Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > स्लीप डिव्होर्स म्हणजे काय? लग्न न मोडता घटस्फोट घेण्याची ही कोणती नवी पद्धत?

स्लीप डिव्होर्स म्हणजे काय? लग्न न मोडता घटस्फोट घेण्याची ही कोणती नवी पद्धत?

What Is Sleep Divorce? The Benefits Explained : नाते वाचवण्यासाठी कपल्स करतायत स्लीप डिव्होर्सचा ट्रेण्ड फॉलो; आरोग्याला मिळतात अनेक फायदे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2024 04:38 PM2024-03-11T16:38:25+5:302024-03-11T16:39:20+5:30

What Is Sleep Divorce? The Benefits Explained : नाते वाचवण्यासाठी कपल्स करतायत स्लीप डिव्होर्सचा ट्रेण्ड फॉलो; आरोग्याला मिळतात अनेक फायदे..

What Is Sleep Divorce? The Benefits Explained | स्लीप डिव्होर्स म्हणजे काय? लग्न न मोडता घटस्फोट घेण्याची ही कोणती नवी पद्धत?

स्लीप डिव्होर्स म्हणजे काय? लग्न न मोडता घटस्फोट घेण्याची ही कोणती नवी पद्धत?

निरोगी राहण्यासाठी झोप खूप महत्वाची. झोपेमुळे शरीर तंदुरुस्त राहते. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी शरीराला ७ ते ८ तासांची झोप महत्वाची. प्रत्येकाची झोपण्याची पद्धत वेगळी असते. काही लोकं झोपताना घोरतात. तर काहींना झोपताना पूर्णपणे शांतता हवी असते (Health Care). पण एका जोडीदाराच्या झोपण्याच्या सवयी दुसऱ्या जोडीदाराच्या सवयींच्या विरुद्ध असू शकतात (Couple Trend).

एका पार्टनरला झोपेत घोरण्याची सवय असते. तर दुसऱ्या पार्टनरला झोपेत शांतता हवी असते (Sleep Divorce). पण पहिल्या पार्टनरच्या घोरणाऱ्या आवाजामुळे दुसऱ्या पार्टनरची झोप मोड होऊ शकते. ज्यामुळे दोघांमध्ये भांडणं तर होतात. शिवाय आरोग्यही बिघडते. जर नात्यात दुरावा आणि आरोग्य बिघडू नये असे वाटत असेल तर, स्लीप डिव्होर्स घेणं केव्हाही उत्तम(What Is Sleep Divorce? The Benefits Explained).

स्लीप डिव्होर्स घेण्याची योग्य पद्धत

स्लीप डिव्होर्स म्हणजे आपल्याला पार्टनरपासून वेगळे झोपणे. आपल्याला जोडीदाराशिवाय वेगळ्या बेडवर, रूम सोडून झोपणे. यामुळे आपली झोप पूर्ण होईल. शिवाय झोपेवर परिणाम देखील होणार नाही.

हवा बदल झाला की आजारी पडता? सर्दी-खोकल्याने बेजार? बाबा रामदेव सांगतात एक खास काढा प्या..

अमेरिकन ॲकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिनच्या मते, 'एक तृतीयांश अमेरिकन लोक काही ना काही कारणास्तव त्यांच्या जोडीदारापासून वेगळे झोपतात. त्यामुळे त्यांना चांगली झोप येते. शिवाय आरोग्यही सुदृढ राहते.'

स्लीप डिव्होर्स

नात्यात स्लीप डिव्होर्स घेतल्याने नक्कीच चांगली झोप लागते. पण याचा वैयक्तिक नातेसंबंधांवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हे अनुसरण करण्यापूर्वी, आपल्या जोडीदाराशी चर्चा करा आणि त्याच्या/तिच्या इच्छा देखील जाणून घ्या.

स्लीप डिव्होर्स घेण्याचे फायदे

झोपेच्या कमतरतेमुळे चयापचय मंदावते, आणि वजन वाढते. अशावेळी स्लीप डिव्होर्स घेतल्याने वजन कमी करण्यास मदत होते. शिवाय पुरेशी झोप घेतल्याने भूक कमी करणारे हार्मोन्स वाढतात. ज्यामुळे वेट लॉससाठी मदत होते.

मेंदूचे कार्य सुधारते

झोपेमुळे मेंदूचे कार्य सुधारते. आपला विचार, प्रॉडक्टिव्हिटी, नवीन गोष्टींची शिकवण घेणे, अशा प्रकारे इतर गोष्टींमुळे आउटपुट वाढते, आणि विचार करण्याची क्षमताही वाढते.

जेवणानंतर की जेवणाआधी? ताक नेमके कधी प्यावे? ताक प्यायल्याने वजन तर घटतेच; आणि...

हृदय राहील निरोगी

खराब झोपेमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. एनसीबीआयवर ९ सप्टेंबर २०१७ मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार,  'जर आपण एक तास कमी झोपलात, तर हृदयविकाराचा धोका ६ टक्क्यांनी वाढतो.'

Web Title: What Is Sleep Divorce? The Benefits Explained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.