Join us   

World Heart Day 2021: ....'या' कारणांमुळे एकदा नाही तर दोनदा येऊ शकतो हार्ट अटॅक; आजंच बदला ७ सवयी 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 12:14 PM

World Heart Day 2021: जीवनशैलीतील काही बदलांनी तुम्ही स्वतःला हृदयविकाराच्या झटक्यापासून वाचवू शकता. 

ठळक मुद्दे जर तुमचे  तुमचे वजन वाढले असेल किंवा तुमचे वजन जास्त असेल. तरीही तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हे टाळण्यासाठी तुमचे वजन संतुलित ठेवा. दिवसातून किमान 30 मिनिटे व्यायाम करा. हे तुम्हाला निरोगी ठेवण्यास फायद्याचं ठरेल.

सध्याच्या जीवनशैलीत हार्ट अटॅकसारख्या गंभीर आजारांचा सामना अनेकांना करावा लागतो. तरूण मुलांमध्ये दिवसेंदिवस या आजाराचा धोका वाढत आहे. जर तुम्हालाही ही भीती असेल, तर डॉक्टर अशा रुग्णांना त्यांचा दिनक्रम आणि आहार बदलण्याचा सल्ला देऊ शकतात. जीवनशैलीतील काही बदलांनी तुम्ही स्वतःला हृदयविकाराच्या झटक्यापासून वाचवू शकता. 

ताण-तणाव

तणाव हे हृदयविकाराचे प्रमुख कारण आहे. जर तुम्ही तुमच्या विचारांमुळे अनेकदा त्रस्त किंवा उदास असाल, तर तणावातून आराम मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. याशिवाय तुम्ही रोज व्यायाम करून ताण-तणाव दूर ठेवू शकता. 

वजनावर नियंत्रण ठेवा

जर तुमचे  तुमचे वजन वाढले असेल किंवा तुमचे वजन जास्त असेल. तरीही तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हे टाळण्यासाठी तुमचे वजन संतुलित ठेवा. आपल्याला वजन कमी करण्यात समस्या असल्यास आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

व्यायाम

हृदय निरोगी करण्यासाठी, आपण चालणे, धावणे, सायकलिंग, डान्स इत्यादी शारीरिक हालचाली करणे आवश्यक आहे. यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवता येऊ शकतो. अमेरिकन हार्ट असोसिएशनने शिफारस केली आहे की एका व्यक्तीने आठवड्यातून किमान 150 मिनिटे व्यायाम करावा. तसेच, दिवसातून किमान 30 मिनिटे व्यायाम करा. हे तुम्हाला निरोगी ठेवण्यास फायद्याचं ठरेल.

२६ वर्षांनी रॅम्प वॉकमध्ये झळकला मिलिंद सोमण; यावेळी चक्क धोतर नेसून आला, पाहा व्हिडीओ

योग्य आहार

असे म्हटले जाते की योग्य आहार हा निरोगी शरीराचा आधार आहे. त्यामुळे सॅच्युरेटेड फॅट आणि ट्रान्स फॅटपासून दूर राहा. यामुळे तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक तयार होतो. जे तुमच्या हृदयाला रक्तप्रवाहात अडथळा आणते. म्हणूनच, योग्य आहार घ्या आणि हृदयविकारापासून दूर राहा.

रात्री नखं कापली तर काय होतं? नखं कापण्याची योग्य वेळ अन् पद्धत कोणती; जाणून घ्या

डायबिटीस 

टाइप 1 डायबिटीस  आणि टाइप 2 डायबिटीस  असलेल्या रुग्णांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. या समस्येदरम्यान एकतर इन्सुलिन तयार होत नाही किंवा शरीर इन्सुलिन वापरण्यास असमर्थ असते. अशा परिस्थितीत,   हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी, आपण व्यायाम, औषधे आणि चांगला आहार घेणे आवश्यक आहे.

कॉलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवा

हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित करणे खूप महत्वाचे आहे. यासाठी, आपण आहारातून सोडियमचे प्रमाण कमी केले पाहिजे. तसेच व्यायाम करा आणि चांगला आहार घ्या. कोलेस्टेरॉल नियंत्रित आहे की नाही? ते वेळोवेळी तपासत राहा.

अलर्ट! फक्त छातीत दुखणं नाही तर 'ही' ३ लक्षणं आहेत हार्ट अटॅकचे संकेत; जाणून घ्या बचावाचे उपाय

धुम्रपान

जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर ते लगेच सोडून द्या. ते सोडण्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. या व्यतिरिक्त धूम्रपान केल्याने रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात. ज्यामुळे शरीराच्या विविध भागांना रक्त पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. तसेच, जिथे लोक धूम्रपान करत आहेत अशा ठिकाणांपासून दूर रहा. अशा प्रकारे आपण हृदयविकाराचा झटका टाळू शकता.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यहृदयरोगहृदयविकाराचा झटका