उन्हाळ्याच्या दिवसांत लोक लोक बाहेरून आल्यानंतर त्वरीत थंड पाणी पितात. माठातलं पाणी पिण्याऐवजी फ्रिजचं थंडगार पाणी प्यायला लोकांना खूप आवडतं थंड प्यायल्यानं गारवा मिळतो, तहान व्यवस्थित भागते पण उन्हातून आल्यानंतर थंड पाणी प्यायल्यानं बऱ्याच आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
मेंदूवरही या सवयीचा वाईट परिणाम होऊ शकतो. उन्हातून आल्यानंतर थंड पाणी प्यायला हवं का, थंड पाणी लगेच प्यायल्याचे परिणाम काय होतातच याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांनी अधिक माहिती दिली आहे.(Can You Drink Cold Water After Coming From Sunlight)
बाहेरून आल्यानंतर लगेच थंड पाणी पिण्याबद्दल डॉक्टर काय सांगतात?
डॉ. अनिल बंसल यांनी एका हिंदी वेबसाईटशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की उन्हातून आल्यानंतर साधं पाणी प्यायला हवं. लोक डायबिटीज, अस्थमा, ब्राँकायटिस, घश्याच्या समस्यांचा सामना करत आहेत. असे त्रास असल्यास उन्हातून आल्यानंतर काहीवेळ थांबून मग पाणी प्यायला हवं. जेणेकरून शरीराचं अचानक तापमान बदलणार नाही. प्रत्येक व्यक्तीचं शरीर वेगवेगळं असतं. थंड पाण्याचा परिणामही वेगवेगळा होतो.
डॉ. अनिल बंसन यांच्या म्हणण्यानुसार उन्हाळ्याच्या दिवसांत जास्तवेळ उन्हात थांबू नये. अशावेळी हायपरथर्मिया होऊ शकतो. या स्थितीत शरीराचे तापमान १०३-१०४ डिग्री फॅरेनहाईटपर्यंत पोहोचते यामुळे मृत्यूचा धोकाही असतो. हे टाळण्यासाठी जास्तवेळ उन्हात राहू नये. ज्या लोकांना जास्त घाम येतो त्यांच्या शरीरातील हायड्रेशन आणि इलेक्ट्रोलाईट संतुलन बिघडू शकते. डिहायड्रेशपासून बचावासाठी ब्लड सोडीयम लेव्हल योग्य ठेवायला हवी. बाहेरून आल्यानंतर पाण्यात लिंबू, मीठ, साखर मिक्स करून प्यावं यामुळे शरीरात सोडीयमची कमतरता भासत नाही.
उन्हाळ्यात तब्येतीची काळजी कशी घ्यावी?
एक्सपर्ट्सच्यामते शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी रोज २ ते ३ लिटर पाणी प्यायला हवं तसंच हेल्दी आहार घ्यावा. ज्यामुळे हिडायड्रेशनची समस्या उद्भवत नाही. उन्हाळ्याच्या दिवसांत इन्फेक्शनचा धोका वाढतो. हे टाळण्यासाठी रोज व्यायाम करायला हवा. हेल्दी लाईफस्टाईल ठेवावी याव्यतिरिक्त डॉक्टरांचा सल्लाही घ्या. काकडी, कलिंगड, ताक, नारळपाणी अशा शरीराला गारवा देणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करा. उन्हाळ्याच्या दिवसांत चहा, कॉफी जास्त प्रमाणात पिणं टाळा.
Web Summary : Avoid drinking cold water immediately after sun exposure. It can negatively impact health, potentially causing brain issues. Doctors recommend plain water to prevent sudden temperature changes and suggest electrolyte drinks to combat dehydration. Stay hydrated and eat cooling foods.
Web Summary : धूप से आने के तुरंत बाद ठंडा पानी पीने से बचें। यह स्वास्थ्य पर नकारात्मक प्रभाव डाल सकता है, संभावित रूप से मस्तिष्क संबंधी समस्याएं पैदा कर सकता है। डॉक्टर तापमान में अचानक बदलाव को रोकने के लिए सादा पानी पीने और डिहाइड्रेशन से निपटने के लिए इलेक्ट्रोलाइट पेय का सुझाव देते हैं। हाइड्रेटेड रहें और ठंडे खाद्य पदार्थ खाएं।