रिचर्स: आता गरोदरपणात फायदेशीर ठरणार ऑनलाईन कोचिंग, पण म्हणजे नेमकं काय, त्याचे फायदे कोणते - Marathi News | Pregnant women : Study suggests online coaching can help pregnant women make improved choices | Latest sakhi News at Lokmat.com
>आरोग्य >गरोदरपण > रिचर्स: आता गरोदरपणात फायदेशीर ठरणार ऑनलाईन कोचिंग, पण म्हणजे नेमकं काय, त्याचे फायदे कोणते

रिचर्स: आता गरोदरपणात फायदेशीर ठरणार ऑनलाईन कोचिंग, पण म्हणजे नेमकं काय, त्याचे फायदे कोणते

Pregnant women : गर्भवती होण्याच्या आधी आणि नंतरच्या काळात ऑनलाईन कोचिंग वापरुन ते त्यांच्या जीवनशैलीत बरीच सुधारणा घडवून आणू शकतात. 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 02:18 PM2021-06-22T14:18:55+5:302021-06-22T16:06:52+5:30

Pregnant women : गर्भवती होण्याच्या आधी आणि नंतरच्या काळात ऑनलाईन कोचिंग वापरुन ते त्यांच्या जीवनशैलीत बरीच सुधारणा घडवून आणू शकतात. 

Pregnant women : Study suggests online coaching can help pregnant women make improved choices | रिचर्स: आता गरोदरपणात फायदेशीर ठरणार ऑनलाईन कोचिंग, पण म्हणजे नेमकं काय, त्याचे फायदे कोणते

रिचर्स: आता गरोदरपणात फायदेशीर ठरणार ऑनलाईन कोचिंग, पण म्हणजे नेमकं काय, त्याचे फायदे कोणते

Next
Highlightsडॉ बोनी एनजी म्हणाले, "आमच्या चाचणीवरून असे दिसून आले आहे की डिजिटल हेल्थकेअर साधने महिलांना त्यांची जीवनशैली आणि त्यांच्या मुलांचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात."

प्रेग्नंसी हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण असतो.  हा निर्णय घेण्याआधी आणि घेतल्यानंतर महिलांना वेगवगेळ्या प्रसंगातून जावं लागतं. याचा मानसिक आरोग्यावरही परिणाम होत असतो. नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार असे सुचविण्यात आले आहे की महिला गर्भवती होण्याच्या आधी आणि नंतरच्या काळात ऑनलाईन कोचिंग वापरुन ते त्यांच्या जीवनशैलीत बरीच सुधारणा घडवून आणू शकतात. 

रिप्रोडक्टिव्ह बायोमेडिसिन या ऑनलाईन जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या निष्कर्षांवरून असं दिसून आलं की, गर्भधारणेत महिलांना येणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी डिजिटल आरोग्य सेवा हा एक प्रभावी मार्ग असू शकतो. असं NHS च्या अहवालात नमुद करण्यात आलं आहे. ज्या ओव्हर वेट महिलांना प्रेग्नंसीत त्रास होत होता, ऑनलाईन कोचिंगनंतर त्यांच्यात सुधारणा झाल्याचं दिसून आलं. 

साऊथॅम्प्टन युनिव्हर्सिटीच्या नेतृत्वात झालेल्या या अभ्यासात, 262 महिला सहभागी झाल्या ज्या गर्भधारणेची योजना आखत होत्या. तसंच ज्यांना गर्भधारणेसाठी किंवा वारंवार गर्भपात होण्याच्या अडचणी आल्या त्यापैकी एकीने ऑनलाइन जीवनशैली कोचिंग प्रोग्राम स्मार्ट अॅपमध्ये साइन अप केले. सर्व सहभागींनी सुरुवातीला चार-महिन्यांच्या चाचणी दरम्यान सहा आठवड्यांच्या अंतराने अ‍ॅपद्वारे प्रश्नावली पूर्ण केली.

प्रश्नावलीमध्ये त्यांचा आहार, फोलिक एसिडचे सेवन, धूम्रपान आणि मद्यपान यासारख्या विषयांचा समावेश होता. प्रत्येक प्रश्नावली नंतर, सहभागींपैकी निम्म्या लोकांना यांना त्यांच्या प्रतिसादाच्या आधारे कोचिंग प्लॅटफॉर्मद्वारे स्वयंचलित सल्ला आणि शिफारसी पाठविल्या गेल्या. तर इतर महिलांना पेरिकॉन्सेप्टेन्टल केअर कशाप्रकारे घ्यावी यासाठी एनएचएस वेबसाइटची मदत  घेण्यास सांगून मार्गदर्शन दिले. 

प्रश्नावलीवरील प्रतिसादाच्या विश्लेषणावरून असे दिसून आले की स्मार्ट प्रेग्नेंन्सी प्लॅटफॉर्मद्वारे सल्ला प्राप्त करत महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून आला होता. महत्वाचं म्हणजे २५ पेक्षा जास्त बॉडी मास इंडेक्स असलेल्यांसाठी धुम्रपान आणि मद्यपान कमी केल्याचा फायदा झाला. या अॅप्सच्या वापरामुळे गर्भवती महिलांच्या जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल घडून आला. 

