Join us

जास्त पाणी प्यायल्यास शरीरात दिसतात 'हे' धोकादायक संकेत; एका दिवसात नेमकं किती प्यावं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 16:50 IST

पाणी हे कोणत्याही एनर्जी ड्रिंकपेक्षा अधिक फायदेशीर आहे, परंतु जास्त पाणी पिणं हानिकारक देखील असू शकतं.

पाणी प्रत्येकासाठी खूप महत्वाचं आहे. त्याशिवाय कोणीही जगू शकत नाही. शरीराचं कार्य सुरळीत चालण्यासाठी हायड्रेटेड राहणं अत्यंत आवश्यक आहे. हिवाळ्यात बहुतेक लोक कमी पाणी पितात, जे अजिबात योग्य नाही. त्याच वेळी, काही लोक आहेत जे खूप पाणी पितात. निरोगी राहण्यासाठी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक किंवा कमतरता टाळली पाहिजे. 

पाणी हे कोणत्याही एनर्जी ड्रिंकपेक्षा अधिक फायदेशीर आहे, परंतु जास्त पाणी पिणं हानिकारक देखील असू शकतं. शरीराला जास्त प्रमाणात हायड्रेट केल्याने कधीकधी समस्या उद्भवू शकतात. तज्ञांच्या मते, दिवसाला ३ लीटर पाणी पिणे पुरेसं आहे, परंतु यापेक्षा जास्त पाणी प्यायल्याने शरीर ओव्हरहायड्रेट होईल, जे योग्य नाही. शरीरात पाण्याचं प्रमाण जास्त असल्यास काही लक्षणं दिसू लागतात, जे धोक्याचे संकेत असतात. 

विशेषत: उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणं खूप गरजेचं आहे, पण गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्याने तुम्ही त्रासाला आमंत्रण देता. जास्त पाणी पिण्याने काही त्रासदायक लक्षणं दिसू शकतात. ज्याप्रमाणे कमी पाणी पिणं धोकादायक आहे त्याचप्रमाणे जास्त पाणी पिणं घातक ठरू शकतं. विशेषतः जेव्हा शरीरात प्रमुख इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता असते. 

न्यूट्रिशनिस्ट रिद्धी खन्ना सांगतात की, जास्त पाणी प्याल्याने हायपोनेट्रेमिया होऊ शकतो. यामुळे रक्तातील सोडियमच्या पातळीत धोकादायक घट होऊ शकते. सोडियम हे शरीरासाठी महत्त्वाचे इलेक्ट्रोलाइट आहे.  हे संपूर्ण शरीरात पाणी कुठे वितरीत केलं जातं ते नियंत्रित करतं. ब्लॅडरमध्ये किती पाणी पाठवलं पाहिजे हे देखील सुनिश्चित करतं. 

- जर तुम्ही दिवसातून ६ ते ८ पेक्षा जास्त वेळा टॉयलेटला जात असाल तर सावध राहा, कारण तुम्ही जास्त पाणी पित आहात हे यावरून समजतं.

- जास्त पाणी प्यायल्यास पोट फुगलेले राहते. मळमळल्यासारखं वाटू शकतं.

-  डोकेदुखी होऊ शकते. तुम्हाला ब्रेन फॉगचा सामना करावा लागू शकतो. 

जर तुम्हालाही अशी लक्षणं दिसत असतील तर तुम्ही सावधगिरी बाळगा आणि जास्त पाणी पिणं टाळा.   

टॅग्स : हेल्थ टिप्सपाणीआरोग्य