Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > अनेकदा वेळ निघून गेल्यावरच का होतं किडनी कॅन्सरचं निदान? ‘या’ गोष्टीकडे वेळीच लक्ष द्या..

अनेकदा वेळ निघून गेल्यावरच का होतं किडनी कॅन्सरचं निदान? ‘या’ गोष्टीकडे वेळीच लक्ष द्या..

World Kidney Cancer Day : जेव्हा किडनी कॅन्सर होतो तेव्हा सुरूवातीला कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. जेव्हा लक्षणं दिसून येतात तेव्हा बराच उशीर झालेला असतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 17:15 IST2025-06-19T15:39:30+5:302025-06-19T17:15:47+5:30

World Kidney Cancer Day : जेव्हा किडनी कॅन्सर होतो तेव्हा सुरूवातीला कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. जेव्हा लक्षणं दिसून येतात तेव्हा बराच उशीर झालेला असतो.

World Kidney Cancer Day : Doctor tells why kidney cancer often detected late | अनेकदा वेळ निघून गेल्यावरच का होतं किडनी कॅन्सरचं निदान? ‘या’ गोष्टीकडे वेळीच लक्ष द्या..

अनेकदा वेळ निघून गेल्यावरच का होतं किडनी कॅन्सरचं निदान? ‘या’ गोष्टीकडे वेळीच लक्ष द्या..

World Kidney Cancer Day : जून महिन्याच्या तिसऱ्या गुरूवारी दरवर्षी वर्ल्ड किडनी कॅन्सर डे पाळला जातो. यानिमित्ताने किडनी कॅन्सरबाबत लोकांना जागरूक केलं जातं. किडनी आपल्या शरीरातील महत्वाचा अवयव आहेत. किडनीद्वारे रक्त साफ केलं जातं, शरीरातील विषारी तत्व बाहेर काढले जातात आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करण्याचं कामही केलं जातं. 

पण जेव्हा किडनी कॅन्सर होतो तेव्हा सुरूवातीला कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. जेव्हा लक्षणं दिसून येतात तेव्हा बराच उशीर झालेला असतो. अशात किडनी कॅन्सरची लक्षणं का दिसत नाही आणि यापासून बचाव करावा हे जाणून घेऊ. 

Jagran.com च्या एका रिपोर्टमध्ये डॉ. आदित्य सरीन यांनी सांगितलं की, आपल्या किडनी शरीराच्या खूप आतल्या भागात असतात. याच कारणानं जेव्हा त्यांच्यात कॅन्सरची सुरूवात होते, तेव्हा अनेकदा वेदना किंवा कोणती लक्षणं दिसून येत नाहीत. एक छोटासा ट्यूमरही मोठा होऊन इतर अवयवांवर दबाव टाकेल तेव्हाच वेदना होतील. हेच कारण आहे की, सुरूवातीला याची काही लक्षणं दिसत नाही.

असे संकेत ज्यांकडे दुर्लक्ष केलं जातं

किडनी कॅन्सरची सुरूवातीची लक्षणं इतकी हलकी आणि सामान्य असतात की, त्यांना अनेकदा इतर एखाद्या आजाराचे संकेत मानले जातात. काही सामान्य संकेतांकडे दुर्लक्ष केलं जातं.

लघवीतून रक्त

हा सगळ्यात महत्वाचा संकेत असू शकतो. पण अनेकदा लघवीतून रक्त इतकं कमी येतं की, ते डोळ्यांनी दिसतही नाही.

कंबर किंवा पाठीच्या खालच्या भागात वेदना

कंबर किंवा पाठीच्या खालच्या भागात हलक्या वेदना होतात आणि स्नायूंमध्ये तणाव जाणवतो. 

अचानक वजन कमी होणे

कोणतंही कारण नसताना अचानक वजन कमी झालं असेल तर हा अनेक गंभीर आजारांचा संकेत असू शकतो. 

थकवा आणि कमजोरी

भरपूर आराम करूनही सतत थकवा जाणवत असेल, कमजोरी जाणवत असेल तर हाही किडनीसंबंधी आजाराचा एक संकेत असू शकतो. 

ही सगळी लक्षणं सामान्य आहेत. बरेच लोक यांकडे दुर्लक्ष करतात किंवा या रोजच्या छोट्या समस्या समजून सोडून देतात.

कुणी घ्यावी काळजी?

काही लोकांना किडनी कॅन्सरचा धोका जास्त होतो. जर तुम्ही अशाच लोकांपैकी असाल तर तुम्ही खालील काही गोष्टींची अधिक काळजी घेतली पाहिजे. 

- ६० वयापेक्षा जास्त लोकांना किडनी कॅन्सरचा धोका अधिक असतो. 

- धुम्रपान केल्यानं वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात. ज्यात किडनी कॅन्सरचाही समावेश आहे.

- हाय ब्लड प्रेशर किंवा लठ्ठपणा या स्थितींमध्येही कॅन्सरचा धोका वाढतो.

- जर कुटुंबात कुणाला आधी किडनी कॅन्सर झाला असेल तर तुम्हालाही होण्याची शक्यता असते.

किडनी कॅन्सरबाबत चिंतेची बाब म्हणजे कॅन्सरच्या जास्तीत जास्त केसेस अचानक समोर येतात. जेव्हा एखाद्या दुसऱ्याच आजारासाठी स्कॅन किंवा टेस्ट केल्या जातात तेव्हा किडनी कॅन्सरचं निदान होतं. याच कारणानं नियमितपणे टेस्ट करणं गरजेचं ठरतं. जेणेकरून वेळेवर आजाराची माहिती मिळावी आणि योग्य ते उपचार घेता येईल.

Web Title: World Kidney Cancer Day : Doctor tells why kidney cancer often detected late

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.