What to avoid in Piles : चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे हल्ली अनेकांना पाइल्सची समस्या होत राहते. एकदा की पाइल्सची समस्या झाली तर व्यक्तीचं उठणं-बसणं इतकंच काय तर झोपणंही अवघड होतं. पाइल्सचं दुखणं इतकं वाईट असतं की, कशातही लक्ष लागत नाही. बरं ही समस्या महिला आणि पुरूष दोघांमध्येही मोठ्या प्रमाणात आढळते. या आजाराचा संबंध पचनक्रियेशी असतो. जर पचनक्रियेत कोणत्याही प्रकारची गडबड झाली तर सर्वातआधी पोटदुखी सुरू होते, पुन्हा पुन्हा टॉयलेटला जावं लागतं नैसर्गिक विधी करताना जोर लावावा लागतो आणि यामुळेच पाइल्सची समस्या होते. पाइल्स सगळ्यात मोठी अडचण म्हणजे हा आजार एकदा झाला की, पुन्हा पुन्हा होण्याचा धोका असतो. त्यामुळे पाइल्सची समस्या असलेल्या लोकांनी त्यांच्या खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष दिलं पाहिजे. चला जाणून घेऊ पाइल्सची समस्या असताना रूग्णाने कोणते पदार्थ खाणे टाळावे. त्याआधी जाणून घेऊ पाइल्स होण्याची मुख्य कारणे....
पाइल्स होण्याची कारणं...
- पोट बिघडणं
- एकाच स्थितीत जास्त बसणे
- जास्त वेळ उभं राहणं
- लठ्ठपणा
- नैसर्गिक विधीसाठी जोर लावावा लागणं
- फायबरची कमतरता
- आनुवांशिक कारण
पाइल्स असेल तर काय खाऊ नये?
पाइल्सने झालेल्या लोकांनी फास्ट फूड खाणं पूर्णपणे टाळलं पाहिजे. त्याऐवजी फळं आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करावा. पाइल्सची त्रास कमी करण्यासाठी पत्ताकोबी, बीट, टोमॅटो इत्यादींचा आहारात समावेश करावा.
तिखट कमी खा
पाइल्सची समस्या झाल्यावर तिखट भाज्या किंवा पदार्थ अजिबात खाऊ नये. कारण तिखटामुळे पाइल्सच्या जखमा आणखी वाढतात. संडास करताना जखमा अधिक दुखतात. इतकंच नाही तर पाइल्सच्या सुकलेल्या जखमा तिखटामुळे पुन्हा सक्रिय होतात. त्यासोबतच चटपटीत, मसालेदार, गरम पदार्थही खाऊ नयेत.
बाहेरचे पदार्थ टाळा
पाइल्सने पीडित लोकांनी शक्य तेवढं बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे. कारण बाहेरच्या पदार्थांमध्ये मिरची, तिखट, मीठ असतं आणि स्वच्छतेची फार काळजीही घेतली जात नाही. याने तुम्ही पाइल्सची समस्या अधिक वाढू शकते.
पाइल्सची लक्षणे
- शौचाच्या ठिकाणी रक्तस्त्राव होणे
- शौचाला आल्यानंतर आग आणि वेदना होणे
- शौचाच्या ठिकाणी खाज येणे
- गुदद्नारेत सूज येणे, मांस बाहेर येणे
