Join us
Daily Top 2 Weekly Top 5

माठातलं पाणी का प्यावं? ५ कारणं, शरीराला फायदा इतका की फ्रिजचं पाणी पिणचं सोडून द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 13:00 IST

Why Matka Water Is More Heathier : माठात रोजच्या रोज ताजं पाणी भरत राहा.

उन्हाळ्याच्या दिवसांत थंडगार पाणी पिण्याचा आनंदच काही वेगळा असतो. उन्हाळ्यात सर्वांनाच तहान खूप लागते, घसा कोरडा पडतो अशावेळी थंड पाणी कधी पोटात जातंय असं होतं. माठात ठेवलेलं पाणी थंड असतं. याचे काही आरोग्यदायी फायदेसुद्धा आहेत. पण फ्रिजमधलं थंड पाणी पिण्याऐवजी तर तुम्ही माठातलं पाणी प्यायला सुरूवात केली तर तुमच्या तब्येतीच्या समस्या कमी होतील ( 5 Benefits Of Drinking Pot Water). माठातलं पाणी का प्यावं, याचे फायदे नेमके काय पाहूया. (Why Matka Water Is More Heathier Than Other)

माठातलं पाणी का प्यावं?

उन्हाळ्याच्या दिवसांत  माठातलं पाणी प्यायल्यानं गॅस, अपचन यांसारख्या समस्या दूर होतात.  पोटाशी संबंधित समस्या असल्यास माठातलं पाणी एक उत्तम पर्याय आहे.

 शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्याासठी नियमित माठातलं पाणी प्यावं. ज्यामुळे त्वचा साफ आणि ग्लोईंग होण्यास मदत होते. हे एक नॅच्युरल डिटॉक्स वॉटरप्रमाणे काम करतं.

 फ्रिजचं पाणी खूप थंड असल्यामुळे  घसा दुखण्याचाही धोका असतो तर काहीजणांना कफसुद्धा होतो. तर माठातलं पाणी शरीरासाठी उत्तम मानलं जातं. हे पाणी प्यायल्यानं घश्याला कोणताही  त्रास  होत नाही आणि इम्यूनिटीही वाढते.

हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की  माठातलं पाणी प्यायल्यानं शरीर शुद्ध होण्यास मदत होते. माठातलं पाणी प्यायल्यानं शरीरातील विषारी तत्व बाहेर निघून इम्यून सिस्टिम चांगली राहण्यास मदत होते.

माठातल्या पाम्यात क्षारीय गुण असतात जे शरीराचा पीएच लेव्हल संतुलित करण्यास मदत करतात. माठातलं पाणी पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. इम्यून सिस्टिमही मजबूत होते. यात कोणतेही केमिकल्स नसता उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराचं तापमान नियंत्रणात राहण्यासही मदत होते.

माठातलं पाणी रोज पित असाल तर या गोष्टींची काळजी घ्या

माठ दर २ दिवसांनी व्यवस्थित आतून, बाहेरून, खालच्या बाजूनं वरच्या बाजूनं व्यवस्थित स्वच्छ करा.जास्त जुनं पाणी पिणं टाळा. माठात रोजच्या रोज ताजं पाणी भरत राहा. पाणी नेहमी झाकून ठेवा. माठाला असलेला पाण्याचा नळही स्वच्छ करा. माठ थेट उन्हात ठेवू नका.

English
हिंदी सारांश
Web Title : Why drink water from an earthen pot? Health benefits revealed.

Web Summary : Earthen pot water aids digestion, detoxifies, boosts immunity, and balances pH. It's a natural, chemical-free alternative to fridge water, keeping the body cool in summer. Regular cleaning is essential.
टॅग्स : वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य