lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > ओटीपोटात दुखतं, तर कधी खूप खाज येते? महिलांमध्ये गंभीर आजाराचं कारण ठरतात पाळीच्या दिवसातील ५ चूका

ओटीपोटात दुखतं, तर कधी खूप खाज येते? महिलांमध्ये गंभीर आजाराचं कारण ठरतात पाळीच्या दिवसातील ५ चूका

Women's Health : मासिक पाळीदरम्यान महिलांनी स्वच्छतेची काळजी का घ्यावी आणि तसे न केल्यास काय समस्या येऊ शकतात, याबाबत माहिती दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 02:34 PM2022-05-31T14:34:00+5:302022-05-31T14:35:02+5:30

Women's Health : मासिक पाळीदरम्यान महिलांनी स्वच्छतेची काळजी का घ्यावी आणि तसे न केल्यास काय समस्या येऊ शकतात, याबाबत माहिती दिली आहे.

Women's Health : Menstrual hygiene day experts share 5 major side effects of menstrual hygiene mistakes  | ओटीपोटात दुखतं, तर कधी खूप खाज येते? महिलांमध्ये गंभीर आजाराचं कारण ठरतात पाळीच्या दिवसातील ५ चूका

ओटीपोटात दुखतं, तर कधी खूप खाज येते? महिलांमध्ये गंभीर आजाराचं कारण ठरतात पाळीच्या दिवसातील ५ चूका

मासिक पाळीच्या कालावधीत स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. मासिक पाळी दरम्यान स्वच्छता राखल्यास संसर्गाचा धोका कमी होतो. मासिक पाळी दरम्यान स्वच्छतेचा अभाव ही आरोग्यासाठी मोठी समस्या आहे. मासिक पाळीदरम्यान बॅक्टेरियाची समस्या उद्भवते. यामुळे आरोग्याची गंभीर समस्या देखील होऊ शकते. iThrive  च्या CEO, संस्थापक आणि फंक्शनल न्यूट्रिशनिस्ट मुग्धा प्रधान यांनी एका हिंदी वेबसाईटशी बोलताना मासिक पाळीदरम्यान महिलांनी स्वच्छतेची काळजी का घ्यावी आणि तसे न केल्यास काय समस्या येऊ शकतात, याबाबत माहिती दिली आहे. (Menstrual hygiene day experts share 5 major side effects of menstrual hygiene mistakes)

1) युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन

हा एक आजार आहे जो मूत्रमार्गाच्या कोणत्याही भागावर परिणाम करतो. पुरुषांपेक्षा महिलांना मूत्रमार्गात संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. मूत्रमार्गात म्हणजेच मूत्राशयातील संसर्ग खूप वेदनादायक असू शकतो. UTI तुमच्या मूत्रपिंडात पसरल्यास, त्याचे अत्यंत नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

2) जेनिटल ट्रॅक इन्फेक्शन

जननेंद्रियाच्या मार्गाचा संसर्ग- एंडोमेट्रायटिस आणि/किंवा सॅल्पिंगायटिस हे गर्भाशयाचे आणि/किंवा फॅलोपियन ट्यूबचे जिवाणू संक्रमण आहेत. यामुळे पेरिटोनिटिस, ओटीपोटाचा आजार होऊ शकतो. UGTI लैंगिक संपर्काद्वारे पसरू शकते किंवा बाळाचा जन्म किंवा गर्भपात झाल्यानंतर विकसित होऊ शकते.

3) बॅक्टेरिअल व्हजायनोसिस

बाळंतपणाच्या वयातील महिलांना बॅक्टेरियल योनीसिसचा धोका जास्त असतो. असुरक्षित संभोग किंवा नियमित डचिंग यासारख्या क्रियांमुळे धोका वाढू शकतो. काही स्थितींमध्ये कोणतीही लक्षणे नसतात.  इतर लक्षणांमध्ये योनीतून असामान्य स्त्राव, जळजळ आणि दुर्गंध यांचा समावेश होतो.

4) रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट इन्फेक्शन

१) लैंगिक संक्रमित रोग (एसटीडी), जसे की क्लॅमिडीया, गोनोरिया, कॅनक्रोइड आणि एचआयव्ही; 2) ) एंडोजेनस इन्फेक्शन, बॅक्टीरियल वजाइनोसिस, वल्वोवजाइनल कैंडिडायसिस, आयट्रोजेनिक संक्रमण. असुरक्षित गर्भपात किंवा प्रसूतीची योग्य व्यवस्था नसणे यासारख्या चुकीच्या वैद्यकीय उपचारांमुळे होतात.

५) मासिक पाळीत कप, टॅम्पोन्स किंवा ऑरगॅनिक कॉटन सॅनिटरी पॅड वापरा. पॅड जास्त वेळ घालू नका कारण यामुळे पुरळ, वास येऊ शकतो. संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छ पॅड किंवा उन्हात वाळलेल्या कापडाचा वापर करा. मासिक पाळी दरम्यान असुरक्षित लैंगिक संबंध ठेवू नका.

Web Title: Women's Health : Menstrual hygiene day experts share 5 major side effects of menstrual hygiene mistakes 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.