Urinating During Bath: आंघोळ ही शरीर शुद्ध आणि ताजेतवाने करणारी प्रक्रिया आहे. पण आंघोळ करताना काही लोक नकळत अशी सवय लावून घेतात जी पुढे जाऊन त्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. आंघोळ करताना लघवी करणे हा विषय बहुतेक लोक उघडपणे बोलत नाहीत, पण ही खूपच सामान्य गोष्ट आहे. अनेक लोक आंघोळ करताना मध्येच लघवी करून टाकतात आणि त्यांना यात काही धोका वाटत नाही. काहींना वाटते की पाण्यात उभं राहून लघवी करणं काही मोठी गोष्ट नाही. पण तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ही साधी वाटणारी क्रिया शरीराच्या काही महत्त्वाच्या कार्यांवर मोठा परिणाम करू शकते.
आंघोळ करताना जर लघवी केली तर याचे गंभीर दुष्परिणाम म्हणजे मूत्राशय आणि पेल्विक फ्लोअरच्या स्नायूंवर ताण येणे, लघवी थांबणे, संसर्गाचा धोका वाढणे आणि मेंदूमध्ये चुकीच्या सवयी निर्माण होणे. याशिवाय ही सवय स्वच्छतेच्या दृष्टीनेही धोकादायक आहे.
डॉ. टेरेसा इरविन (युरो-गायनेकॉलॉजिस्ट) यांच्या म्हणण्यानुसार, उभं राहून लघवी केल्याने मूत्राशय पूर्णपणे रिकामं होतं, पण शॉवरमध्ये लघवी केल्याने मेंदू 'वाहत्या पाण्याचा आवाज' आणि 'लघवी करण्याची इच्छा' यांच्यात संबंध जोडतो. त्यामुळे नंतर जेव्हा तुम्ही पाणी चालू करता, जसं की हात धुताना, भांडी धुताना, तुमच्या मूत्राशयाला लगेच लघवीची इच्छा होऊ शकते. म्हणजेच शरीराने एक चुकीचा 'रिफ्लेक्स' तयार केलेला असतो.
पेल्विक फ्लोअरवरील ताण
आंघोळ करताना लघवी केल्याने शरीर पूर्णपणे रिलॅक्स होत नाही. त्यामुळे पेल्विक फ्लोअरच्या स्नायूंना योग्य विश्रांती मिळत नाही आणि मूत्राशय पूर्णपणे रिकामं होत नाही. कालांतराने ही सवय कायम राहिल्यास मूत्राशयाच्या स्नायूंवर अनावश्यक ताण येतो. महिलांमध्ये ही समस्या अधिक गंभीर ठरते, कारण त्यांच्या स्नायूंची रचना या ताणामुळे जास्त प्रभावित होऊ शकते.
मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका
अपूर्ण लघवी शरीरात राहिल्यास त्यात बॅक्टेरिया वाढू शकतात. हे बॅक्टेरिया मूत्राशय आणि मूत्रपिंडांपर्यंत पोहोचू शकतात, ज्यामुळे मूत्रमार्गातील संसर्ग (UTI) होण्याची शक्यता वाढते. ही समस्या महिलांमध्ये कॉमन आहे. संसर्ग झाल्यास जळजळ, वेदना आणि ताप अशी लक्षणे दिसतात. ह्या कारणांमुळे अंघोळ करताना लघवी करण्याची सवय टाळणे आरोग्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.
जेवल्यावर लगेच लघवी करण्याचे फायदे
डॉ. मिहिर खत्री यांनी इन्स्टावर कवि घाघ यांच्या कवितेच्या 'खाइ के मूते सूते बाउ, काहे के बैद बसावे गाऊ'। ओळी शेअर केल्या. या ओळींचा अर्थ असा होतो की, जेवण केल्यावर लगेच लघवी केल्याने आणि डाव्या कडावर झोपल्याने गावात वैद्याची गरजच पडणार नाही. डॉक्टरांनी सांगितलं की, जेवण केल्यावर ही दोन कामे केल्याने तुम्ही नेहमीच निरोगी राहू शकता.
जेवणानंतर लघवीचे फायदे
डॉक्टर खत्री यांच्यानुसार, तुम्ही जेव्हाही जेवण कराल त्यानंतर लगेच लघवीला आवर्जून जा. याने किडनी निरोगी राहते आणि यासंबंधी आजारही होत नाहीत. तसेच ही सवय हृदयासाठीही फायदेशीर ठरते. वेगवेगळ्या हृदयरोगांचा धोका यामुळे कमी होतो.
