व्हिटामीन बी-१२ (Veg Food Vitamin B-12) शरीरात ताकद वाढवण्यासाठी, शरीराची कार्यक्षमता सुधारण्यासाठी महत्वाचा आहे. जर शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भासली तर चिडचिड होणं, स्मृतीचे विकार, त्वचा आणि केसांचे त्रास उद्भवू शकतात. आपण नेहमीच्या जेवणात किंवा नाश्त्याच्या पदार्थांत काही सहज मिळणाऱ्या खाद्यपदार्थांचा समावेश करून व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भरून काढू शकता. (Top Veg Food Vitamin B-12)
पबमेड सेंट्रल स्टडी ऑन न्युट्रिएंट्स डेंसिटी (PMC)च्या अहवालानुसार डेअरीचे शुद्ध दही व्हिटामीन बी-१२ चा चांगला स्रोत आहे. १०० ग्रॅम नॉन फॅट दह्यात जवळपास ०.६१ मिलीग्रॅम व्हिटामीन बी-१२ असते (Veg Options For Vitamin B-12) दही रोजच्या जेवणात घेतल्यात तब्येतीचे बरेच विकार कमी होऊ शकतात. फक्त मांसाहार केल्यानं व्हिटामीन बी-१२ मिळतं, शाकाहारी पदार्थांतून कमी प्रमाणात मिळत असा गैरसमज बऱ्याच जणांचा असतो. काही शाकाहारी पदार्थ नियमित खाल्ल्यानं तुम्ही याची कमतरता दूर करू शकता. (How To Get Vitamin B-12 With Veg Food)
1) दही आणि अळशीच्या बिया
व्हिटामीन बी-१२ ची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही आळशीच्या बिया दह्यात मिसळून खाऊ शकता. कारण यात ओमेगा ३ फॅटी एसिड्स आणि फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात.
2) दही आणि भोपळ्याच्या बिया
भोपळ्याच्या बिया आयर्न, मॅग्नेशियम, जिंकचा उत्तम स्त्रोत आहेत. भोपळ्याच्या बियांचा वेगवेगळ्या पद्धतीनं आहारात समावेश करता येतो. जर व्हिटामीन बी-१२ ची कमतरता दूर करायची असेल तर आधी या बिया भाजून दह्यात मिसळून तुम्ही खाऊ शकता.
3) दही आणि जीरं
जीरं किचनच्या मसाल्याच्या डब्यातील एक असा पदार्थ आहे. ज्याचा समावेश वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही आहारात करू शकता. यात व्हिटामीन बी-१२ मोठ्या प्रमाणात असते. जीरं वाटून दह्यात मिसळून खाऊ शकता.