साउथॅम्प्टन युनिव्हर्सिटीच्या क्लिनिकल अँड एक्सपेरिमेंटल सायन्समधील तज्ज्ञ डॉ बोनी एनजी म्हणाले, "आमच्या चाचणीवरून असे दिसून आले आहे की डिजिटल हेल्थकेअर साधने महिलांना त्यांची जीवनशैली आणि त्यांच्या मुलांचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात."

ते पुढे म्हणाले, "ही साधनं वापरुन स्त्रिया स्वत: च्या शरीरावर नियंत्रण मिळवू शकतात आणि डॉक्टरांना भेटल्यावर त्यांना च्यांच्या त्रासाबाबत सविस्तर चर्चाही करू शकतात. मला आशा आहे की आपण सगळेच महिलांच्या चांगल्या आरोग्यासाठी या ई-आरोग्य व्यासपीठाचा उपयोग करू.  "

Web Title: Pregnant women : Study suggests online coaching can help pregnant women make improved choices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

Easy Way to stay healthy : फक्त 'ही' २ योगासनं करून मेंटेन राहा; वाढत्या वयातही शिल्पा शेट्टीप्रमाणे फिट, परफेक्ट दिसाल - Marathi News | Easy Way to stay healthy : 2 easy yoga for 40 plus women | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त 'ही' २ योगासनं करून मेंटेन राहा; वाढत्या वयातही शिल्पा शेट्टीप्रमाणे फिट, परफेक्ट दिसाल

Easy Way to stay healthy : जर काही कारणास्तव आपण तरूण वयात स्वत: साठी थोडा वेळ काढू शकत नसाल तर 45 पासून सुरुवात करणे देखील एक चांगली कल्पना आहे. ...

Food For Anemia : गंभीर आजारांचं कारण ठरतेय हिमोग्लोबिनची कमतरता; अंगातलं रक्त वाढवण्यासाठी रोज खा 'हे' पदार्थ - Marathi News | Food for iron deficiency anemia : Hemoglobin deficiency symptoms know how to prevent this deficiency | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आजारांचं कारण ठरतेय हिमोग्लोबिनची कमतरता; अंगातलं रक्त वाढवण्यासाठी रोज खा 'हे' पदार्थ

Food for iron deficiency anemia : हिमोग्लोबिन हे एक प्रकारचं प्रथिने आहे जे लाल रक्तपेशींमध्ये आढळतात, त्याच्या कमतरतेमुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होते. अशा परिस्थितीत अॅनिमिया रोगाचा धोका असू शकतो. ...

World Heart Day 2021: ....'या' कारणांमुळे एकदा नाही तर दोनदा येऊ शकतो हार्ट अटॅक; आजंच बदला ७ सवयी  - Marathi News | World Heart Day 202 : World heart day these lifestyle habits can lead to second heart attack know how to minimise the risk | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : ....'या' कारणांमुळे एकदा नाही तर दोनदा येऊ शकतो हार्ट अटॅक; आजंच बदला ७ सवयी 

World Heart Day 2021: जीवनशैलीतील काही बदलांनी तुम्ही स्वतःला हृदयविकाराच्या झटक्यापासून वाचवू शकता.  ...

तरुण दिसण्यासाठी चेहऱ्याला लावा पालक | Health Benefits of Spinach | Lokmat sakhi - Marathi News | Beneficial Benefits of Eating Spinach | Health Benefits of Spinach | Lokmat sakhi | Latest sakhi Videos at Lokmat.com

सखी :तरुण दिसण्यासाठी चेहऱ्याला लावा पालक | Health Benefits of Spinach | Lokmat sakhi

पालक खाणं शरीराप्रमाणेच त्वचेसाठीही लाभदायक ठरतं. त्वचा उजळवण्यासाठी तसेच त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी पालक अत्यंत फायदेशीर ठरते. ...

Hair Care Rebonding : हेअर स्मुथनिंग/ स्ट्रेटनिंग करण्याआधी 'या' गोष्टी माहीत करून घ्या; केस गळण्याचं कायमंच होईल बंद - Marathi News | Hair Care Rebonding : Hair rebonding processer benefits side effects and hair care tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हेअर स्मुथनिंग/ स्ट्रेटनिंग करण्याआधी 'या' गोष्टी माहीत करून घ्या; केस गळण्याचं कायमंच होईल बंद

Hair Care Rebonding : हेअर रिबाँडींग ही एक केमिकल्स आधारित प्रक्रिया आहे जी आपल्या केसांना एक नवीन रूप देण्यासाठी फायदेशीर ठरते. ...

FSSAI Tips : तुम्हीसुद्धा भेसळयुक्त मटार आवडीनं खाताय? FSSAI नं सांगितलं बनावट वाटाणे कसे ओळखायचे - Marathi News | FSSAI Tips : Try this simple experiment to test colour adulteration in green peas | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुम्हीसुद्धा भेसळयुक्त मटार आवडीनं खाताय? FSSAI नं सांगितलं बनावट वाटाणे कसे ओळखायचे

FSSAI Tips : या भेसळयुक्त खाद्यपदार्थांना ओळखण्यासाठी, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने ट्विटरवर #Detectingfoodadulterants नावाचा उपक्रम सुरू केला आहे.  ...