Yoni Mudra Benefits: आजच्या धावपळीच्या जीवनात ताणतणाव फक्त मेंदूपुरताच मर्यादित राहत नाही, तर हळूहळू त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर दिसू लागतो. सतत झोपमोड होणे, चिडचिड, हार्मोनमध्ये बिघाड आणि रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होणे ही सगळी ताणतणावाचीच लक्षणं आहेत. अशा परिस्थितीत आयुष मंत्रालय योगाभ्यास करण्याचा सल्ला देते. योगामध्ये अनेक मुद्रा आहेत, पण काही मुद्रा बाहेरून अगदी साध्या दिसतात आणि आतून मात्र खोलवर बदल घडवून आणतात. योनिमुद्रा त्यापैकीच एक आहे. ही मुद्रा महिलांसाठी अधिक फायदेशीर ठरते.
योनिमुद्रा कशी करावी?
आयुष मंत्रालयाच्या माहितीनुसार, योनिमुद्रा मन शांत करण्यास मदत करते. जेव्हा व्यक्ती आपल्या श्वासावर, विचारांवर आणि ऊर्जेवर लक्ष केंद्रित करते, तेव्हा ताणतणाव कमी होतो आणि मनाला एक वेगळीच शांती मिळते. ही मुद्रा करण्यासाठी सुखासन किंवा पद्मासनात बसावे, डोळे बंद करावेत आणि हातांच्या बोटांनी एक विशिष्ट आकृती तयार करून काही वेळ मोठा श्वास घेत ध्यान करावे. ही साधी प्रक्रिया संपूर्ण मज्जासंस्थेला शांत करण्यास मदत करते.
योनिमुद्रा करण्याचे फायदे
ताणतणाव कमी होतो
योनिमुद्रेत बसल्यावर बाहेरील आवाज, गोंधळ हळूहळू मनातून दूर होऊ लागतो. आयुष मंत्रालयानुसार, नियमित सराव केल्यास ताणतणाव निर्माण करणाऱ्या हार्मोन्सची लेव्हल कमी होते, त्यामुळे चिंता, भीती आणि अस्वस्थता कमी होते. दीर्घकाळ मानसिक तणावात असलेल्या लोकांसाठी ही मुद्रा विशेष उपयुक्त मानली जाते.
हार्मोनल संतुलन सुधारते
हार्मोनल संतुलनाच्या दृष्टीने योनिमुद्रा खूप महत्त्वाची आहे. महिलांमध्ये हार्मोनल बदलांचा थेट परिणाम मूड, मासिक पाळी आणि ऊर्जेवर होतो. नियमित सरावामुळे शरीरातील ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो आणि हार्मोनल संतुलन सुधारतं. ही मुद्रा केवळ महिलांसाठीच नाही तर पुरुषांसाठीही फायदेशीर आहे, कारण ती ताणतणावामुळे होणारा हार्मोनल बिघाड शांत करण्यात मदत करते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
आयुष मंत्रालयानुसार, मन शांत असेल तर शरीराची संरक्षण व्यवस्था अधिक प्रभावीपणे काम करते. योनिमुद्रा केल्याने शरीरातील ऊर्जेचा प्रवाह संतुलित होतो, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि छोट्या-मोठ्या आजारांशी लढण्याची क्षमता वाढते.
एकाग्रता वाढते
ध्यान आणि एकाग्रता वाढवण्यासाठी ही मुद्रा अत्यंत उपयुक्त आहे. आज लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच लक्ष विचलित होण्याची समस्या जाणवते. योनीिमुद्रा मन एका बिंदूवर केंद्रित ठेवण्यास मदत करते. हळूहळू विचार स्पष्ट होतात, निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि कामात मन लागते.
थायरॉइडवर सकारात्मक परिणाम
थायरॉइड आणि पीसीओडीसारख्या समस्यांमध्येही योनिमुद्रा उपयुक्त ठरते. ही मुद्रा शरीरातील संतुलन सुधारून अशा समस्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.
मासिक पाळी नियमित होते
मासिक पाळीतील अनियमिततेवरही योनिमुद्रेचा सकारात्मक परिणाम दिसून येतो, कारण ही मुद्रा ताणतणाव कमी करून हार्मोनल संतुलन सुधारण्यास मदत करते.
Web Summary : Yoni Mudra, beneficial for women, reduces stress, balances hormones, boosts immunity, and improves concentration. It aids thyroid, PCOD, and regulates menstruation by calming the nervous system and balancing energy flow.
Web Summary : योनि मुद्रा महिलाओं के लिए फायदेमंद है, तनाव कम करती है, हार्मोन संतुलित करती है, रोग प्रतिरोधक क्षमता बढ़ाती है और एकाग्रता में सुधार करती है। यह तंत्रिका तंत्र को शांत करके और ऊर्जा प्रवाह को संतुलित करके थायरॉइड, पीसीओडी में मदद करती है और मासिक धर्म को नियमित करती है।