Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सकाळी संडासला नीट होत नाही? चपातीच्या कणकेत १ पदार्थ मिसळा; सकाळी उठताच पोट साफ

सकाळी संडासला नीट होत नाही? चपातीच्या कणकेत १ पदार्थ मिसळा; सकाळी उठताच पोट साफ

What To Mix Flour To Get Relief From Constipation : पोटाशी संबंधित समस्या टाळण्यासाठी तुम्ही चपातीच्या पिठात काही पदार्थ मिसळू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 18:43 IST2024-12-14T18:41:56+5:302024-12-14T18:43:06+5:30

What To Mix Flour To Get Relief From Constipation : पोटाशी संबंधित समस्या टाळण्यासाठी तुम्ही चपातीच्या पिठात काही पदार्थ मिसळू शकता.

What To Mix Flour To Get Relief From Constipation : How To Get Relief From Constipation | सकाळी संडासला नीट होत नाही? चपातीच्या कणकेत १ पदार्थ मिसळा; सकाळी उठताच पोट साफ

सकाळी संडासला नीट होत नाही? चपातीच्या कणकेत १ पदार्थ मिसळा; सकाळी उठताच पोट साफ

जर तुम्हाला तुमची ओव्हरऑल हेल्थ चांगली ठेवायची असेल तर गट हेल्थवर जास्त लक्ष द्यायला हवं. हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते पोटाशी संबंधित समस्या असल्यास ओव्हरऑल आरोग्यावर याचा चुकीचा परिणाम होऊ शकतो. (Constipation Home Remedies) पोटाशी संबंधित समस्या टाळण्यासाठी तुम्ही चपातीच्या पिठात काही पदार्थ मिसळू शकता.  यासाठी चपातीच्या पिठात आळशीची पावडर मिसळून घ्या. चपाती हा रोजच्या खाण्यातील पदार्थ असल्यामुळे त्यात काही पौष्टीक पदार्थांचा समावेश करून तुम्ही पोटाचे त्रास टाळू शकता. (What To Mix Flour To Get Relief From Constipation)

आळशीच्या बीयांतील पोषक  तत्व

नॅशनल सेंटर फॉर कॉम्पलिमेंटरी आणि इंटेग्रेटिव्ह हेल्थच्या रिपोर्टनुसार आळशीच्या बीयांमध्ये फायबर्स असतात. ज्यामुळे कॉन्स्टिपेशनच्या त्रासापासून आराम मिळतो. याबाबत अनेक लहान  लहान संशोधनं करण्यात आली आहेत. २०१९ मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार आळशीच्या बीया रक्तवाहिन्यांचे विकार असलेल्यांसाठी गुणकारी ठरतात. रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठीसुद्धा हे फायदेशीर ठरते.

चपातीच्या पिठात आळशीचा वापर कसा करावा?

आळशीच्या बिया गट हेल्थसाठी चांगल्या ठरतात. पीठ मळताना १ ते २ चमचे आळशीची पावडर त्यात मिसळा. ही छोटी टिप फॉलो करून तुम्ही गॅसच्या समस्येपासून आराम मिळवू शकता आणि सकाळी पोट साफ होण्यासही मदत होईल. आळशीच्या बियांमध्ये फायबर्स, ओमेगा ३, फॅटी एसिड्, एंटी ऑक्सिडेंट्स  मोठ्या प्रमाणात असतात. याच कारणामुळे या बिया पचनक्रियेसाठी उत्तम ठरतात.

याव्यतिरिक्त आळशीच्या बियांच्या सेवनानं  वजन कमी करण्यासही मदत होते. लिव्हर हेल्थ चांगली राहते. डायबिटीसच्या रुग्णांना आळशीच्या बियांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. याव्यतिरिक्त आळशीच्या बीया मेटाबॉलिझ्म बुस्ट करतात. जर तुम्हाला थकवा, कमकुवतपणा जाणवत असेल तर आळशीची पावडर दुधात मिक्स करून तुम्ही घेऊ शकता.

आळशीच्या बिया खाण्याचे फायदे

आळशीच्या बिया पाण्यात भिजवून खाल्ल्यानं मेटाबॉलिझ्म बुस्ट होतो. भिजवल्यानंतर याचा आकारही वाढतो आणि बराचवेळ पोट भरलेलं राहतं.  आळशीतील डायटरी फायबर्स, लिगनेन आणि ओमेगा ३ फॅटी एसिड्स आतड्यांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरतात. ज्यामुळे आतड्यांची सूज कमी होते चांगले बॅक्टेरियाज वाढतात. ज्यामुळे पोटाशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत.

केसांशी निगडीत समस्या असल्यास तुम्ही आळशीच्या बियांचे सेवन करू शकता. आळशीच्या बियांचे सेवन केल्यानं केस चांगले राहतात. कारण यात व्हिटामीन ई, ओमेगा ३ फॅटी एसिड, व्हिटामीन बी मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे केसांच्या समस्या उद्भवत नाहीत.

Web Title: What To Mix Flour To Get Relief From Constipation : How To Get Relief From Constipation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.