शीतल मोगल (आहारतज्ज्ञ)
अमेरिकेत झालेल्या महिलांच्या क्रांतीमुळे आज जगभरात जवळपास सगळीकडेच जागतिक महिला दिन साजरा केला जातो. आपापल्या कार्यक्षेत्रात ज्या महिलांनी उंच भरारी घेतली त्यांचा सत्कार होतो. आपल्या देशातही तेच चित्र दिसतं.. काही महिलांना संधी मिळाली आणि त्या त्यांच्या क्षेत्रात पुढे गेल्या. पण अजूनही गावखेड्यातल्या बऱ्याच महिला अशा आहेत ज्या घराच्या चौकटीतच अडकून पडलेल्या आहेत. दोघीही आपापल्यापरीने सगळं सांभाळत पुढे जात आहेत. पण नवरा, मुलं, कुटूंबातल्या इतर व्यक्ती यांचं करता करता ती कुठेतरी आपलं स्वास्थ्य हरून बसते आणि नकळत वेगवेगळ्या आजारांना बळी पडते आहे. याच कारणांमुळे हल्ली महिलांच्याआजारपणाचेही प्रमाण वाढते आहे.
सकाळपासून संध्याकाळपर्यंत राब राब राबणाऱ्या सख्यांना एकच सांगणं आहे की स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. कारण तुमचं आरोग्य उत्तम असणं हे तुमच्या स्वत:साठी जितकं गरजेचं आहे तितकंच ते तुमच्या कुटूंबियांसाठीही आवश्यक आहे.
उन्हाळ्यात पालीच्या पिल्लांचा सुळसुळाट? कापसाचा बोळा घेऊन करा 'हा' उपाय- पाली घरातून गायब होतील
तुमचीच तब्येत जर चांगली नसेल तर सगळं घर कोलमडून जायला वेळ लागणार नाही. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे आणि व्यायामाकडे दुर्लक्ष करू नका. स्वतःसाठी दिवसातला एक तासाचा वेळ व्यायामासाठी काढाच. आपल्या आहारावर आणि कुटुंबाच्या आहारावर बारकाईने लक्ष ठेवा. मनात आणलं तर सगळं जमतं. स्वतःसाठी स्वतःचा वेळ काढणं अवघड नाहीये.. आणि अशक्य तर अजिबातच नाहीये..
नेहमी एकच गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या दुर्लक्षामुळे छोट्याशा आजाराचं रुपांतरही एखाद्या गंभीर आजारात होऊ शकतं. त्यामुळे कोणताही आजार अंगावर काढू नका. योग्यवेळी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.
महिला दिनी डॉ. श्रीराम नेनेंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र- माधुरीसाठी करतात 'ही' खास गोष्ट
खाण्यापिण्याच्या वेळा पाळा. वेळेवर खा, सकस आहार घ्या, वेळेवर व्यायाम करा. आहार आणि व्यायामाला कुठलीही पळवाट शोधू नका. आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की तुमचा आहार योग्य असेल तर तुम्हाला कोणत्याही सप्लिमेंटची गरज पडणार नाही. विकत मिळणाऱ्या पावडर घेऊन खाण्याची वेळ येणार नाही...आपल्या स्वयंपाक घरात तयार झालेलं ताजं अन्न हाच तब्येत जपण्याचा योग्य मार्ग आहे.