि ब्लड वेसल्सही चांगल्या राहतात. मानसिक आरोग्य चांगले राहते. व्हिटामीन डी मुळे डिप्रेशन, एन्झायटीआणि अन्य मानसिक आजार बरे होतात. (Vitamin D Taking Time)
व्यवस्थित ऊन असते पण बऱ्याच लोकांमध्ये व्हिटामीन डी ची कमतरता असते. या मागे अनेक कारणं असू शकतात. लाईफस्टाईलमधील बदल, सुर्याच्या किरणांमध्ये न जाणं यामुळे व्हिटामीन डी व्यवस्थित मिळत नाही. एक्सपर्ट्स सांगतात की सकाळी १० ते १२ वाजताची वेळ ही सगळ्यात उत्तम आहे.
पाकिस्तानी डॉक्टरांचा व्हायरल व्हिडिओ, चेहऱ्यावरचे डाग घालवणारा बिटचा खास उपाय, चमकदार त्वचेचा दावा
यावेळी सुर्याची अल्ट्राव्हायलेट बी किरणं त्वचेवर सरळ पडतात. ज्यातून व्हिटामीन डी मिळते. कारण जास्त उन्हात राहिल्यामुळे त्वचा जळू शकते आणि त्वचेचं नुकसान होऊ शकतं. म्हणून ऊन्हात राहताना सावधगिरी बाळगायला हवी. नियमित स्वरूपात उन्हात 15 ते 2० मिनिटांचा वेळ घालवायला हवा. ज्यामुळे व्हिटामीन डी ची कमतरता पूर्ण करता येते.
सकाळी ७ वाजता ऊन्हात व्हिटामीन डी व्यवस्थित मिळते. तज्ज्ञांच्या मते हे पूर्ण बरोबर नाही, कारण ७ वाजता सुर्याची किरण धरतीवर खूपच कमी येतात. सुर्याची किरणं पृथ्वीपर्यंत पूर्णपणे पोहोचत नाहीत ज्यामुळे उन्हाचा प्रभाव कमी होतो. इतकंच नाही तर सुर्यातून निघणारे अल्ट्राव्हायलेट रेज आंशिक स्वरूपात फिल्टर होतात.