अन्हेल्दी लाईफस्टाईल, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे पोटाशी संबंधित बऱ्याच समस्या उद्भवतात. बरेच लोक सकाळी पोट साफ न होण्याची तक्रार करतात. सकाळी पोट साफ व्हायला त्रास होतो ज्यामुळे पचनक्रिया कमकुवत होते (Constipation Solution). पण दीर्घकाळ या समस्येकडे दुर्लक्ष करणं तब्येतीसाठी नुकसानकारक ठरू शकतं. बरेच लोक आयुर्वेदीक पावडर किंवा औषधांचे सेवन करू शकतात. पोषणतज्ज्ञ सलोनी यांच्यामते केमिकल्सयुक्त पावडर खाण्याऐवजी तुम्ही ३ फळांचे सेवन केले तर गॅसेसचा त्रास कमी होईल. हा सर्वात सुरक्षित उपाय आहे. (Your Stomach Will Be Cleared As Soon As You Wake Up What To Eat For Clear Bowels And Relieve Constipation)
किव्ही
किव्ही पोटासाठी उत्तम मानली जाते. यात एक्टिनिडीन नावाचे प्राकृतिक एंजाईम्स असतात जे पचनक्रिया वेगानं वाढवण्यास मदत करतात. याशिवाय किव्हीमध्ये फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात. फायबर्स मल नरम करते ज्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. किव्ही अशा लोकांसाठी उत्तम औषध आहे जे दीर्घकाळ गॅसेसच्या समस्यांनी त्रासलेले असतात.
पेरू
पेरू अनेक पोषण तज्ज्ञांचं आवडतं फळ आहे. कारण यात फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात. पेरूमधील फायबर्स मल त्याग करण्यास मदत करतात. पोषण तज्त्र सलोनी यांच्यामते पेरू बियांसकट खाणं अधिक फायदेशीर ठरतं. पेरूचे सेवन केल्यानं पोट व्यवस्थित साफ होण्यास मदत होते. आतड्यांचे आरोग्यही चांगले राहते. थंडीच्या दिवसांत ताजे पेरू खायलाच हवेत. (Ref)
पपई
पपई पोटाच्या आरोग्यासाठी एक वरदान मानली जाते. पपईत पॅपेन नावाचे पाचक एंजाईम्स असतात. ज्यामुळे अन्न पचण्यास मदत होते. याशिवाय पपईत फायबर्स आणि पाणी भरपूर प्रमाणात असते. पपईतील पाण्यामुळे मल त्याग करणं सोपं जातं. आतडे चांगले राहतात. सकाळी रिकाम्या पोटी पपई खाल्ल्यानं पचनक्रिया सक्रिय होते आणि गॅसेसच्या त्रासापासून आराम मिळतो.
याशिवाय मेथी, पालक यांसारख्या पालेभाज्यांमध्ये भरपूर फायबर्स असतात. ज्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. पपई हे पोट साफ करण्याासठी सर्वोत्तम फळ मानले जाते. याशिवाय सफरचंद, पेरू आणि केळी खाणं फायदेशीर ठरते. आहारात पांढर्या तांदळाऐवजी ब्राऊन राईस, ओट्स, दलिया किंवा कडधान्यांचा समावेश करा.
